वांग्यात हि चूक करू शकते मोठे नुकसान!
फळ आणि शेंडा पोखरणारी कीड वांगे उत्पादक शेतकरी बांधवासाठी मोठी डोकेदुखी ठरते. काही करून या किडीचे नियंत्रण झालेच पाहिजे या विचाराने तो भारंभार कीटकनाशक फवारणी करतो. काही शेतकरी बांधव वांग्यात मक्षिकारी सापळेहि लावतात! एव्हडे सारे करून कीड नियंत्रणात येत नाही. एकीकडे उत्पादन खर्च खूप मोठा होऊन बसतो व दुसरीकडे काढणी केलेल्या मालाचा दर्जा दुय्यम असतो. असा माल विक्रीदेखील होत नाही. एव्हढे मोठे नुकसान कोणत्या चुकी मुळे होते? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यापूर्वी आपण वांग्यावर दोन लेख प्रसिद्ध केले आहेत, ते आपण वाचले आहेत का? नसतील तर या लेखाच्या खाली तुम्हाला या दोघी लेखाच्या लिंक मिळतील. ते लेख वाचायला विसरू नका. १. वांग्यातील फळ व शेंडे पोखरणारया अळीचे कसे करणार नियंत्रण? २. वांग्याचे कीडनियंत्रण करा स्वस्तात आता मूळ मुद्याकडे वळू... बेतहाशा कीटकनाशक फवारणी केल्याने खूप फायद्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे . सर्वप्रथम किडीचे सर्वेक्षण करून आर्थिक नुकसान करण्याची पातळी किडीने गाठली आहे का? हे पाहावे. त्यासाठी कामगंध सापळे लावावेत व एका दिवसात ५ किंवा त्यापेक्...