लावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका!
व्यापारी शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठा चढ-उतार होत असतो. अशा आर्थिक परिस्थितीचा कौटुंबिक बजेटला धक्का लागू नये म्हणून अभ्यासू शेतकरी, शेतीच्या एका भागात वेलवर्गीय भाज्यांची शेती करतात. यात कारले व दोडके हि पिके अग्रणी आहेत कारण शहरी व स्थानिक बाजारात या फळभाज्यांना वर्षभर चांगली मागणी असते. हवामान: या दोन्ही पिकांची पावसाळी व उन्हाळी हंगामात लागवड करतात. कारल्यास उष्ण व दमट हवामान तर दोडक्यास समशितोष्ण व दमट हवामान मानवते. दोडका थोडीशी थंडी सहन करु शकतो, मात्र कारल्याच्या वेलीवर थंडीचा वाईट परिणाम होतो. जमीन: भुसभूशीत चांगला निचरा असणारी भारी ते मध्यम जमन निवडावी, चोपण अथवा चिबड जमिनीत ही पिके घेऊ नयेत. पूर्वमशागत व लागवड: जमीनीची उभी आडवी नांगरट करून , काडी कचरा वेचून शेत स्वच्छ करावे. प्रति हेक्टरी 100 ते 150 क्विंटल चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोष्ट हुमणासूर मध्ये मिसळून शेतात पसरवावे. हुमणासूर हे उत्तम दर्जाचे मृदा सुधारक असून मातीतील उपयोगी सूक्ष्मजीवांची संख्या वाढवतात तसेच हुमणी, सुतकृमी, वाळवी यांची संख्या...


