फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

मल्चफिल्म ची निवड व फायदा

बदलत्या युगातील शेतकरी नव-नवीन पद्धती वापरून अनेक पारंपारिक समस्या मोडीत काढतो. वाढणारे तण, पाण्याची कमतरता, महागडी मजुरी, सूर्याच्या प्रखरतेने होणारे नुकसान, सुतकृमींचा वाढता त्रास अशा अनेक समस्यांवर कमीअधिक प्रमाणात फायदेशीर ठरणारा आच्छादनाचा उपाय कधी काळी शेतकरी मित्रांनीच शोधून काढला. या पद्धतीत कालाअनुरूप सुधारणा होत जावून आज प्लास्टिकच्या आच्छादनाचा वापर व्यापारी व किरकोळ स्वरुपात देखील होतो. आच्छादनामुळे समस्या निवारणासोबतच काही फायदे देखील होतात जसे. 
  1. मृदेची धूप रोखली जाते
  2. खताचा निचरा होत नाही
  3. विषाणूजन्य रोगाचे वाहक असणाऱ्या किडींचे नियंत्रण होते. 
  4. पिकाच्या उत्पादकतेत 25 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ होते. 
  5. शेतमालाच्या गुणवत्तेत वाढ होते. 
  6. बीज उगवण क्षमतेत वाढ होते.

 मल्च फिल्म ची निवड


मल्च चा रंग, आकार व जाडी यानुसार प्रकार आहेत व पिकाच्या गरजेनुसार मल्च ची निवड करायची असते.
  • विविध रंगी मल्च चे जे उपायोग सांगिलते जातात त्या नुसार होणारे फायदे प्रत्यक्षात होतीलच असे नाही. तंत्रशुद्ध  प्रयोगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे निरीक्षण मिळाले त्यामुळे स्थायी अनुमान निघालेले नाही
  • पिकाच्या गरजे नुसार ९० ते १२० से. मी चा पन्हा उपलब्ध असतो.
  • भुइमुगात ७  मायक्रोन जाडीचा पेपर वापरायचा असतो. एका वर्षाच्या आत निघणाऱ्या पिकासाठी २० ते २५ मायक्रोन, मध्यम काळाच्या पिकासाठी ४० ते ५० मायक्रोन व बहुवार्षिक पिकासाठी ५० ते १०० मायक्रोन जाडीचा पेपर वापरावा
  • किती क्षेत्र आच्छादन करावे हे ठरवण्यासाठी खालील तक्ता बघावा
 पिकाचा प्रकारआच्छादन क्षेत्र
जमिनीवरील वेल २० ते २५ टक्के
सुरवातीची फळ बाग ४० ते ५० टक्के
फळ बाग व काकडी वर्गीय४० ते ६० टक्के
भाजीपाला, पपई, अननस७० ते ८०. टक्के
जमीन तापवण्यासाठी१०० टक्के

मल्चिंग पेपर चे गणित (आकडे ढोबळ मानाने दिलेले आहेत)
 जाडी
(मायक्रोन मध्ये)
 जाडी
(गेज मध्ये)
 जाडी
(एम एम मध्ये)
एका किलोत झाकले जाणारे क्षेत्र वर्ग मीटर मध्येएक वर्ग मीटर चे वजन ग्राम मध्ये
२८०.००७१४४६.९
२०८००.०२५४१८.४
२५१०००.०२५४२२३
४०१६०
०.०४
२६३८
५०२०००.०५२१४६
१००४०००.१११९३

 मल्चिंग चा सर्व साधारण खर्च
  • भाजी वर्गीय पिकासाठी ८० टक्के क्षेत्र झाकल्यास प्रत्येक वर्ग मीटर साठी अंदाजे २ रु
  • वनराईत ४० टक्के क्षेत्र झाकल्यास अंदाजे  प्रत्येक वर्ग मीटर साठी अंदाजे १.४० रु
 मल्चिंग चा सर्व साधारण फायदा
कृषीविद्यापीठांच्या अभ्यासाच्या आधारा नुसार मिरची, आलू, कोबी, टमाटे, ढोबळी मिरची, भेंडी व वांग्यात २५ मायक्रोनची मल्चिंग वापरली असता सर्वसाधारण पणे ३० ते ६० टक्के उत्पादन वाढ दिसून आली. पेरू-डाळिंब या बागेत १०० मायक्रोन चा पेपर वापरल्यावर साधारण पणे २५ ते ४० टक्के उत्पादन वाढ मिळाली. भूईमुगात ७  मायक्रोन चा पेपर वापरल्यास ६० ते ७० टक्के इतकी घवघवीत वाढीची नोंद आहे तर उसात ५० मायक्रोन चा पेपर वापरल्यावर ५० ते ५५ टक्के उत्पादन वाढले.
शेतकरी मित्रांनी मल्चिंग वापरते वेळी हा अभ्यास निक्षून करावा. जर पुढल्या वर्षी वापर करावा कि नाही हे ठरवण्यासाठी प्रयोग क्षेत्रात किंवा पिका खालील क्षेत्रात काही प्रमाणात वापर करून इतर क्षेत्राशी तुलना करावी.
ऑनलाइन करा खरेदी
जाडी (मायक्रोन)रुंदी (मीटर)रंग लांबी (मीटर)किंमतपर मीटरलिंक
२५१.२काळा-चंदेरी१७५३५.००खरेदी करा
२५१.२काळा -चंदेरी२५४९९२०.००खरेदी करा
२५१.२काळा-चंदेरी१००१०३०१०.३०खरेदी करा
२५१.२काळा-चंदेरी२५० ३०९९१२.४०खरेदी करा 
२५१.२काळा-चंदेरी४००४७९९१२.००खरेदी करा
३०१.२काळा-चंदेरी१००११४२  ११.४२खरेदी करा
३०१.२काळा-चंदेरी४००६४२५१६.००.खरेदी करा
१००१.२काळा-चंदेरी१००४६९९४६.९९खरेदी करा
१००१.२काळा-चंदेरी४००१८६४९
४६.६२
खरेदी करा

किमती कोणत्याही क्षणी बदलू शकता, लिंक वर क्लिक करून सध्याची किंमत कळेल व खरेदी करता येईल. 
आपल्या मनात काही शंका असल्यास प्रतिक्रियेत लिहा किंवा खाली दिलेल्या फोन नंबर वर संपर्क साधा.
-------
हि माहिती आपल्याला उपयुक्त वाटली का? अशी माहिती नियमितपणे मिळवण्यासाठी आमच्या व्हाटसएप ग्रुप चे सदस्य बना!
---------
वाचकाने विचारलेला प्रश्न
स्वप्नील बनसोड, औरंगाबाद
मी ह्या वर्षी कापूस पिकास मल्चफिल्म वापरण्याचा विचार करत होतो, तर मला सांगा कापूस पिकास मल्चिंग फिल्म वापरू शकतो का? आणि जर वापरू शकतो तर किती प्रमाणात फायदा होईल? आणि एकरी किती फिल्म लागेल?
उत्तर: 
कपाशी बियाणे उत्पादक अशा फिल्म चा वापर करतात पण कापूस उत्पादकास याचा खर्च परवडेल असे वाटत नाही. २५-३० मायक्रोन च्या जाडीचे मल्च वापरल्याने फायदा होतो. वाढ वेगाने होते, रससोशक किडीचा त्रास कमी होतो. मुद्दा फक्त खर्चाचा आहे. तुम्ही छोटेखानी प्रयोग करून पाहू शकता. मल्चिंग फिल्म ची निवड, उपयोग व खर्चाचा अंदाज लावण्यासाठी आमचा लेख वाचा. लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गंधक वापरून कमी खर्चात वाढवा उत्पादकता

"मजुरांची" समस्या - नियोजन

मिरचीतील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद