फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

गंधक वापरून कमी खर्चात वाढवा उत्पादकता

शेतकरी मित्रहो, नत्र-स्पुरद व पालाश युक्त खतांचा वापर आपण जितका लक्ष देवून करतो तितकेच लक्ष गंधकाकडे देणे आवश्यक आहे. खरे तर गंधक किती लागते याचा अंदाज शेतकरी बांधव लावू शकत नाही. म्हणून गुणोत्तर पद्धतीने गंधकाची गरज समजावून घेवू.

जर तुमच्या पिकला ६ किलो नत्र (१४.६ किलो युरिया) लागत असेल तर कमीत कमी १ कलो गंधक लागेलच. इतके गंधक का लागते व आज पर्यंत याची इतकी गरज का भासली नाही हा प्रश्न आपल्या मनात उभा रहाणे साहजिक आहे.

मित्रहो, आजपर्यंतच्या शेतीच्या पद्धतीत जमिनीची धूप कमी व्हायची. शुद्ध खतांचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हता. कमी उत्पादकतेची पिके घेतली जात होती व सर्वात महत्वाचे म्हणजे कंपोस्ट चे प्रमाण खूप होते. आपल्या पद्धतीत अमुलाग्र बदल झाल्याने गंधकाचा वापर वाढवणे क्रमप्राप्त आहे.

पिकातील गंधकाची कमतरता सहज दिसून येते. पिकाची वाढ खुंटते, ते कमजोर दिसते (टेकू द्यावे लागतात), पाने पिवळी पडू लागतात, मुळांवर (द्विदलवर्गीय पिकात) गाठी कमी असतात, दाणे भरण्यास वेळ लागतो व फळे पूर्णपणे पिकत नाहीत.

पिकपोषणा पलीकडे देखील गंधकाचे दोन महत्वाचे फायदे आहेत. पहिला म्हणजे बुरशी व लाल कोळी नियंत्रणाचा व दुसरा उपयोग म्हणजे भूसुधार. अर्थात या साठी एलेमेंटल स्वरूपातील गंधक वापरावे लागते. (या बद्दल अधिक माहिती खाली देत आहे.)

गंधकासाठी कोणकोणती खते द्यावीत, त्यात गंधकाचे प्रमाण किती, त्यातील गंधक किती वेळेत उपलब्ध होईल हे जाणून घेवू.

सल्फरयुक्त खते:
  • अमोनिअम सल्फेट मध्ये गंधकाचे प्रमाण २३ टक्के, लगेच लागू होते, फवारणी तून दिले जावू शकते. एक किलो गंधकाचा पुरवठा करण्यासाठी ४.३५ किलो अमोनिअम सल्फेट लागेल. 
  • सिंगल सुपर फोस्फेट मध्ये गंधकाचे प्रमाण ११ टक्के, लगेच लागू होते, जमिनीतून द्यावे
  • पोटाशियम सल्फेट मध्ये गंधकाचे प्रमाण १७.५ टक्के, लगेच लागू होते, फवारणी तून दिले जावू शकते
  • झिंक सल्फेट मध्ये गंधकाचे प्रमाण १० टक्के, लगेच लागू होते, फवारणी तून दिले जावू शकते
  • मॅग्नेशियम सल्फेट मध्ये गंधकाचे प्रमाण १७ टक्के, लगेच लागू होते, फवारणी तून दिले जावू शकते
  • फेरस सल्फेट मध्ये गंधकाचे प्रमाण १०.५ टक्के, लगेच लागू होते, फवारणी तून दिले जावू शकते
शुद्ध सल्फरयुक्त खते

  • बेन्टोनाईट सल्फरमध्ये गंधकाचे प्रमाण ९० टक्के असते. खूप हळू लागू होते. मातीतून द्यावे लागते. एकरी डोस २० ते २५ किलो चा असतो.
  • डब्ल्यूडीजी सल्फरमध्ये  गंधकाचे प्रमाण ८० किंवा ९० टक्के असते. वेगाने लागू होते. मातीतून द्यावे लागते. एकरी डोस ३ किलोचा असतो. याचा उपयोग फवारणीतून केल्यास बुरशीनाशक व लाल कोळी नाशकाचे काम करते.
या व्यतिरिक्त वेटेबल स्वरूपातील इतर फोर्म्यूलेशन्स देखील असतात पण डब्ल्यूडीजी खते आल्यावर त्यांचे प्रमाण अत्यल्प झाले आहे.

पिकात गंधकाची कमतरतेची लक्षणे दिसत असतील तर ती दूर व्हावी म्हणून पिकाच्या वाढीच्या गरजे नुसार विद्राव्य स्वरूपातील गंधक युक्त खते फवारावीत व ड्रीप ने किंवा आळवणीने डब्ल्यूडीजी स्वरूपातील खते ३ किलो प्रती एकर या दराने द्यावे. हे पिक काढल्यावर पुढील पिकाची तयारी करते वेळी बेन्टोनाईट सल्फर एकरी २० ते २५ किलो द्यावे.

मित्रहो, तुम्ही कुठलेही पिक घ्या, गंधकाचा वापर नक्की करा. एका वेळी एकरी ३ किलो डब्ल्यूडीजी सल्फर चा डोस हे प्रमाण नियमित ठेवा. पहिला डोस पिक वाढीला सुरवात झाली कि, दुसरा डोस पिक ऐन जोमात असताना व तिसरा डोस फळ/दाणे भरू लागल्यावर.




टिप्पण्या

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मजुरांची" समस्या - नियोजन

मिरचीतील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद