गुढगेदुखी ची डोकेदुखी कशी घालवाल
४०शी पार व्ह्ययला लागली कि अनेक लोकांना गूढगे दुखायला लागतात. जर दुर्लक्ष झाले तर इतर सांध्यात देखील दुखणे वाढते. यालाच आपण सांधेदुखी असे म्हणतो. सांधेदुखीचा त्रास आजकाल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सांध्यातील गादी सारखे काम करणारे कार्टिलेज जेव्हा घासले जाते तेव्हा सांधेदुखीचा त्रास जाणवू लागतो. अनुवांशिकता, जगण्याची पद्धत, खाण्याच्या सवई, वाढलेले वजन यामुळे सांधेदुखी होऊ शकते. जर सांध्यातील कार्टिलेजची झीज भरून काढली व त्याला नैसर्गिक स्थितीत आणले तर सांधेदुखीचा त्रास कमी होतो. अगदी नाहीसा देखील होतो. खर बघितले तर सांध्यातील कार्टिलेजची झीज नित्य होत असते पण तारुण्य असे पर्यंत हि झीज सहज भरून निघत असते. त्यानंतर झीज भरून निघायचा वेग - घासले जाण्याच्या वेगा पेक्षा मंदावतो व कार्टिलेज झिजते. कालांतराने सांधेदुखी सुरु होते. गुढगेदुखी हा सांधेदुखीतला सर्वात जास्त अनुभवला जाणारा त्रास आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास अपंगत्व येवू शकते. सुदैवाने आज हे टाळणे शक्य आहे. कार्टिलेजची झीज भरून काढायचा वेग वाढवला तर सांधेदुखीवर मात करणे शक्य आहे. कार्टिलेजची झीज भरून काढण्यासाठी शरी...


