हेलिकोव्हर्पा या खादाड अळी ची गोष्ट - एक अनार सौ बिमार!
By Gyorgy Csoka, Hungary Forest Research Institute, Bugwood.org एक अनार सौ बिमार! हो अगदी तसेच आहे - हेलिकोव्हर्पा या अळीचे! हि कीड अनेक पिकात नुकसान करते व प्रत्येक पिकात तिचे नाव वेगळे आहे! हरभऱ्यात घाटेअळी, ज्वारी-बाजरी-मक्यात कणीसअळी, गव्हात ओम्बीअळी, तूर-मुग-चवळी-वाटाण्यात शेंगा पोखरणारी अळी, करडई व कापाशीत बोंड अळी, सुर्यफुल व झेंडूत फुलअळी तर टोमॅटो, कारली व मिरचीत फळ पोखरणारी अळी. वर दिलेल्या प्रमुख पिकांबरोबरच 300-350 पेक्षा जास्त पिकावर हि अळी आढळून येते, म्हणूनच तर एक अनार सौ बिमार म्हटलय. निसर्गाने जसे या अळीला एकदम खादाड बनवले आहे तसे इतरही अनेक खादाड आहेतच. ७५ पेक्षा जास्त परोपजीवी या अळीला आजारी पाडू शकतात व ३३ परभक्षी हिच्यावर ताव मारत असतात. इतके सारे जीव हिच्या जीवावर उठत असले तरी ती ची पुनरुत्पादन क्षमता इतकी जास्त आहे कि जर तिच्यावर नजर नाही ठेवली तर ती हा हा करीत सगळे शेत फस्त करू शकते. Image courtesy of A.M. Varela, icipe extracted from http://www.infonet-biovision.org/default/ct/76/pests आपल्या शेत परिरसरात या अळीचा प्रादुर्भाव कम...


