फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

हेलिकोव्हर्पा या खादाड अळी ची गोष्ट - एक अनार सौ बिमार!


By Gyorgy Csoka, Hungary Forest Research Institute, Bugwood.org
एक अनार सौ बिमार! हो अगदी तसेच आहे - हेलिकोव्हर्पा या अळीचे! हि कीड अनेक पिकात नुकसान करते व प्रत्येक पिकात तिचे नाव वेगळे आहे! हरभऱ्यात घाटेअळी, ज्वारी-बाजरी-मक्यात  कणीसअळी, गव्हात ओम्बीअळी, तूर-मुग-चवळी-वाटाण्यात शेंगा पोखरणारी अळी, करडई व कापाशीत बोंड अळी, सुर्यफुल व झेंडूत फुलअळी तर टोमॅटो, कारली व मिरचीत फळ पोखरणारी अळी.

वर दिलेल्या प्रमुख पिकांबरोबरच 300-350 पेक्षा जास्त पिकावर हि अळी आढळून येते, म्हणूनच तर एक अनार सौ बिमार म्हटलय.

निसर्गाने जसे या अळीला एकदम खादाड बनवले आहे तसे इतरही अनेक खादाड आहेतच. ७५ पेक्षा जास्त परोपजीवी या अळीला आजारी पाडू शकतात व ३३ परभक्षी हिच्यावर ताव मारत असतात. इतके सारे जीव हिच्या जीवावर उठत असले तरी ती ची पुनरुत्पादन क्षमता इतकी जास्त आहे कि जर तिच्यावर नजर नाही ठेवली तर ती हा हा करीत सगळे शेत फस्त करू शकते.
Picture
Image courtesy of A.M. Varela, icipe extracted from http://www.infonet-biovision.org/default/ct/76/pests

आपल्या शेत परिरसरात या अळीचा प्रादुर्भाव कमीत कमी रहावा म्हणून सर्व परिसर नीट राखायला हवा. खोल नांगरट, आंतरमशागत,सापळा पिके (अंबाडी, झेंडू, भेंडी) या  पध्दतीने आपण याचे व्यवस्थापन करू शकतो.

सोबतच प्रकाश सापळे, कामगंध सापळे, पक्षीथांबे, अळयांची वेचणी करणे या यांत्रीकी पध्दतीने पण या किडीचे व्यवस्थापन करता येते.

तरीही जर शेतात हि कीड आलीच तर जैविक व रासायनिक अशा दोघी पद्धतीने नियंत्रण ठेवता येते.

बॅसीलस थुरिनजिएनसिस (बीटी) हे निसर्गामध्ये आढळून येणारे जिवाणू आहेत. हे जिवाणू हेलीकोव्हर्पास विषारी असणारे प्रथिनांचे कण निर्माण करतात. बाजारामध्ये पावडर स्वरूपामध्ये बीटी किटकनाशक उपलब्ध आहे.

मेटारायझीयम अ‍ॅनिसोप्ली, नोमुराई रिलाई, बिव्हेरीया बॅसीयाना आदी बुरशी हेलीकोव्हर्पाला रोगकारक असून त्यांचा उपयोग नियंत्रण व्यवस्थापनामध्ये करता येतो.

.

अधिक माहितीसाठी या फोटोवर क्लिक करा, हि उत्पादने स्वस्तात उपलब्ध आहेत

एच.एन.पी.व्ही. (Helicoverpa Nuclear polyhedrosis Virus) हे विषाणूजन्य किटकनाशक या अळीला आजारी करते . आपण हे घरी देखील बनवू शकता.

या शिवाय कडूनिंबावर आधारित उत्पादने देखील या अळी चा प्रकोप कमी करू शकता.

एव्हढ्यात भागले नाही तर खालील पैकी काही रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू शकतात.  प्राधान्यक्रमाने जैविक आधार असेलेल SPINOSAD 45.0% SC चांगले आहे. एकसे भले दोन म्हणून कोम्बी प्रकारातील Acephate 25% w/w + Fenvalerate 3% w/w EC, Cypermethrin 3% + Quinalphos 20% EC किंवा Ethion 40% + Cypermethrin 5% w/w EC यांचा आलटून पालटून उपयोग करावा. जर हि उत्पादने उपलब्ध नसतील तर खालील पैकी जी उपलब्ध असतील ती आलटून पालटून, दोन-तीन एकत्र करून फवारावीत.

  • CHLORANTRANILIPROLE 18.5% SC,
  • CHLORFLUAZURON 5.4% EC, 
  • FLUBENDIAMIDE 20% WG,
  • LUFENURON 5.4%  EC, 
  • NOVALURON 10% EC, 
  • NOVALURON 8.8% SC, 

एमेझोन ऑनलाईन शॉपवर शोधून काही उत्पादनाची माहिती खाली देत आहे. हवे असल्यास लिंक वर क्लिक करून खरेदी करू शकता.


कामगंध सापळा: हा सापळा पिकाच्या वर काडीवर लावायचा असतो. फनेल ट्रॅप च्या मध्ये ल्युअर लावावे. एकरी ५ ते ६ सापळे लावून त्याला नियमित चेक करावे. जर नियमित ४-५ पतंग सापडत असतील तर सापळ्यांची संख्या दुप्पट/तिप्पट करावी. एक सापळा म्हणजे एक फनेल ट्रॅप व त्यात लावलेली कामगंध कुपी अर्थात ल्युअर. कामगंध कुपीतील कामगंधामुळे अळी चे पतंग अवस्थेतील नर कामभावनेने जागृत होऊन सापळ्याकडे येतात व एकदा फनेल च्या खाली गेले कि तिच्या पिशवीत अडकून बसतात. नर-मादी चे मिलन होत नाही व पुनरुत्पादन थांबते.


आपण हे कामगंध सापळे ऑनलाईन खरेदी करू शकता. २५ फनेल ट्रॅप व २५ ल्युअर खरेदी करण्यासठी इथे क्लिक करा.  जर तुमच्याकडे फनेल ट्रॅप असतील तर फक्त २५ ल्युअर देखील खरेदी करू शकता, त्यासाठी इथे क्लिक करा. 

 तरीदेखील फायदा झाला नाही तर निमओईल, बव्हेरिया, स्पिनोसॅड देखील उपलब्ध आहेत.

टिप्पण्या

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गंधक वापरून कमी खर्चात वाढवा उत्पादकता

"मजुरांची" समस्या - नियोजन

मिरचीतील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद