यवतमाळच्या घटनेतून काय धडा घ्याल?
फवारणी करते वेळी झालेल्या विषबाधेमुळे २० पेक्षा अधिक शेतकरी मृत्यू पावले, २५ पेक्षा अधिक आंधळे झाले व ६०० पेक्षा जास्त अत्यवस्थ झाले. अत्यवस्थ शेतकऱ्यास अक्षरशः कॉट ला दोरखंडने बांधून ठेवावे लागले कारण त्यांना अधून मधून जोरदार झटके येत होते. सरकारी दवाखान्यात नेहमी प्रमाणे पुरेशी सोय नव्हती. बेड नव्हते, औषधी नव्हती, नर्स नव्हत्या, डॉक्टर हि नव्हते. प्रत्येक अत्यवस्थ शेतकऱ्याच्या पाठीमागे त्याच्या "हवालदिल" नातेवाइकांचा घोळका होता. फोटोग्राफर, वार्ताहर, नेते, आंदोलक यांच्या घिरट्या घालणे सुरु होते. सरकारी अधिकारी हात वर करून धावत होते. नेते मंडळी जो समोर आला त्याला अनुसरून (नाटकी) वागत होते. कोणतीही घटना घडते तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने घडते. जर ती घटना चांगली असेल तर ती आमच्या मुळे घडली असे सांगणारे खूप सारे समोर येतात व वाईट घडली तर प्रत्येक झण जबाबदारी झटकतो. हि मनुष्य प्रवृत्ती आहे, संपूर्ण जगाच्या पाठीवर हे असेच आहे. खर मात्र वेगळच असत. कुठलीही एक घटना "चांगली असो कि वाईट" ती एकटी कधीच नसते, घटनाक्रमाचा तो एक भाग असतो. हा असा घटनाक्रम देखील एका क्रमात नसतो...


