यवतमाळच्या घटनेतून काय धडा घ्याल?
फवारणी करते वेळी झालेल्या विषबाधेमुळे २० पेक्षा अधिक शेतकरी मृत्यू पावले, २५ पेक्षा अधिक आंधळे झाले व ६०० पेक्षा जास्त अत्यवस्थ झाले. अत्यवस्थ शेतकऱ्यास अक्षरशः कॉट ला दोरखंडने बांधून ठेवावे लागले कारण त्यांना अधून मधून जोरदार झटके येत होते.
सरकारी दवाखान्यात नेहमी प्रमाणे पुरेशी सोय नव्हती. बेड नव्हते, औषधी नव्हती, नर्स नव्हत्या, डॉक्टर हि नव्हते. प्रत्येक अत्यवस्थ शेतकऱ्याच्या पाठीमागे त्याच्या "हवालदिल" नातेवाइकांचा घोळका होता. फोटोग्राफर, वार्ताहर, नेते, आंदोलक यांच्या घिरट्या घालणे सुरु होते. सरकारी अधिकारी हात वर करून धावत होते. नेते मंडळी जो समोर आला त्याला अनुसरून (नाटकी) वागत होते.
कोणतीही घटना घडते तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने घडते. जर ती घटना चांगली असेल तर ती आमच्या मुळे घडली असे सांगणारे खूप सारे समोर येतात व वाईट घडली तर प्रत्येक झण जबाबदारी झटकतो. हि मनुष्य प्रवृत्ती आहे, संपूर्ण जगाच्या पाठीवर हे असेच आहे. खर मात्र वेगळच असत.
कुठलीही एक घटना "चांगली असो कि वाईट" ती एकटी कधीच नसते, घटनाक्रमाचा तो एक भाग असतो. हा असा घटनाक्रम देखील एका क्रमात नसतो, विचित्र पद्धतीने तो एकमेकास जोडला गेलेला असतो. यवतमाळ ची घटना देखील तशीच आहे, ते कसे ते आपण या लेखात बघू.
सर्वप्रथम या फवारणी ची गरज का पडली? हा मुद्दा महत्वाचा आहे. या वर्षी कापसाच्या पेऱ्यात मोठी वाढ झाली. सोबत सोयाबीन. वातावरण चांगले मिळाले, ५ बाय १ वर केलेली लागवड, खूप दाट झाली. शेतातून चालणे देखील मुश्कील झाले. गेल्या अनेक वर्षात बीटी कपाशीत रेफ्युजी चा वापर शेतकरी बांधव करीत नव्हते. अलीकडे रेफ्युजीच्या पाकिटात देखील बीटीचेच बियाणे असल्याच्या तक्रारी देखील आल्या होत्या. एकूणच अमेरिकन बोंड अळी, गुलाबी बोंड अळी, रससोषक किडी डोके वर काढणार हे निश्चित होते. तज्ञांनी तशी भविष्य वाणी देखील अगोदरच केलेली होती.
कुठल्याही शेतकऱ्याने किंवा कृषीसमूहाने किंवा ग्रामपंचायतीने "एकात्मिक कीडनियंत्रण" करायचे मनावर घेतले नाही. चिकट सापळे, कामगंध सापळे, शिवार निरीक्षण यातून येणाऱ्या किडीचा अंदाज बांधता येतो, कीडीची प्रजोत्पती हानीकारक पातळीच्या वर जाणार नाही याची खबरदारी घेता येते. योग्य काळजी घेतल्यास कीड हानिकारक पातळी ला ओलांडू शकत नाही. दुर्दैव हेच कि आपला देश कृषीप्रधान असून देखील हे कुणीच विचारात घेत नाही.
फवारणी करते वेळी काही काळज्या निश्चित पणे घ्याव्या लागतात. योग्य कीटकनाशकाची निवड, योग्य फवारणी यंत्राची निवड, योग्य वेळेची निवड व सुरक्षा साधनांचा वापर हे व्हायलाच हवे. यातील प्रत्येक मुद्दा विस्तृतपणे एका लेखात लिहिणे शक्य नाही (एग्रोडॅड च्या या ब्लॉगवर आपणास इतर लेख मिळतीलच). यातील एकही गोष्ट पाळली जात नाही ये प्रत्येक वाचक मान्य करेल.
कीटकनाशकाची निवड करते वेळी सेन्ट्रल इंसेक्टीसाइड बोर्डाच्या शिफारसी ध्यानात घेणे अपरीहार्य आहे. दुर्देवाने आपण कंपनीप्रतिनिधी, कृषीसेवाकेंद्र या विक्री-प्रतिनिधींचे सल्ले घेतो. बोर्डाच्या शिफारसी "लाउड एंड क्लीअर" अश्या पद्धतीने शेतकऱ्यापर्यंत का येत नाही? खरे तर शासनाने यासाठी "आपण भरलेल्या करातून", भली मोठी यंत्रणा उभी केली आहे. या यंत्रणेची नैतिक जबाबदारी कुठे शेण खाते?
कुठलेही कीटकनाशक अथवा खत असो, फवारणी साठी सकाळी दहा पूर्वी व सायंकाळी चार नंतर फवारणी करायला हवी. दुपारच्या वेळी फवारणी करूच नये. फवारणी करते वेळी वाऱ्याची दिशा लक्षात घ्यायला हवी, फवारणी यंत्रातून उडणारा फवारा हवेत वीरायला नको, तो पानवरच पडायला हवा. त्यासाठी योग्य नोझल ची निवड केली जायला हवी. फवारणी करते वेळी काही खायला-प्यायला नको. डोक्यावर टोपी, डोळ्यावर चष्मा, नाकावर मास्क, हातात हातमोजे असा पोशाख असायलाच हवा. हे "काळ्या दगडावरची रेख" नियम आहे. इथे केलेल्या चुकीला दुसरा कुठलाही व्यक्ती जबाबदार असूच शकत नाही.
एकूणच "यवतमाळ" मधील या दुर्दैवी घटनेतून शेतकरी बांधवांना एक नवा धडा मिळाला....
"स्वयंसिद्धी ला पर्याय नाही"
इतरांकडे बोट दाखवून स्वत:चा बचाव करता येणार नाही. शेतकरी बांधवांनी नियमित वाचन करून ज्ञान अर्जित करावे व आपले निर्णय स्वत: घ्यावे, जबाबदारी ने वागावे. एग्रोडॅड तुमच्या सदैव सोबत नसेल पण शक्य तीकते प्रयत्न नक्की करू.
आपण आमची सदस्यता घ्यायला व ई-मेल नियमित चेक करायला विसरू नका. आपण हा लेख संग्रही ठेवावा व इतर शेतकरी बांधवासोबत शेअर करा हि विनंती.
सरकारी दवाखान्यात नेहमी प्रमाणे पुरेशी सोय नव्हती. बेड नव्हते, औषधी नव्हती, नर्स नव्हत्या, डॉक्टर हि नव्हते. प्रत्येक अत्यवस्थ शेतकऱ्याच्या पाठीमागे त्याच्या "हवालदिल" नातेवाइकांचा घोळका होता. फोटोग्राफर, वार्ताहर, नेते, आंदोलक यांच्या घिरट्या घालणे सुरु होते. सरकारी अधिकारी हात वर करून धावत होते. नेते मंडळी जो समोर आला त्याला अनुसरून (नाटकी) वागत होते.
कोणतीही घटना घडते तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने घडते. जर ती घटना चांगली असेल तर ती आमच्या मुळे घडली असे सांगणारे खूप सारे समोर येतात व वाईट घडली तर प्रत्येक झण जबाबदारी झटकतो. हि मनुष्य प्रवृत्ती आहे, संपूर्ण जगाच्या पाठीवर हे असेच आहे. खर मात्र वेगळच असत.
कुठलीही एक घटना "चांगली असो कि वाईट" ती एकटी कधीच नसते, घटनाक्रमाचा तो एक भाग असतो. हा असा घटनाक्रम देखील एका क्रमात नसतो, विचित्र पद्धतीने तो एकमेकास जोडला गेलेला असतो. यवतमाळ ची घटना देखील तशीच आहे, ते कसे ते आपण या लेखात बघू.
सर्वप्रथम या फवारणी ची गरज का पडली? हा मुद्दा महत्वाचा आहे. या वर्षी कापसाच्या पेऱ्यात मोठी वाढ झाली. सोबत सोयाबीन. वातावरण चांगले मिळाले, ५ बाय १ वर केलेली लागवड, खूप दाट झाली. शेतातून चालणे देखील मुश्कील झाले. गेल्या अनेक वर्षात बीटी कपाशीत रेफ्युजी चा वापर शेतकरी बांधव करीत नव्हते. अलीकडे रेफ्युजीच्या पाकिटात देखील बीटीचेच बियाणे असल्याच्या तक्रारी देखील आल्या होत्या. एकूणच अमेरिकन बोंड अळी, गुलाबी बोंड अळी, रससोषक किडी डोके वर काढणार हे निश्चित होते. तज्ञांनी तशी भविष्य वाणी देखील अगोदरच केलेली होती.

फवारणी करते वेळी काही काळज्या निश्चित पणे घ्याव्या लागतात. योग्य कीटकनाशकाची निवड, योग्य फवारणी यंत्राची निवड, योग्य वेळेची निवड व सुरक्षा साधनांचा वापर हे व्हायलाच हवे. यातील प्रत्येक मुद्दा विस्तृतपणे एका लेखात लिहिणे शक्य नाही (एग्रोडॅड च्या या ब्लॉगवर आपणास इतर लेख मिळतीलच). यातील एकही गोष्ट पाळली जात नाही ये प्रत्येक वाचक मान्य करेल.
कीटकनाशकाची निवड करते वेळी सेन्ट्रल इंसेक्टीसाइड बोर्डाच्या शिफारसी ध्यानात घेणे अपरीहार्य आहे. दुर्देवाने आपण कंपनीप्रतिनिधी, कृषीसेवाकेंद्र या विक्री-प्रतिनिधींचे सल्ले घेतो. बोर्डाच्या शिफारसी "लाउड एंड क्लीअर" अश्या पद्धतीने शेतकऱ्यापर्यंत का येत नाही? खरे तर शासनाने यासाठी "आपण भरलेल्या करातून", भली मोठी यंत्रणा उभी केली आहे. या यंत्रणेची नैतिक जबाबदारी कुठे शेण खाते?
कृषी रसायने व त्यांचा वापर याबद्दल विस्तृत माहिती देणारे पुस्तक, फोटोवर क्लिक करून खरेदी करू शकता |
एकूणच "यवतमाळ" मधील या दुर्दैवी घटनेतून शेतकरी बांधवांना एक नवा धडा मिळाला....
"स्वयंसिद्धी ला पर्याय नाही"
इतरांकडे बोट दाखवून स्वत:चा बचाव करता येणार नाही. शेतकरी बांधवांनी नियमित वाचन करून ज्ञान अर्जित करावे व आपले निर्णय स्वत: घ्यावे, जबाबदारी ने वागावे. एग्रोडॅड तुमच्या सदैव सोबत नसेल पण शक्य तीकते प्रयत्न नक्की करू.
आपण आमची सदस्यता घ्यायला व ई-मेल नियमित चेक करायला विसरू नका. आपण हा लेख संग्रही ठेवावा व इतर शेतकरी बांधवासोबत शेअर करा हि विनंती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा