फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

तुम्ही एग्रोडॅड चे वाचक आहात का?

एग्रोडॅड या ब्लॉगवर शेतकरी बांधवांसाठी नियमितपणे लेख प्रसारित केले जातात. या लेखांचे विषय वैविध्यपूर्ण आहेत.

आजचा शेतकरी ज्ञानसागराच्या काठावर उभा आहे. थोडा गुगलवर सर्च केला कि हवी ती माहिती उपलब्ध होते. कोणत्याही भाषेतील माहिती हव्या त्या भाषेत अनुवादित करून मिळते. इतकेच नाही तर आज प्रत्येक विषयावर पुस्तके उपलब्ध आहेत.

शेतीचे उत्पन्न वाढावे म्हणून आज पूर्वीपेक्षा अनेक पटीने अधिक चांगली साधने उपलब्ध आहेत. सुधारित बी, खते, कीटकनाशके, संजीवके, जलव्यवस्थापन सामुग्री, तणव्यवस्थापन सामुग्री,   लहान मोठी हत्यारे, वाहने, बाजार पेठा अशी हि न संपणारी साधनांची यादीच आहे!

खुली बाजारपेठ, धरणे, पाट, वीज, कृषीकर्ज, पीकविमा या माध्यमातून सरकार देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यास मदत करत आहे.

इतके सारे असूनही आज शेतकरी आत्महत्या हा विषय रोजचा झाला आहे. तरुण मंडळी शेतीकडे पाठफिरवू लागली आहे. इतकेच काय, शेतकऱ्यांचे योग्य वयात लग्न होणे देखील दुरापास्त होऊन बसले आहे.

हे चित्र विचार करायला भाग पाडते कि "आजचा शेतकरी" नेमका कमी कुठे पडतो?

एकीकडे इतकी विदारक स्थिती असून सुद्धा सर्वच शेतकरी बांधव बेहाल आहेत असे अजिबात नाही. काही शेतकरी बांधव "गाडी-बंगला" मोठ्या आरामात मेंटेन करतात. विदेशवारी करणारे, शेअर बाजारात उलाढाल करणारे शेतकरी देखील काही कमी नाहीत.

यशस्वी व अपयशी शेतकऱ्यात नेमका काय फरक आहे? सोन्यात आणि चांदीत फरक सांगण्याइतके हे सोपे नाही. पाची बोटे सारखी नसतात. परिस्थिती देखील सारखी नसते. अपयशी शेतकऱ्यास यशस्वी बनायचे असेल तर परीसस्पर्शाने काम होण्यासारखे नाही, हि एक लांबलचक प्रक्रिया आहे.

एग्रोडॅड या ब्लॉगवर प्रसारित केले जाणारे लेख वेळोवेळी शेतकरी बांधवास विविध विचारांचा पुरवठा करणारे आहेत. फक्त शेतीच नाही तर विचार, आचार, व्यवहार, कृतीशीलता, व्यसनमुक्ती, आर्थिकबाजू, कायदे, बाजारपेठ, नवे संशोधन अश्या अनेक विषयावरील लेख नियमित वाचायला मिळतील.  हे लेख हळूहळू परिवर्तन निर्माण करतील, असा आमचा विश्वास आहे.

मित्रहो, हे लेख नियमित वाचनासाठी आपण आमच्या ब्लॉग चे सदस्य होऊ शकतात, त्याला नियमित फॉलो करू शकतात. प्रत्येक प्रकाशित लेख आमच्या फेसबुक पेजवर देखील प्रसारित होईलच.  तुम्ही फक्त एकच करा, दिवसातून एकदा तरी या ब्लॉगला भेट द्या. फेसबुक पेज लाईक केले तर आमचे लेख आपोआप आपला न्यूजफीड मध्ये येतील. सदस्य बनलात तर प्रत्येक ब्लॉग प्रकाशित झाल्यावर तुम्हाला तसा ई-मेल येईल.

तुम्हाला काय माहिती हवी? तुम्हाला एखादा मुद्दा खटकला का? काही आवडले का? आपण हे सर्व टिप्पणी द्वारे कळवू शकता.

आपल्याला आवडलेला लेख आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करू शकता. 

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गंधक वापरून कमी खर्चात वाढवा उत्पादकता

"मजुरांची" समस्या - नियोजन

मिरचीतील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद