गंधक वापरून कमी खर्चात वाढवा उत्पादकता
शेतकरी मित्रहो, नत्र-स्पुरद व पालाश युक्त खतांचा वापर आपण जितका लक्ष देवून करतो तितकेच लक्ष गंधकाकडे देणे आवश्यक आहे. खरे तर गंधक किती लागते याचा अंदाज शेतकरी बांधव लावू शकत नाही. म्हणून गुणोत्तर पद्धतीने गंधकाची गरज समजावून घेवू. जर तुमच्या पिकला ६ किलो नत्र (१४.६ किलो युरिया) लागत असेल तर कमीत कमी १ कलो गंधक लागेलच. इतके गंधक का लागते व आज पर्यंत याची इतकी गरज का भासली नाही हा प्रश्न आपल्या मनात उभा रहाणे साहजिक आहे. मित्रहो, आजपर्यंतच्या शेतीच्या पद्धतीत जमिनीची धूप कमी व्हायची. शुद्ध खतांचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हता. कमी उत्पादकतेची पिके घेतली जात होती व सर्वात महत्वाचे म्हणजे कंपोस्ट चे प्रमाण खूप होते. आपल्या पद्धतीत अमुलाग्र बदल झाल्याने गंधकाचा वापर वाढवणे क्रमप्राप्त आहे. पिकातील गंधकाची कमतरता सहज दिसून येते. पिकाची वाढ खुंटते, ते कमजोर दिसते (टेकू द्यावे लागतात), पाने पिवळी पडू लागतात, मुळांवर (द्विदलवर्गीय पिकात) गाठी कमी असतात, दाणे भरण्यास वेळ लागतो व फळे पूर्णपणे पिकत नाहीत. पिकपोषणा पलीकडे देखील गंधकाचे दोन महत्वाचे फायदे आहेत. पहिला म्हणजे बुरशी व लाल...