मिरचीतील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे
मिरचीच्या उभ्या पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखावी हा प्रश्न आपल्यासमोर अनेकदा उभा रहातो. शेतात फिरता फिरता काही लक्षणांचा अभ्यास आपणही करू शकता, त्यासाठी खाली दिलेली कमतरतेची लक्षणे जाणून घ्या.
नत्र: नत्राची कमतरता झाल्यास पिकाची वाढ खुंटत जाते. पाने खालच्या शिरांच्या बाजूने काठावर कोरडे पडायला लागतात. देठ खालच्या दिशेने पडतात. फुलांची व फळांची संख्या कमी होते. अनेक वेळेला फळे विकसितच होत नाही, किंवा झाले तर त्यांचा आकार वेडा वाकडा होतो.
स्पुरद: मिरची पिकात स्पुरदाची कमतरता झाल्यास वाढ खुंटते. हात लावल्यास पाने कडव व कुचके होतात. फुले विकृत असतात. फुलांची संख्या कमी असते व चार पाच पैकी एखाच्येच फळ बनते. फळे देखील निट विकसित होत नाहीत, त्यात बियांची संख्या फार कमी असते. मुळांचा विकास देखील थांबतो.
पालाश: पानांच्या शिरांमध्ये पिवळे डाग पडतात. पहिले खालच्या पानावर. ठिपक्याभोवती चा भाग व शिरांचा रंग बदलत नाही. त्यानंतर हे ठिपके हलके होतात. फार थोड्या मिरच्या लागतात, त्यांची साईज देखील खूप छोटी असते.
मॅग्नेशियम: पानाच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो पण शिरा हिरव्या रहातात. जुन्या पानांवर पहिले परिणाम होतो. कधी कधी पोटाश जास्त झाल्यामुले देखील मॅग्नेशियम ची कमतरता होते. उष्ण वातावणात देखील मॅग्नेशियम ची कमतरता दिसून येते.
क्लोराईड: पाने तांबूस पिवळे होऊन मरतात. मुळे खुरडतात व टोकाकडील भाग जाड होतो.
मॅंगनीज: वरील पानाच्या शिरान्मधील भागावर पिवळे डाग पडतात
झिंक: पाने अरुंद व छोटे होतात
तांबे: शाखीय वाढीच्या शेवटच्या टप्प्यात तांब्याची कमतरता होते. पानाच्या कडा गुंधाळल्या जावून कोरड्या पडतात. पाने व फळे अरुंद होऊन चौकोनी बनतात.
मोलाब्द: पालवी फिक्कट पिवळी- हिरवी होते. वाढ थोडी खुंटते. मोलाब्दाची कमतरता बहुतेक वेळा आम्ल धर्मीय मृदेतच येते.
गंधक: नवीन पालवी पिवळी पडते.
पानांचा आकार छोटा होतो
कॅल्शियम: कॅल्शियम च्या कमतरतेमुळे
मिरची टोकावर सडते. उष्ण वातावरण, क्षारपड जमीन, पिकाची वेगवान वाढ व पाण्याची
कमतरता या मुळे, मूळाकडून
शोषले जाणारे कॅल्शियम कमी पडते व लक्षणे दिसतात. कॅलनेट च्या फवारणी ने ही अडचण
दूर होते.
बोरान: बोरान च्या कमतरतेची लक्षणे अचानक
दिसू लागतात. खालची पाने आतल्या बाजुने वळतात/गुंधाळली जातात, वाढ खुंटते, खोड जाड पण ठेंगणे पडते.
टोक गळून पडते, खालून
वर पाने पिवळे पडू लागतात. फुलांची संख्या कमी असते व फळे देखील कमी बसतात. दर
कमतरता तीव्र असली तर वाढणारी टोके मरतात व सडतात, पानांचा आकार बिघडतो.
लोह: लोहाची कमतरता वाढीच्या
शेवटच्या टप्यात जाणवते. नवीन पालवी फिकट होऊन शिरांमधील भाग पिवळी पडतो. शिरा
हिरव्या रहातात.
पुस्तकासारखा दुसरा गुरु नाही हे आपण जाणतातच पण नेमके गरजेचे पुस्तक मिळत नाही. म्हणून एग्रोडॅड इथे आपल्यासाठी उपयुक्त पुस्तकांची यादी देत आहे. आपण ऑनलाईन खरेदी करू शकतात.