निसर्गचक्रात "कामप्रकिया" महत्वाची
आपल्या पंचइंद्रिया पैकी “गंधग्रहण क्षमता” अतिशय विस्मयकारक आहे. मंदिरातील अगरबत्ती, स्नानगृहातील साबण, शृंगारातील सुगंधी तेल-पावडर, बगलेत व कपड्यावर फवारण्याचा सुगंध या पासून प्रसन्नता, एकाग्रता, आकर्षण व चंचलता असे विविध भाव निर्माण होतात.
निसर्गाने गंधाचा पुरेपूर उपयोग केलेला दिसतो. धोक्याच्या ठिकाणी दर्पनिर्मिती होते तर चागल्या ठिकाणी सुगंध निर्माण होतो. मसाल्याच्या वासाने भूक वाढते तर दर्प झाल्यास भूक कमी होते. परागीभवन व्हावे म्हणून फुले रंग व मधुरसासोबत गंध निर्मिती करतात त्यामुळे फुलपाखरू आकर्षित होऊन परागीभवन घडून येते.
निसर्गचक्रात "कामप्रकिया" सर्वात महत्वाची आहे. स्टारफिश सारखे प्राणी सोडले तर बहुतेक सर्व प्राण्यात प्रजननासाठी "नर-मादा" मिलनाची प्रक्रिया महत्वाची आहे. सातत्याने चांगला वंश निर्माण व्हावा म्हणून प्रत्येक प्राणी मिलनासाठी चांगला दर्जेदार जोडीदार निवडण्यावर भर देतो. कामप्रक्रियेचे महत्व असल्याने निसर्गाने यात देखील गंधग्रहण क्षमतेचा चांगला उपयोग करून घेतलेला आहे.
कस्तुरीमृग कळपात रहात नाहीत, अन्नासाठी विस्तृत क्षेत्रात एकटे भटकत रहातात. प्रजननासाठी ते सुगंध निर्मिती करून मादीस आकर्षित करून घेतात. कामक्रियेसाठी निर्माण केलेल्या या वासास “कामगंध” असे संबोधले जाते. दुर्दैवाने कस्तुरीमृगाचा हा कामगंध "माणसालापण येतो", त्यामुळे कस्तूरीमृगाची शिकार होते. आज कस्तुरीमृगाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे.
नाग डूक धरतो असे आपल्याकडे मानले जाते. अनेकांना याचा अनुभव येतो. यास कारण देखील “कामगंधच” असतो. नागीण जेव्हा माजावर येते तेव्हा ती एका पेक्षा अधिक नरांशी संबध ठेवते. यासाठी ती कामगंध सोडत फिरते. नेमकी ती याच वेळी मारली गेली तर तिच्या कामगंधाचा मागोवा घेत नर तिथे येतात. हा वास आपल्याला येत नाही, त्यामुळे नाग डूक धरतो असा गैरसमज निर्माण झाला आहे. किंगकोब्राच्या अभ्यासात मादीच्या शोधात नर एकाच आठवड्यात शेकडो किलोमीटर अंतर पार करतो असे दिसून आले आहे.
कामगंधाचा वापर कीटकवर्गात सर्वात मोठ्या प्रमाणात अढळतो. प्रत्येक प्रजातीचे कीटक विशीष्ट प्रकारचा कामगंध सोडतात त्यामुळे त्याच प्रजातीचे कीटक आकर्षित होतात व मिलन घंडून येते. वैज्ञानिकांनी याचा अभ्यास करून कामगंध सापळ्यांची निर्मिती केलेली आहे. हे कामगंध सापळे कीटकांच्या अभ्यासात व नियंत्रणात मोठ्या प्रमाणात वापरले जावू लागले आहेत. यांच्या वापराने कीटकनियंत्रणाचा खर्च कमी होतो, मित्र कीटक मारले जात नाहीत, विषारी कीटकनाशके वापरायची गरज रहात नाही, फवारणी च्या मजुरीत बचत होते, पर्यावरणाचा ऱ्हास टळतो.
फळमाशीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळा अतिशय उपयोगी ठरतो. याचा उपयोग आंबा, पेरू, काकडी, गिलके, दोडके, कारले, टरबूज, खरबूज, दुधीभोपळा, भोपळा, गंगाफळ याच्या शेतात करतात. पिक फुलावर आले कि ६ ते ८ कामगंध सापळे शेतात लावावे. या सापळ्यात नर येवून मरतात. मादेस मिलनासाठी नर न मिळाल्यामुळे ती प्रजनन करू शकत नाही.
गेल्या काही वर्षात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव पुन्हा दिसून येवू लागला आहे. पर्यावरणातील बदल, क्षेत्रातील कापूस पिकाचे प्रमाण जास्त असणे, पुन्हा पुन्हा कापूसच लावणे, रेफ्युजीचा वापर न करणे यातून बोंडअळी मधील बी.टी. जनुकास प्रतिकारक्षम प्रजाती वाढीस लागली. बोंडअळी चा प्रादुर्भाव झाल्यावर प्रत्यक्ष नुकसानीचा अंदाज यायला वेळ लागतो. अनेक शेतकरी बांधव योग्य निरीक्षण घेण्यात कमी पडतात त्यामुळे अळी चे चांगले प्रजनन होते व कीड नियंत्रणाबाहेर जावून उत्पादनात गंभीर घट होते.
निरीक्षण व नियंत्रण सोपे जावे या हेतूने कामगंध सापळा बाजारात आणला आहे. एकरी कमीत कमी १० सापळे लावावेत. जर सापळ्याच्या पिशवीत दिवसाकाठी ४ ते ५ पतंग येवून अडकले तर लागलीच फवारणी चे नियोजन करावे. तूर, मुग, चवळी, वाटाणे, चणा, ज्वारी, बाजरी, मका, गहू, करडई, कपाशी, टोमॅटो, कारली, मिरचीत, सुर्यफुल व झेंडू इत्त्यादी पिकात वर दिलेला सापळा वापरता येतो. याच पिकात येणाऱ्या तंबाखू अळी साठी खाली दिलेला कामगंध सापळा वापरता येतो.

निरीक्षण व नियंत्रण सोपे जावे या हेतूने कामगंध सापळा बाजारात आणला आहे. एकरी कमीत कमी १० सापळे लावावेत. जर सापळ्याच्या पिशवीत दिवसाकाठी ४ ते ५ पतंग येवून अडकले तर लागलीच फवारणी चे नियोजन करावे. तूर, मुग, चवळी, वाटाणे, चणा, ज्वारी, बाजरी, मका, गहू, करडई, कपाशी, टोमॅटो, कारली, मिरचीत, सुर्यफुल व झेंडू इत्त्यादी पिकात वर दिलेला सापळा वापरता येतो. याच पिकात येणाऱ्या तंबाखू अळी साठी खाली दिलेला कामगंध सापळा वापरता येतो.

वांगी व बटाट्यात येणारया फळ व खोड पोखरणारया अळीचे नियंत्रण करण्यासाठी देखील कामगंध सापळा वापराला जावू शकतो. त्यासाठी खाली लिंक देता आहे. त्यावर क्लिक करून आपण हे कामगंध सापळे खरेदी करू शकतात.

भातातील खोड पोखरणारी अळी देखील कामगंध सापळ्याच्या मदतीने नियंत्रणात आणता येते. तिचा कामगंध सापळा खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावी.

कामगंध वापरून कीड नियंत्रण केल्याने रासायनिक कीटकनाशकाचा खरच मोठ्या प्रमाणात वाचतो. शेतकरी बांधवाचा फवारणीशी संपर्क कमी होतो. हि पद्धती निसर्गापासून प्रेरित आहे व पर्यावरणास पूरक आहे. आपण याचा लाभ नक्की घ्यावा.
बाकी तुमची मर्जी!
लैंगिक शिक्षणातून मिळवा स्पष्ट सुधृड विचारधन
तुम्हाला एग्रोडॅड चा ब्लॉग आवडला का? ब्लॉगचे सदस्यत्व घ्यायला विसरू नका. तुम्ही हा ब्लॉग तुमच्या मित्रांसोबत शेअर देखील करू शकता, त्यासाठी शेअर चे बटन दाबा.
हा ब्लॉग कसा वाटला? हे एग्रोडॅड व इतरांना आवर्जून सांगा, त्यासाठी आपली टिप्पणी प्रविष्ट करायला विसरू नका.
Mahiti chhan ahe pun kimti jast ahet
उत्तर द्याहटवा