आग रामेश्वरी व बंब सोमेश्वरी: सुतकृमींचा प्रतिबंध
मुळांवर सुतकृमी मुळे तयार झालेल्या गाठी
सुतकृमी नाशके: सुतकृमी नाशकात मिथाइल ब्रोमाइड, १-३ डायक्लोरोप्रोपेन अशा धुरडण्या, तसेच, थायनोझीन, इथोप्रोफॉस अशा आरगॅनोफाँसफेटस् व अल्डिकार्ब, ओक्सामिल अशा कार्बामटेस् चा अंतर्भाव होतो. ही रासायाने महागडी, पर्यावरणाला घातक तर आहेतच पण तितकिशी प्रभावी देखील नाही.
सुतकृमींचा प्रतिबंध: सुतकृमी नाशकांचा वापर करणे खर्चाचे व अवघड असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना फायद्याची ठरते. अश्या सर्व योजनांचा उद्देश कृमिंचा संपूर्ण नाश करण्यापेक्षा त्यांची संख्या घातक पातळीच्या आत येईल व वाढून पुन्हा घातक पातळीच्या वर जाणार नाही असा असावा. जैविक, भौतीक व रासायनिक व्यवस्थापनातील विवीध पद्धतींचा एकात्मिक वापराने हे सहज शक्य आहे.
- उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट कारावी
- उन्हाळ्यात प्लँस्टिकच्या आच्छादनाने तापमानात चांगली वाढ होउन इतर बुराशिजान्य व जीवणुजन्य रोगांसोबत जंतुंचेपण नियंत्रण होते. तण ही कमी होते.
- पिकांची फेरपालट करावी.
- फेरपालट करताना द्विदल पिकानंतर एकदल पिके घेणे फायद्याचे ठरते.
- निवडलेले, रोगरहीत, प्रतीकारक्षम बियाणे वापरावे.
- झेंडू पिकाची मुळे सुतकृमीनाशक सोडतात. त्यामुळे पिकांमध्ये झेंडूचे आंतरपीक म्हणून लागवड करावी.
- निंबोली, एरंडी किंवा करंज पेंड १५०० ते २००० किलो प्रती हेक्टहरी न चुकता वापरावी
- ट्रायकोडर्मा, शूडोमोनास, बॅसिलस हे सूक्ष्मजीव अनेक विषारी पदार्थ स्त्रवतात. या जीवाणूंचा उपयोग केल्याने प्रभावी व्यवस्थापन साधले जाऊ शकते.
- कंपोस्ट चा वापर करताना ते संपूर्ण कुजलेले असून प्रक्रियेत त्यातील घातक जीवांचा नाश झालेला आहे याची खात्री करावी.
- रोपवाटिकेत, वाफ्यात तीन टक्के कार्बोफ्युरान किंवा 10 टक्के फोरेट दाणेदार औषध हेक्टरी अनुक्रमे 66 किलो किंवा 20 किलो या प्रमाणात मिसळावे.
बायोसार या कंपनीच्या रुटसेट या बुरशीनाशक व कीटकनाशक उत्पादनाची लिंक खाली देत आहे. यात निसर्गात अढळणारे पेसिलोमायसेस व मेटारायझीअम या दोन बुरशी तसेच शुडोमोनास या जीवाणूचा समावेश आहे. पिकाला सुतकृमी पासून वाचवू शकते. एकरी गरजेनुसार १ ते ३ किलोचा डोस, भरखतात मिसळून द्यावा.
पुस्तकासारखा मित्र - गुरु दुसरा कुणी नाही. पिकाचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला त्यासंबंधी चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. एव्हाना या कामासाठी हजारो रुपये आपण खर्च करतो. खाली दिलेल्या लिंकवरून "पिक संरक्षण सल्लागार हे पुस्तक मागवू शकता.