फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

जैवनियंत्रकांचा शिरोमणी: शूडोमोनास


"शूडोमोनास" हा एक जीवाणू मातीत, पाल्यापाचोळ्यात, ताज्या व खाऱ्या पाण्यात आढळून येतो. तो चकाकीदार हिरवट-पिवळा पदार्थ स्त्रवतो.  "शूडोमोनस एईरुजीनोसा" ही प्रजाती आपल्या जखमेत निळ्या रंगाचा पस बनवते. याच्या "शूडोमोनस सिरींजी" सारख्या काही प्रजाती वनस्पतींसाठी अतिशय घातक असतात. पण "शुडोमोनास फ्लूरोसन्स" हि प्रजाती वनस्पती साठी अतिशय उपयोगी असल्याचे सिद्ध झालेले आहे.

 मागील 35-40 वर्षात मात्र वनस्पतींच्या मुळापसुन जितके जीवाणू ओळखले गेले त्यात सर्वोत्तम जैवनियंत्रक जीवाणू म्हणून "शूडोमोनासला" पसंती मिळाली आहे. वनस्पतींच्या पानांवर व मुळांतून स्रवत असलेले सेंद्रिय आम्ल व प्रथीनआम्लावर ताव मारता यावा म्हणुन हा जीवाणू पृष्ठभागावरील खाचांमधे आपली वसाहत निर्माण करतो. तसे करतांना तो इतर जीवाणूंच्या विकासात अडथळे निर्माण करतो. अतिशय कमी मात्रेत बुरशीला व जीवाणुला रोखणारे अथवा मारणारे विष (प्रतीजैविक पदार्थ) निर्माण करतो. भोवतीच्या लोहाला सिडेरोफोर या तत्वाच्या माध्यमाने आरक्षित करून घेतो त्यामुळे परिसरातील इतर जीवांना लोहाची कमतरता निर्माण होते व त्यांचे जगणे मुश्कील होते.

शुडोमोनास आपल्या निकटवर्तीय-समधर्मी मित्रांशी रासायनिक-संकेत भाषेत संवाद साधून मोर्चेबांधणी करतो. शत्रु-विरूध्दच्या आपल्या जैवरासायनिक युध्दाला बळकटी देतो. यालाच इंग्रजीत क्वारम सेन्सिंग असे म्हटले आहे.

वनस्पतींशी आपले नाते घट्ट करण्यासाठी शुदोमोनास वनस्पतींना सिडेरोफोर द्वारा आरक्षित लोह पुरवतो, ओक्झीनसारख्या संप्रेरकाची निर्मिती करून मुळाच्य़ा वाढीचा जोम वाढवतो.

शुडोमोनासवर आधारित जैवनियंत्रक बनवण्यासाठी सेन्ट्रल इनसेक्टीसाईड बोर्डाकडून प्रमाणित स्ट्रेनचा उपयोग करून लिक्विड कल्चर तयार केला जातो. या कल्चरला टाल्कम पावडर मध्ये योग्य प्रमाणात मिसळून जैवनियंत्रक तयार होते. या प्रक्रियेतील प्रत्येक पायरी किचकट नियम पळून पूर्ण केली जाते.

पानावरील ठिपके, ताम्बोरा, भुरी, करपा, कॉलर रोट, खोड-मूळ सड अश्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी शुडोमोनास वर आधारित जैवनियंत्रकाचा वापर करता येतो. वापरासाठी बियाणे प्रक्रिया, पुनर्लागवड करते वेळी मुळांची प्रक्रिया, आळवणी, फवारणी या पद्धतींचा वापर करावा. 

जैवनियंत्रणाव्यतिरिक्त शुदोमोनास च्या वापराने पिकाचे अंकुरण सुधारते, पिकात रोगाविरुद्ध प्रतिकार क्षमता विकसित होते, मुळांची  चांगली वाढ होते.

अनेक वेळेला शेतकऱ्यास असे वाटते कि हे उत्पादन कोणकोणत्या पिकात वापरावे? शुडोमोनास चा उपयोग प्रत्येक पिकात केला जावू शकतो.

खाली दोन लिंक देत आहे त्यावर क्लिक करून आपण ऑनलाइन खरेदी करू शकता. इतर कुठल्याही रासायनिक औषधापेक्षा यांच्या किमती वाजवी आहेत. या उत्पादनाची साठवण थंड, कोरड्या जागी, सूर्यप्रकाश व उष्णतेपासून दूर करावी.


एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गंधक वापरून कमी खर्चात वाढवा उत्पादकता

"मजुरांची" समस्या - नियोजन

मिरचीतील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद