पोस्ट्स

फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

नक्की वाचा..

वांग्यात हि चूक करू शकते मोठे नुकसान!

इमेज
फळ आणि शेंडा पोखरणारी कीड वांगे उत्पादक शेतकरी बांधवासाठी मोठी डोकेदुखी ठरते. काही करून या किडीचे नियंत्रण झालेच पाहिजे या विचाराने तो भारंभार कीटकनाशक फवारणी करतो. काही शेतकरी बांधव वांग्यात मक्षिकारी सापळेहि लावतात! एव्हडे सारे करून कीड नियंत्रणात येत नाही. एकीकडे उत्पादन खर्च खूप मोठा होऊन बसतो व दुसरीकडे काढणी केलेल्या मालाचा दर्जा दुय्यम असतो. असा माल विक्रीदेखील होत नाही. एव्हढे मोठे नुकसान कोणत्या चुकी मुळे होते? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यापूर्वी आपण वांग्यावर दोन लेख प्रसिद्ध केले आहेत, ते आपण वाचले आहेत का? नसतील तर या लेखाच्या खाली तुम्हाला या दोघी लेखाच्या लिंक मिळतील. ते लेख वाचायला विसरू नका.  १.  वांग्यातील फळ व शेंडे पोखरणारया अळीचे कसे करणार नियंत्रण? २.  वांग्याचे कीडनियंत्रण करा स्वस्तात आता मूळ मुद्याकडे वळू... बेतहाशा कीटकनाशक फवारणी केल्याने खूप फायद्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे . सर्वप्रथम किडीचे सर्वेक्षण करून आर्थिक नुकसान करण्याची पातळी किडीने गाठली आहे का? हे पाहावे. त्यासाठी कामगंध सापळे लावावेत व एका दिवसात ५ किंवा त्यापेक्...

लावा कारली आणि दोडका, होईल मोठा तुमचा पैका!

इमेज
व्यापारी शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठा चढ-उतार होत असतो. अशा आर्थिक परिस्थितीचा कौटुंबिक बजेटला धक्का लागू नये म्हणून अभ्यासू शेतकरी, शेतीच्या एका भागात वेलवर्गीय भाज्यांची शेती करतात. यात कारले व दोडके हि पिके अग्रणी आहेत कारण शहरी व स्थानिक बाजारात या फळभाज्यांना वर्षभर चांगली मागणी असते.   हवामान:  या दोन्‍ही पिकांची पावसाळी व उन्‍हाळी हंगामात लागवड करतात. कारल्‍यास उष्‍ण व दमट हवामान तर दोडक्‍यास समशितोष्‍ण व दमट हवामान मानवते. दोडका थोडीशी थंडी सहन करु शकतो, मात्र कारल्याच्या वेलीवर थंडीचा वाईट परिणाम होतो. जमीन:  भुसभूशीत चांगला निचरा असणारी भारी ते मध्‍यम जमन निवडावी, चोपण अथवा चिबड जमिनीत ही पिके घेऊ नयेत. पूर्वमशागत व लागवड: जमीनीची उभी आडवी नांगरट करून , काडी कचरा वेचून शेत स्‍वच्‍छ करावे. प्रति हेक्‍टरी 100 ते 150 क्विंटल चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोष्ट  हुमणासूर  मध्ये  मिसळून शेतात पसरवावे.   हुमणासूर हे उत्तम दर्जाचे मृदा सुधारक असून मातीतील उपयोगी सूक्ष्मजीवांची संख्या वाढवतात तसेच हुमणी, सुतकृमी, वाळवी यांची संख्या...

मल्चफिल्म ची निवड व फायदा

इमेज
बदलत्या युगातील शेतकरी नव-नवीन पद्धती वापरून अनेक पारंपारिक समस्या मोडीत काढतो. वाढणारे तण, पाण्याची कमतरता, महागडी मजुरी, सूर्याच्या प्रखरतेने होणारे नुकसान, सुतकृमींचा वाढता त्रास अशा अनेक समस्यांवर कमीअधिक प्रमाणात फायदेशीर ठरणारा आच्छादनाचा उपाय कधी काळी शेतकरी मित्रांनीच शोधून काढला. या पद्धतीत कालाअनुरूप सुधारणा होत जावून आज प्लास्टिकच्या आच्छादनाचा वापर व्यापारी व किरकोळ स्वरुपात देखील होतो.  आच्छादनामुळे समस्या निवारणासोबतच काही फायदे देखील होतात जसे.  मृदेची धूप रोखली जाते खताचा निचरा होत नाही विषाणूजन्य रोगाचे वाहक असणाऱ्या किडींचे नियंत्रण होते.  पिकाच्या उत्पादकतेत 25 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ होते.  शेतमालाच्या गुणवत्तेत वाढ होते.  बीज उगवण क्षमतेत वाढ होते.  मल्च फिल्म ची निवड मल्च चा रंग, आकार व जाडी यानुसार प्रकार आहेत व पिकाच्या गरजेनुसार मल्च ची निवड करायची असते. विविध रंगी मल्च चे जे उपायोग सांगिलते जातात त्या नुसार होणारे फायदे प्रत्यक्षात होतीलच असे नाही. तंत्रशुद्ध  प्रयोगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेग...

विना फवारणी कीड नियंत्रण

इमेज
मित्रहो कीड नियंत्रण म्हटले कि तुम्हाला लगेच फवारणी पंप व कीटकनाशक आठवते का? जितकी पिके आहेत त्याच्या कित्येक पटीत किडी आहेत व त्याच्या कित्येक पटीत फवारणीच्या औषधी! शेतात कीड दिसून आली कि लगेच आपण औषधी दुकान गाठतो, औषध घेतो व फवारणी सुरु! अनेक शेतकरी बांधव एकाच वेळी चार पाच औषधी एकत्र करून फवारतात. काही काही शेतकरी बांधव तर अगदी कहर करतात, ठिबक मधून दोन औषधी सोडतात व फवारणीतून चार! शेतातल्या किडीविरुद्ध त्यांचे जणू काही युद्धच सुरु असते. आता पर्यंत आपल्या शेतात कितीतरी किडी आल्या असतील. अनेक वेळी आपण फवारणी करून त्यावर नियंत्रण मिळवले असेल. काही वेळा खूप फवारणी करून देखील कीड नियंत्रण झालेच नाही हा देखील अनुभव आपण घेतला असेल. इतक्या वर्षांपासून आपण कीटकनाशके फवारणी करत असून देखील आजपर्यंत एकाही किडीचे उच्चाटन झालेले नाही. उलटपक्षी नव्याने येणाऱ्या किडीत औषधाला सहन करायची क्षमता वाढलेली असते. मित्रहो या निरीक्षणानुसार कीडनियंत्रणासाठी आपल्याला औषध फवारणी व्यतिरिक्त इतर कोणते पर्याय उपलब्ध आहेत याचा विचार करायला हवा. असे करण्यासाठी तुम्हाला किडीच्या वाढीत अडचणी निर्माण करा...

गंधक वापरून कमी खर्चात वाढवा उत्पादकता

इमेज
शेतकरी मित्रहो, नत्र-स्पुरद व पालाश युक्त खतांचा वापर आपण जितका लक्ष देवून करतो तितकेच लक्ष गंधकाकडे देणे आवश्यक आहे. खरे तर गंधक किती लागते याचा अंदाज शेतकरी बांधव लावू शकत नाही. म्हणून गुणोत्तर पद्धतीने गंधकाची गरज समजावून घेवू. जर तुमच्या पिकला ६ किलो नत्र (१४.६ किलो युरिया) लागत असेल तर कमीत कमी १ कलो गंधक लागेलच. इतके गंधक का लागते व आज पर्यंत याची इतकी गरज का भासली नाही हा प्रश्न आपल्या मनात उभा रहाणे साहजिक आहे. मित्रहो, आजपर्यंतच्या शेतीच्या पद्धतीत जमिनीची धूप कमी व्हायची. शुद्ध खतांचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हता. कमी उत्पादकतेची पिके घेतली जात होती व सर्वात महत्वाचे म्हणजे कंपोस्ट चे प्रमाण खूप होते. आपल्या पद्धतीत अमुलाग्र बदल झाल्याने गंधकाचा वापर वाढवणे क्रमप्राप्त आहे. पिकातील गंधकाची कमतरता सहज दिसून येते. पिकाची वाढ खुंटते, ते कमजोर दिसते (टेकू द्यावे लागतात), पाने पिवळी पडू लागतात, मुळांवर (द्विदलवर्गीय पिकात) गाठी कमी असतात, दाणे भरण्यास वेळ लागतो व फळे पूर्णपणे पिकत नाहीत. पिकपोषणा पलीकडे देखील गंधकाचे दोन महत्वाचे फायदे आहेत. पहिला म्हणजे बुरशी व लाल...

बुडीत खात्याचा भरणा!

इमेज
तुम्ही एखादा रटाळ सिनेमा तीन तास पहिला आहे का? नागपूरला कामानिमित्त वरिष्ठांसोबत गेलो होतो. मध्ये पाच ते सहा तास असा वेळ होता जो कसा काढायचा हा प्रश्न. एका सिनेमाचा प्रोमो बघितला होता. दिग्दर्शक नावाजलेले, अभिनेते देखील नावाजलेले – सिनेमा चांगला असणार! वेळ चांगला जाईल हा विचार करून जवळच्या एका थीएटर मध्ये गेलो. सिनेमा भयाण रटाळ निघाला. अजून दोन तास हे झेलले तर उगाच मूडचा पिचका होईल हा विचार करून आम्ही बाहेर आलो. आता तुम्ही म्हणाल पण तिकिटाचे पैसे वाया गेले ना? यालाच म्हणतात बुडीत खात्याचा भरणा! पैसे तर तिकीट काढले तेव्हाच गेलेत. तो निर्णय चुकीचा होता हे लक्षात आल्यावर त्यात वाया जाणारे दोन तास वाचवणे आवश्यक होते! बाहेर लॉबित आल्यावर तिथे कॉफीचे झुरके घेत घेत चांगल्या गप्पा झाल्या. साहेबांनी “आपली उत्पादने ग्राहकांच्या दृष्टीने कशी आहेत?” यावर चर्चा केली. एक उत्पादन बंद करून नवीन उत्पादन कसे असावे अश्या मुद्द्यावर चांगली चर्चा झाली. बुडीत खात्याचा भरणा “फायद्याचा ठरला” कारण इतकी चांगली चर्चा गेल्या वर्षभरात झाली नव्हती!  असाच एक शेअर्सचा किस्सा आहे. तेव्हा आयटी कंप...

तुमच्या दुग्धव्यवसायात कमवा नशिबापेक्षा अधिक

इमेज
अनेक शेतकरी बांधव दुभती जनावरे पाळतात. काही शेतकरी नशीबात आले म्हणून पाळतात तर इतर नशीब आजमवण्यासाठी पळतात. तुम्ही कुठल्या वर्गातले आहात? तुमच्या व्यवसायात जास्त नफा मिळावा असे तुम्हाला वाटते का? ज्या प्रमाणे शेतात खताचे महत्व आहे त्याप्रमाणे पशुपालनात चाऱ्याचे महत्व आहे. योग्य चारा व्यवस्थापनातून तुम्ही फक्त तुमच्या जनावरांचे स्वास्थ्यच नाही तर त्यांचे वजन व दुध उत्पादन क्षमता देखील वाढवू शकता. इथे एका खास पुस्तकासाठी लिंक देत आहे. यात खूप चांगली माहिती व भरपूर युक्त्या दिल्या आहेत. फोटोवर क्लिक करून खरेदी देखील करू शकता!. यातून तुमचा खर्च तर कमी होईलच शिवाय तुम्ही नशीबवान व्हाल! वरील फोटोवर क्लिक करून मिळवा अधिक माहिती

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद