फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

विना फवारणी कीड नियंत्रण


मित्रहो कीड नियंत्रण म्हटले कि तुम्हाला लगेच फवारणी पंप व कीटकनाशक आठवते का? जितकी पिके आहेत त्याच्या कित्येक पटीत किडी आहेत व त्याच्या कित्येक पटीत फवारणीच्या औषधी! शेतात कीड दिसून आली कि लगेच आपण औषधी दुकान गाठतो, औषध घेतो व फवारणी सुरु! अनेक शेतकरी बांधव एकाच वेळी चार पाच औषधी एकत्र करून फवारतात. काही काही शेतकरी बांधव तर अगदी कहर करतात, ठिबक मधून दोन औषधी सोडतात व फवारणीतून चार! शेतातल्या किडीविरुद्ध त्यांचे जणू काही युद्धच सुरु असते.

आता पर्यंत आपल्या शेतात कितीतरी किडी आल्या असतील. अनेक वेळी आपण फवारणी करून त्यावर नियंत्रण मिळवले असेल. काही वेळा खूप फवारणी करून देखील कीड नियंत्रण झालेच नाही हा देखील अनुभव आपण घेतला असेल. इतक्या वर्षांपासून आपण कीटकनाशके फवारणी करत असून देखील आजपर्यंत एकाही किडीचे उच्चाटन झालेले नाही. उलटपक्षी नव्याने येणाऱ्या किडीत औषधाला सहन करायची क्षमता वाढलेली असते.

मित्रहो या निरीक्षणानुसार कीडनियंत्रणासाठी आपल्याला औषध फवारणी व्यतिरिक्त इतर कोणते पर्याय उपलब्ध आहेत याचा विचार करायला हवा. असे करण्यासाठी तुम्हाला किडीच्या वाढीत अडचणी निर्माण कराव्या लागतील.

त्यांच्या जीवनचक्रात तुम्ही काय अडथळे अणु शकता?

बहुतेक सर्व किडीचे “प्रौढ-अंडी-अळी-कोश-प्रौढ” असे जीवनचक्र असते. प्रौढ अवस्थेत ते एका जागेवरून दुसरया जागेवर जातात. या अवस्थेत नर-मदा मिलन होते असते. प्रौढ व अळी अवस्थेत त्यांची वाढ होते. याच अवस्थेत त्यांना भरपूर अन्न लागते. कोष अवस्थेत ते नजरेआड लपून बसतात. अंडी अवस्था बहुतेक वेळा पिकावरच असते. बहुतेक किडी पिकवाढीच्या काळात आपले जीवन चक्र इतक्या वेगात पिरवतात कि त्यांची संख्या हाहा म्हणता वाढते व पिकाच्या वाढीवर परिणाम संभवतो. जर या जीवनचक्राचा विचार केला तर आपण त्यांच्या वाढीत अडचणी निर्माण करू शकतो. जसे
  • नरमादा मिलनात अडचण निर्माण केली तर कीटकांची अंडी देण्याचा वेग मंदावेल व कीटक संख्या नियंत्रणात राहील. कामगंध सापळे या कमी खूप उपयोगी आहेत. लवकरच बाजारात कोणकोणते कामगंध सापळे उपलब्ध आहेत याची यादी मी प्रकाशित करणार आहे, माझ्या ब्लोग ला भेट देत रहा.

  • कोष अवस्थेत त्यांना नष्ट केले तर नर मादांची संख्या कमी होईल व पुढील जीवनचक्र मंदावेल: जसे नांगरणी केल्याने जमिनीत लपलेले कोष उघडे पडून मरतात. बिना नांगरणी शेतीचे भूत सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसते, तुम्ही तिकडे लक्ष देवू नका. काही शंका असल्यास टिप्पणी पोस्ट करा, मी आपले शंका समाधान नक्की करेल.
  • शेतात पिक नसताना कीड जंगली वनस्पतींवर वाढते, अशा वनस्पती नष्ट केल्या तर संख्या नियंत्रणात येईल. 
  • पिकाच्या लागवडीचा वेळ बदलला तर पिकाच्या वाढीचा काळ व किडीच्या वाढीचा काळ बदलतो व त्यांची चुकामुक होऊन कीड नियंत्रणात रहाते
  • प्रत्येक कीड दोन-तीन पिकांवर येत असते व त्यांनादेखील आवडनिवड असते. आपल्या मुख्य पिकावर कीड येवू नये म्हणून सोबत त्यांच्या आवडीच्या पर्यायी पिकाची थोड्या प्रमाणात लागवड करावी जेणे करून मुख्य पिक सुरक्षित राहील. भुइमुगात एरंडी लावल्यास तंबाखू अळी भुईमुगा ऐवजी एरंडीच्या पानांवर अंडी घालते. एरंडीच्या पानावर ते सहज दिसून येतात व नष्ट करता येतात.  
  • पिकास नत्राचे प्रमाण जास्त झाले तर रससोशक किडी वाढतात. जर नत्रा सोबत स्पुराद, पालाश, कॅल्शियाम, मॅग्नेशियम व सल्फर खते संतुलित करून दिली तर किडींचे नियंत्रण होते.

टिप्पण्या

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गंधक वापरून कमी खर्चात वाढवा उत्पादकता

"मजुरांची" समस्या - नियोजन

मिरचीतील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद