उंटाची ताजी - गरम विष्ठा खा आणि मिळवा हागवणीतून मुक्ती!
मराठीत एक सुरेख गाणे आहे. बदकाच्या पीलांत एक पीलु वेगळे असते. सगळे त्याला चिडवतात-डीचवतात. तो दुःखि असतो पण एक दिवस त्याला कळता की तो एक राजहंस आहे. जैवानियंत्रकांमधे बॅसिलस सटिलीस हा देखील असाच एक जीवाणू आहे - तो वेगळा आहे पण कामाच्या बाबतीत तो राजहंसाइतकाच रुबाबदार आहे.
महायुधाच्या काळात (१९४०-४१) नाझींची सेना आफ्रिकन प्रांतात होती. त्यानी शत्रूची दाणादाण उडवली होती. पण अचानक एक अडचण आली. नाझीं सैनिक ब्रिटीशांचा गोळ्या ऐवजी हागवण लागून मरु लागले. हा जीवाणुसंसर्ग आहे हे जरी लक्षात आले होते तरी उपचार उपलब्ध नव्हता. अजुन प्रतीजैविकांचा शोध लागलेला नव्हता, सल्फायुक्त औषधी फक्त शरीराबाहेरून वापरासाठीच उपलब्ध होती. जर्मन शासकांनी लगेच तज्ञांचे एक पथक आफ्रिकेत रवाना केले. त्यात वैद्य, औषधी तयार करणारे व सूक्ष्मजीवतज्ञ होते.
मुळ रहीवाशांमधे अशा मृत्युचे प्रमाण फारच कमी आहे - हे जाणून अभ्यासाला सुरूवात झाली. चौकशी केल्यावर लक्षात आले की मुळ रहिवासी हागवण सुरू झाली की लगेच घोडा किंवा उंटाच्या मागे फिरत व त्याची ताजी - गरम विष्ठा खात्. थोड्या काळाने त्याना बरे वाटू लागे.
त्यांचे हे पारंपारीक ज्ञान होते. ताज्या विष्ठेत जे गुण आहेत ते थंड - शिळ्या विष्ठेत नाही हा धागा पकडून जर्मन शास्त्रज्ञांनी ज्या तत्वाचा शोध लावला ते तत्व म्हणजे "बॅसिलस सटिलीस". लवकरच जर्मन संशोधकांनी ह्या जीवाणूंच्या गोळ्या बनवायची प्रक्रिया विकसीत केली. आज जगभरात ह्या जीवाणूंचा उपयोग होतो.
पुढे संशोधकांच्या असे लक्षात आले की वनस्पतींच्या संरक्षणासाठीही ह्या जीवाणूंचा उपयोग होऊ शकतो. १९५५ नंतर अशे अनेक संदर्भ आढळून येतात. बटाट्याची काळी कूज, कांद्याची पांढरी कूज अशा अनेक रोगत बॅसिलस सटिलीस च्या उपयोगाने फायदा होतो. पानांवर ह्या जीवाणुंची फवारणी केली असता त्यावरील बुरशीचेनियंत्रण होते. आजकाल झाडांवरून फळांची काढणी केल्यावर त्याच्यावर बॅसिलस सटिलीस ची पावडर लावायची पद्धत आहे. त्यामुळे देखील कुजीवर नियंत्रण मिळते व फळे जास्त काळ टिकतात.
ह्या लेखासाठी संदर्भ शोधतांना "बायलोजीकल कंट्रोल" ह्या शास्त्रीय नियतकालीकात २००४ साली प्रसीद्ध झालेला एथेन्स येथील डाँ. दादेज व सोबतींचा शोध निबंध नजरेत भरला कारण त्यांनी केलेला प्रयोग अतिशय रंजक आहे. त्या प्रदेशातील शेतकरी ब्ल्युबेरी चे उत्पादन वाढावे म्हणुन सोबत मधमाशां पालन करतात. परागीभवन जास्त झाले की फळांची संख्या वाढते. पण तसे करतांना मधमाशा फुलांची कूज करणार्या बुरशीलाही पसरवतात व नुकसान होते. डाँ. दादेज यांनी अशी व्यवस्था केली की जेव्हा मधमाशा त्यांच्या पोळ्यातुन बाहेर येतील तेव्हा त्यांचा शरीरावर बॅसिलस सटिलीस ची पावडर चीटकेल. मधमाशा मध गोळा करतांना जैवानियंत्रक जीवाणुंना तेथेच पोहोचवतील जेथे त्या आपल्या सोबत विनाशकारी बुरशीला पसरवतात. फुलात बुरशीने बुरा तयार करायच्या आतच बॅसिलस तीच्यावर नियंत्रण मिळवतो. जैवनियंत्रकांचा उपयोग कल्पकतेने करणे आवश्यक आहे कारण त्यांची काम करायची पद्धत इतर बुरशीनाशकासारखी नाही.
बॅसिलस सटिलीस प्रमाणेच त्याचा जवळचा नातेवाईक बॅसिलस लायकेनिफारमीस हा देखील तितकाच फायदेशीर आहे. आजकाल बाजारात उपलब्ध असलेल्य़ा अनेक उत्पादनात ह्या दोघांचा समावेश असतो.
खाली ग्रीन ड्युअल या बॅसिलस सबटीलीस युक्त उत्पादनाची लिंक देत आहे. पिकातील मूळ क्षेत्रात सोडल्यास हे उत्पादन झिंक व स्पुरद यांच्या स्थिर तत्वांचे विघटन करून त्यांना विद्राव्य बनवते, पिकाच्या वाढीचा वेग वाढवते व मृदेत जैविक चेतना आणते .
बियाणे प्रक्रियेसाठी एका एकरात लागणाऱ्या बियाण्यास २५० मिली ग्रीन ड्युअल चोळावे. रोपांच्या मुळांवर प्रक्रिया करण्यासाठी ५०० मिली उत्पादन १० लिटर पाण्यात मिसळून त्यात रोपांची मुळे बुचकवून काढावीत. मातीत मिसळण्यासाठी १ ते २ लिटर ग्रीन ड्युअल २५ किलो चांगल्या कुजलेल्या खतात मिसळून शेतात पसरवून टाकावे किंवा २०० लिटर पाण्यात मिसळून ड्रीप ने सोडावे.