एक और एक "ग्यारह" कि "मुठभर पेरतो व सूपभर उगवतो"
तुमच्या कडे वर्तमान पत्र आले आहे का? रद्दी सुद्धा चालेल. त्यची ५० वेळा घडी घाला. किती जाड होईल त्याचा गठ्ठा? काही अंदाज आहे? पुढे वाचण्यापूर्वी तुमचा अंदाज लिहून ठेवा.
पुढील तीस दिवस "एग्रोडॅड" तुमच्या खात्यात पैसे जमा करणार आहे. तुम्हाला पर्याय निवडायचा आहे. पहिला पर्याय आहे कि तुमच्या खात्यात रोज १००० रु जमा करावेत व दुसरा पर्याय आहे कि एग्रोडॅड तुमच्या खात्यात पहिल्या दिवशी १ रु जमा करेल, दुसऱ्या दिवशी २ रु, तिसऱ्या दिवशी ४ रु, चौथ्या दिवशी त्याच्या दुप्पट, अश्या पद्धतीने ३० दिवस. तुम्हाला कुठला पर्याय आवडेल, पहिला कि दुसरा. गणित करण्यापूर्वी तुमचे मत लिहून ठेवा.
आता कागद पेन घ्या. वाटल्यास तुमच्या मोबाईल मधील कॅलक्युलॆटर घ्या. तुमच्याकडील वर्तमानपत्राची जाडी ०.१ मी. मी आहे असे समजा. पन्नास घड्या घातल्यावर ते किती जाड होईल त्याचे गणित करा. ५,६२,९४,९९५ कि. मी. इतका जाड गठ्ठा तयार होईल! आता तुमच्या खात्यात किती रक्कम जमा होईल याचे गणित करा. पहिल्या पद्धतीनुसार ३०,००० जमा होतील तर दुसऱ्या पद्धतीने ५३,६८,७०,९१२ रु.
मित्रहो आपल्याला १+१ = २ हे गणित कळते पण १ और १, ११ हे गणित आपल्या डोक्यात घुसत नाही.
तुम्ही म्हणाल याचा आमच्या जीवनात काय उपयोग? समजा तुमच्या टरबुजाच्या शेतात फळमाशीच्या १० जोड्या आहेत. एक जोडी एकदा मिलन झाले कि १००० अंडी घालते. प्रत्येक अंड्यातून एक याप्रमाणे १००० अळ्या त्यातून निघतात व ३० दिवसात त्या मोठ्या माशीत रुपांतरीत होतात. त्यातील अर्ध्या माद्या व अर्ध्या नर असतात. आता गणित करा, चार महिन्यात किती माश्या तयार होतील?
एकशे पंचवीस कोटी!
-----------------------
-----------------------
मित्रहो समस्या हि आपल्या मेंदूत आहे. निसर्गाने आपला मेंदू बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार हि गणिते समजण्यासाठी बनवला आहे व प्रत्यक्षात निसर्गातील सर्व गणिते घातांक (exponential) पद्धतीने आहेत. व्यवहारातील सर्व गणिते देखील अश्याच घातांक पद्धतीची आहेत. त्यातील एक उदाहरण बघू.
किरकोळ महागाईचा दर ५.३० टक्के आहे असे आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला काही विशेष वाटत नाही. पण मित्रांनो याचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होणार? समजा हा दर पुढील १५ वर्षे असाच टिकून राहिला तर तुमच्या खिशातील १०० रुपयाचे मूल्य १५ वर्षात ५० रु इतके असेल व २५ वर्षात एकूण मूल्य उरेल फक्त २७ रु. एकूणच जर तुम्ही हे १०० रु कुठेतरी गुंतवले पाहिजे. इथे देखील तुम्हाला हा महागाई चा दर अडणार आहे कारण जर तुमचे १०० रु ५.३० टक्याने वाढले तरी २५ वर्षानंतर त्याचे मूल्य फक्त १०० रुपयेच राहील! एकूणच ५.३० टक्के महागाई चादर हि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची नाकामि आहे!
शेतकरी, "मुठभर पेरतो व सूपभर उगवतो" असे आपण नेहमी म्हणतो. ते खरे देखील आहे. समजा तुम्ही मुठभर पैसे गुंतवले तर सूपभर पैसे परत का मिळत नाही? हा विचार नक्की करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा