पोस्ट्स

farmer लेबलसह पोस्ट दाखवत आहे

फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

गंधक वापरून कमी खर्चात वाढवा उत्पादकता

इमेज
शेतकरी मित्रहो, नत्र-स्पुरद व पालाश युक्त खतांचा वापर आपण जितका लक्ष देवून करतो तितकेच लक्ष गंधकाकडे देणे आवश्यक आहे. खरे तर गंधक किती लागते याचा अंदाज शेतकरी बांधव लावू शकत नाही. म्हणून गुणोत्तर पद्धतीने गंधकाची गरज समजावून घेवू. जर तुमच्या पिकला ६ किलो नत्र (१४.६ किलो युरिया) लागत असेल तर कमीत कमी १ कलो गंधक लागेलच. इतके गंधक का लागते व आज पर्यंत याची इतकी गरज का भासली नाही हा प्रश्न आपल्या मनात उभा रहाणे साहजिक आहे. मित्रहो, आजपर्यंतच्या शेतीच्या पद्धतीत जमिनीची धूप कमी व्हायची. शुद्ध खतांचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हता. कमी उत्पादकतेची पिके घेतली जात होती व सर्वात महत्वाचे म्हणजे कंपोस्ट चे प्रमाण खूप होते. आपल्या पद्धतीत अमुलाग्र बदल झाल्याने गंधकाचा वापर वाढवणे क्रमप्राप्त आहे. पिकातील गंधकाची कमतरता सहज दिसून येते. पिकाची वाढ खुंटते, ते कमजोर दिसते (टेकू द्यावे लागतात), पाने पिवळी पडू लागतात, मुळांवर (द्विदलवर्गीय पिकात) गाठी कमी असतात, दाणे भरण्यास वेळ लागतो व फळे पूर्णपणे पिकत नाहीत. पिकपोषणा पलीकडे देखील गंधकाचे दोन महत्वाचे फायदे आहेत. पहिला म्हणजे बुरशी व लाल...

तुमच्या दुग्धव्यवसायात कमवा नशिबापेक्षा अधिक

इमेज
अनेक शेतकरी बांधव दुभती जनावरे पाळतात. काही शेतकरी नशीबात आले म्हणून पाळतात तर इतर नशीब आजमवण्यासाठी पळतात. तुम्ही कुठल्या वर्गातले आहात? तुमच्या व्यवसायात जास्त नफा मिळावा असे तुम्हाला वाटते का? ज्या प्रमाणे शेतात खताचे महत्व आहे त्याप्रमाणे पशुपालनात चाऱ्याचे महत्व आहे. योग्य चारा व्यवस्थापनातून तुम्ही फक्त तुमच्या जनावरांचे स्वास्थ्यच नाही तर त्यांचे वजन व दुध उत्पादन क्षमता देखील वाढवू शकता. इथे एका खास पुस्तकासाठी लिंक देत आहे. यात खूप चांगली माहिती व भरपूर युक्त्या दिल्या आहेत. फोटोवर क्लिक करून खरेदी देखील करू शकता!. यातून तुमचा खर्च तर कमी होईलच शिवाय तुम्ही नशीबवान व्हाल! वरील फोटोवर क्लिक करून मिळवा अधिक माहिती

हि अंधश्रद्धा आहे का?

इमेज
राजस्थानातील एका गावात जन्माला आलेल्या मुलीला चार हात होते. तिला देवीचे रूप मानले गेले. नाव ठेवले "दुर्गा". थेट बंगाल, महाराष्ट्रातील लोकं दुर्गाचे दर्शन घ्यायला धावू लागले. तिचे दर्शन घेणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत होत्या. सुकीबाईंच्या सुनेला लग्नानंतर पाच वर्ष होऊनही बाळ होत नव्हत. सुकीबाई दर्शनाला राजस्थानला आल्या व परतल्यावर दोन महिन्यात त्यांना गोड बातमी मिळाली. दशरथला नोकरी मिळत नव्हती. भाड्याला पैसे नव्हते, उधार उसनवार करून त्याचे वडील राजस्थानला जावून आले. दोन महिन्यात दशरथला नोकरी लागली. अश्या अनेक बातम्या नित्य कानी पडत होत्या. तिकडे दुर्गेच्या दर्शनाला चार चार दिवस रांगेत लागावे लागत होते. दोन वर्ष हे सुरु होते. शेवटी दुर्गा दगावली व हे प्रकरण बंद पडले. बबन एक उत्तम शेतकरी होता. त्याची दीड एकर शेती होती. तो नित्य वेगवेगळ्या पिकांची निवड करी. संतुलित खत मात्रा, मृदा सुधार व नेमके जलव्यवस्थापन यातून त्याने निवडलेले प्रत्येक पिक भरगोस उत्पादन देई. उत्पादनाची तो अनेक पद्धतीने मार्केटिंग करीत असे. बोलका व यशस्वी असल्याने तो इतर शेतकरी बांधवांना सल...

शेतकरी पुन्हा पुन्हा भुकेलाच का रहातो?

मित्रहो कश्यामुळे काय घडले यात मोठी गल्लत होत असते. आपण गरीब का आहोत? आपल्याला सातत्याने नुकसान का होते आहे? आपल्या पिकावर एव्हडी कीड अचानक कशी आली? कापसाचे भाव का पडले? उसाला भाव का मिळत नाहीये? फवारणी करते वेळी विषबाधा का झाली? अश्या सर्व प्रश्नांची जी उत्तरे आपल्याला ठावूक असतात ती चुकीची असू शकतात. दूरवर एका बेटावरील रानटी जमातीत, सर्वांच्या डोक्यात उवा असत. त्यांच्यासाठी ती एक सामान्य बाब होती. या लोकांच्या मनात असा समज होता कि "डोक्यातील उवा गेल्या कि ताप येतो". मग हि माणसे ताप अल्येल्या माणसाच्या डोक्यात उवा टाकत. कालांतराने ताप उतरला कि उवा परत त्याच्या डोक्यात वाढू लागत. त्यांच्या मते उवा ताप घालवतात! अर्थात ते खोटे होते. कुणालाही ताप आला कि उष्णतेमुळे उवा "गायब" होत व ताप गेला कि परत येत. एक नवखा महापौर शहरातील परिस्थितीचा अभ्यास करीत होता तेव्हा त्याला एक आलेख दिसला. या आलेखात शहरात लागलेल्या आगीत किती नुकसान झाले व किती अग्निशामक कर्मचारी ती आग विझवायला गेले हे दाखवले होते. महाशयांनी यावरून हे ठरवले कि जितके जास्त कर्मचारी आग विझवायला गेले तीतीके...

जब दिल आए गधी पर तो परी क्या चीज है

इमेज
जब दिल आए गधीपर तो परी क्या चीज है? अशी एक म्हण आपल्याकडे आहे. प्रेमात आंधळ्या झालेल्या व्यक्तीबद्दल या म्हणीचा प्रयोग होतो.  तरूण/अधेड वयात "तू मला आवडतोस" किंवा "आवडतेस" असे म्हणणारी एक व्यक्ती हवी असते. जेव्हा असे घडते तेव्हा "तो" किंवा "ती" अचानक फार आवडायला लागते. त्या व्यक्तीशिवाय दुसरा विचारच मनात येत नाही. मन "सैराट" होते. हि प्रभावळ इतकी प्रबळ असते कि "भान" ठिकाणावर आणणारा मित्रपरिवार किंवा परिस्थती नसेल तर "सैराट" घडल्याशिवाय रहात नाही. जर त्या कथेत प्रिन्सदादा नसेल तरी असे प्रेम काही काळाने "अपयशीच ठरते". "तो" किंवा "ती" जितकी हुशार, सुंदर, आकर्षक, प्रेमळ वाटत होते, जाणवत होते, ते सगळे बदलून जाते. प्रेमाचे चार दिवस संपले कि त्याचा किंवा तिचा "दुष्टपणा", "पोकळपणा", "अप्पलपोटेपणा" स्पष्ट दिसायला लागतात. आपण प्रेमाच्या प्रभावळीत "कपाळमोक्ष" करून घेतला आहे हे कळते तो पर्यत अर्धे आयुष्य संपून जाते. तुम्ही शेअर बाजाराचा अभ्यास केला आह...

शेतकरी आहात कि मेंढर?

इमेज
सकाळ-संध्याकाळ चौकात उभे रहाणारे टवाळ, फेसबुक वरील स्क्रोलर, व्हाटसएपवरचे कंपलसिव्ह फॉरवर्डर सोडले तर प्रत्येकाला कृतीशील निर्णय घ्यावे लागतात. मुद्दा हा आहे कि अनेक वेळा सोशल प्रुफ मुळे तुम्ही योग्य निर्णय घेण्यापासून स्वत:ला वंचित ठेवतात. जाण असून देखील चुकीचा निर्णय घेतात! माझ्या मते चांगला निर्णय घेण्यात सर्वात मोठी अडचण असते ती सोशल प्रूफची! १९९५ सालमधील सप्टेंबर महिन्यातील घटना आहे, गुरुवार चा दिवस होता.  मी कॉलेजचा विद्यार्थी होतो, मेस वरून कॉलेज कडे जायला निघालो व रस्त्यावर अचानक गर्दी वाढली. जो तो पुजेची थाळी घेवून जातांना दिसत होता. गणपती मंदिरावर अक्षरश: झुंबड उडालेली होती. मी आस्तिक असलो तरी फारसा मंदिरात जात नाही. झुंबडीत सामील न होणे बरे हा विचार करून मी कॉलेजला पोहोचलो. तिथे गर्दी कमी होती. उपस्थिती कमी असल्याने शिक्षकांनी पिरीयड ला ऑफ दिला. “गणपती दुध पीत असल्याची” बातमी कानावर आली. सर्व मंदिरातील गणपती दुध पीत होते. प्रत्येक भक्तासाठी “बाप्पाला” प्रसन्न करून घ्यायची हि “मोठी संधी” होती, त्यामुळे आज कॉलेजमध्ये पिरीयड होणार नाही हे माझ्या लक्षात आले व मी वाच...

शेतकऱ्याचा वेळ महत्वाचा नाही असे फक्त गाढवास वाटते!

इमेज
वेळ म्हणजेच संपत्ती हे प्रत्येकाला ठावूक असते पण जो हि संपत्ती जपून वापरतो तो यशस्वी होतो. अनेकदा आपला वेळ वाया जातो. वाट पहाणे - प्रवास करणे या दोन घटना भरपूर वेळ घेत असतात. अनेकदा या वेळेचा दूरउपयोग केला जातो व नुकसान होते. एका शेतकरी मित्राने त्याच्या शेतातील कांदा ट्रकने भरून बाजारपेठेकडे रवाना केला. सोबत त्याचा मुलगा व मुलाचे मित्र गेले. बाजारपेठेत सकाळी पोहोचायचे होते. प्रवासादरम्यान या मुलाने मित्रांसोबत ढाब्यावर जुगार खेळला, नशा पाणी केले. जुगारात तो २६,००० रु हरला! 10 टन कांदा विकून असा कितीक पैसा मिळणार होता? डोक्यात जाण नसल्याने त्याने वेळेचा दुरुपयोग केला व तसे करणे त्याला चांगलेच महाताग पडले. एकूणच प्रवास करते वेळी आपल्या वेळेचा सदुपयोग होईल हे बघायला हवे. सराव व व्यक्तिमत्वानुसार वेगवेगळ्या पद्धतीने वेळेचा सदुपयोग करणे शक्य आहे. २४ तासापैकी आपण ८ तास झोप काढतो. हि झोप अत्यावश्यक असते. अनेक यशस्वी माणसे प्रवासादरम्यान झोप काढण्याला महत्व देतात. त्यामुळे ते जिथे पोहोचतात तेथे तप्तरतेने कामे करू शकतात. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी भरपूर प्रवास करतात. बहुतेक वे...

मनोधारनेतून गैरफायदा घेणाऱ्यांची लावा वाट!

इमेज
मित्रहो आपल्या मनोधारणेचा व गैरसमाजाचा फायदा अनेक लोकं घेत असतात. विश्वासराव गेल्या २० वर्षापासून सरपंच आहेत. त्यांच्या कडे जाणारी प्रत्येक व्यक्ती समाधानी होऊनच परत येते. कुणाचीही त्यांच्याबद्दल तक्रारच नाहीये. ते आहेत तो पर्यंत "सरपंच" पद त्यांच्या कडेच राहील हे निश्चित आहे. गेल्या २० वर्षात गावातील परिस्थितीत फारसा बदल झालेला नाहीये. पहिले फोन नव्हते, मग फोन आले, आता प्रत्येकाकडे मोबाइल आहेत. टीव्ही नव्हते, मग टीव्ही आले, आता स्मार्ट टीव्ही देखील आले आहेत. पूर्वी रस्ते नव्हते आता सिमेंट चे रस्ते आहेत. हे सर्व बदल बाहेरून आले आहेत. गावातील १०० टक्के लोक शेती करतात पण २० वर्षात गावातील व शेताच्या पाण्याची समस्या जशी होती तशी आहे. एका मध्यवर्ती धरणातून पाणी पुरवठा होतो पण त्यात गावाचा ह्क्क थोडासाच आहे. शिवारातील तण समस्या जशी होती तशीच आहे. सामुहिक तण नियंत्रण केले तर शेतीचे उत्पन्न ४० टक्क्याने वाढू शकते. सामुहिक कीड नियंत्रणातून देखील भरीव फायदा होऊ शकतो. एक नेता म्हणून विश्वासरावांनी असा प्रयत्न केलेला नाही. गावात एकहि कृषीपूरक उद्योग नाहीये. गावातील सर्व कृषीउत्पन...

शेतकऱ्याचा ध्येय्यवाद

इमेज
आपले ध्येय्य निश्चित असणे महत्वाचे आहे. तसे नसले तर कामाची गाडी रुळावरून भरकटून जाईल, फक्त धावत राहील, पोहोचणार कुठेच नाही. ध्येय्य ठरवल्यामुळे तुमच्या योजनेला एक स्परूप येते. योजने मुळे कोणकोणती कामे करायचे ते ठरते. कामे केल्याने परिणाम प्राप्त होतात व फलस्वरूप "यशप्राप्ती" होते. जेव्हा आपण सहल काढतो किंवा प्रवास करतो त्यावेळी प्रत्येक गोष्ट ठरवतो. कुठून कुठे कसे जायचे, केव्हा जायचे, किती लोकं रहातील, खान-पान कसे होईल? म्हणजेच कुठे जायचे हे माहिती असले कि सर्व काही ठरवता येते.  यशस्वी शेतकरी होण्यासाठी दोन प्रकारची ध्येय्य ठरवावी लागतील. सामान्य ध्येय्य व निश्चित ध्येय्य.  सामान्य ध्येय्य:  मी एक चांगला शेतकरी बनेल, शेतीचा अभ्यास वैज्ञानिक पद्धतीने करेल, कामापासून लक्ष विचलित करणाऱ्या सवयी जसे वेश्यावृत्ती, जुगार, दारू या पासून दूर राहील.  निश्चित ध्येय्य: मी पिकाच्या निवडीत वैविध्य आणून या वर्षी  मागील वर्षाच्या २० टक्के अधीक  उत्पादन घेईल. वार्षिक उत्पादनाचा २० टक्के  भाग मी रोजच्या भाजीपाला विक्रीतून कमवेल २० टक्के  भाग द...

शापित विजेते होऊ नका, स्वैरइच्छेला आवर घाला

इमेज
या वर्षी कोणते पिक पेरताय? प्रत्येकाचे उत्तर होते कापूस. मैलोगणती कुठेही नजर टाका सर्वीकडे कापूसच. पिक पाच फुटाच्या वर वाढले. फेसबुकवर एकसे एक फोटो! कहर झाला! बोंडअळी चा हल्ला झाला, फवारणी सरू झाली. फवारणी करते वेळी विविध ठिकाणी २५ पेक्षा अधिक शेतकरी/मजूर विषबाधा होऊन मेले. दोन वर्षापूर्वी कांद्याची लाट आली होती, तो सडला. मग तुरीची लाट आली, तुरीचा भाव पडला. कापसाचे काय होते आहे ते आपण बघतो आहोत. रब्बीत हरभरा पेरणी जोरात आहे, काय होणार हे ज्योतिषाला विचारायची गरज नाही. हे थोडे जुगारासारखे होत नाहीये का? किसन एका ठिकाणी बोली लावायला पोहोचला. अनेक नामीगिरामी व्यक्ती जमले होते. एका जमिनीच्या तुकड्याचा लिलाव होता.  या तुकड्याची किंम्मत कमीत कमी पाच कोटी तर जास्तीत जास्त २५ कोटी असू शकते असा सर्व साधारण अंदाज होता. लिलाव सुरु झाला. बोली वाढत गेली. किसन ने मनोमनी ठरवले होते कि हि किंमत फारतर आठ कोटी असू शकते. बोली आठ कोटीच्या वर जावू लागल्यावर किसन ने बोली लावणे बंद केले. लाजीपतराव बोली जिंकले, त्यांनी तो जमिनीचा तुकडा ५५ कोटीत खरेदी केला. जिंकण्याच्या खुशीत लाजीपतरावांनी एक धमाल...

एक और एक "ग्यारह" कि "मुठभर पेरतो व सूपभर उगवतो"

इमेज
तुमच्या कडे वर्तमान पत्र आले आहे का? रद्दी सुद्धा चालेल. त्यची ५० वेळा घडी घाला. किती जाड होईल त्याचा गठ्ठा? काही अंदाज आहे? पुढे वाचण्यापूर्वी तुमचा अंदाज लिहून ठेवा. पुढील तीस दिवस "एग्रोडॅड" तुमच्या खात्यात पैसे जमा करणार आहे. तुम्हाला पर्याय निवडायचा आहे. पहिला पर्याय आहे कि तुमच्या खात्यात रोज १००० रु जमा करावेत व दुसरा पर्याय आहे कि एग्रोडॅड तुमच्या खात्यात पहिल्या दिवशी १ रु जमा करेल, दुसऱ्या दिवशी २ रु, तिसऱ्या दिवशी ४ रु, चौथ्या दिवशी त्याच्या दुप्पट, अश्या पद्धतीने ३० दिवस. तुम्हाला कुठला पर्याय आवडेल, पहिला कि दुसरा. गणित करण्यापूर्वी तुमचे मत लिहून ठेवा. आता कागद पेन घ्या. वाटल्यास तुमच्या मोबाईल मधील कॅलक्युलॆटर घ्या. तुमच्याकडील वर्तमानपत्राची जाडी ०.१ मी. मी आहे असे समजा. पन्नास घड्या घातल्यावर ते किती जाड होईल त्याचे गणित करा. ५,६२,९४,९९५ कि. मी. इतका जाड गठ्ठा तयार होईल!  आता तुमच्या खात्यात किती रक्कम जमा होईल याचे गणित करा. पहिल्या पद्धतीनुसार ३०,००० जमा होतील तर दुसऱ्या पद्धतीने ५३,६८,७०,९१२ रु. मित्रहो आपल्याला १+१ = २ हे गणित कळते पण १ और १, ११...

जाणून घ्या गैरसमज जे शेतकऱ्यास यशस्वी होण्यापासून रोखतात

इमेज
गैरसमज म्हणजे तथ्य व  विचारातील अंतर. असे  चुकीचे विचार जे आपल्याला योग्य व फायदेशीर कृती करण्यापासून रोखतात . शेतकरी बांधवांच्या मनात देखील असे काही गैरसमज घर करून बसतात ज्यामुळे ते जोखडात बांधले जातात. यातील काही महत्वाचे गैरसमज कोणते? ते बघू. शेतकरी म्हणजे काही उद्योजक नाही  - हा सर्वात मोठा व महत्वाचा गैरसमज आहे. जो शेतकरी स्वत:च्या गरजेव्यतिरिक्त अन्नधान्य पिकवतो व बाजारात विकतो  तो उद्योजक नाही तर काय?  कुठलीही शाश्वती नसतांना जमिन तयार करतो, बी पेरतो, पिकास जपतो; माणसे राबवतो त्यांची पोटे भरतो, अडीनडी ला पुरतो. विक्रीतून येणाऱ्या पैशाचा शेवटचा हिस्सा ठेवतो. नफा-तोट्याचा विचार न करता एव्हडी धडाडी दाखवणारी व्यक्ती म्हणजेच उद्योजक. उद्योजक यापेक्षा वेगळा असतो का?  मित्रहो. कुणीही जन्माने उद्योजक असतो का? ती एक मानसिकता आहे. जो जोपासेल तो उद्योजक! फसवणूक केल्याशिवाय पर्यायच नाही -  उद्योजकतेत कुठलाही शॉर्ट कट मारणे शक्य नाही. मोह कुणाला होत नाही..मला होतो..तुम्हालाही होईलच. नाशिक हून येतांना रस्त्यात कांद्याची गोणी घेतली. घरी येवून ल...

मूठभर पेरून - सुपभर उगवून, मिळतोय फक्त "कर्जाचा डोंगर आणि आत्महत्येचा विचार"! हे सार संपायला हवे

इमेज
  गेली अनेक पिढ्या शेतकरी शेती करतोय. पेरतोय-उगवतोय-काढतोय-विकतोय. जन्माला आल्यापासून - आत्महत्येचा विचार मनात येइपर्यंत तो "आजन्म" शेतीच करतोय . जेव्हा एक बाळ जन्माला येते व मातेच दुध चाखते, त्या दुधात देखील शेतकऱ्याचा घाम असतो. मातेला ममत्व मिळते पण शेतकऱ्यास फक्त "यातना"! ज्याचे पांग आई प्रमाणे फेडायला हवे त्याला आपण काय देतोय? मुठभर पेरून - सुपभर उगवून त्याला मिळतोय फक्त "कर्जाचा डोंगर आणि आत्महत्येचा विचार"! हे सार संपायला हवे, पण केव्हा आणि कधी? एक शेतकरी जेव्हा गळ्यात फास टाकतो, त्याचे मृत्यूचेभय संपलेले असते. त्या क्षणाला सबंध जगात त्याला कुणाची भीती वाटत नसते. आपल्यापैकी प्रत्येकाने हे लक्षात घ्यावे. स्वत:च्या गळ्यात फंदा टाकायच्या अगोदर जर त्याने तो फंदा आपल्या पैकी एकाच्याही गळ्यात टाकून ओढला तर?    मित्रांनो, हजारो-लाखो दिवे लावलेत तरी "अंधार" दिव्याखाली लपून बसतो, दिवे विझताक्षणी हा अंधार सारे आसमंत व्यापून टाकतो. प्रत्येक नागरिकाने हे समजावून घेतले पाहिजे. जीवावर उदार होऊन जरी शेतकरी आज जगाची भूक मिटवत असला तरी हि भूक आपल...

आपण पुढच्या पिढीला ७/१२ तर देऊ पण शेती देऊ शकणार नाही.

निव्वळ खर्चिक योजना आखून उत्पादन वाढणे शक्य नाही, मातीचे परीक्षण करणे वा त्यानुसार समतोल साधायचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आम्ल-विम्ल व क्षारयुक्त जमिनीचा जन्म वर्षानुवर्षा केल्या गेलेल्या अव्याहत कृषि पाध्दतीचा परिणाम आहे. पुन्हा-पुन्हा चुकांचा तक्ता गिरवुन आजची शेती अशाश्वत झाली आहे. मृदेच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांची अपरिमित हानी झाली आहे. जर हे असेच सुरू राहीले तर आपण पुढच्या पिढीला ७/१२ तर देऊ पण शेती देऊ शकणार नाही. कधीतरी दूरचित्रवाणी वर एक जाहिरात येत असे. त्यात मुलगा आपल्या वडिलांसोबत कार मधे बसलेला असतो. सिग्नलवर थांबलेल्या गाड्यापैकी एकही गाडी बंद नाही व तेल नाहक जळते आहे हे पाहून तो वडीलांना सांगतो की तो मोठा झाल्यावर "सायकल दुरुस्तीचे दुकान टाकेल कारण तेलतर संपुन जाईल मग सगळे सायकलच चलवतील" वडील आवक होतात व गाडी बंद करतात. आजच सगळे वैभव जगून-आजच सगळा कस काढून आपण मिळवणार तरी काय? काळ्या मातीला आई म्हणणारे अपण - तिला पार म्हातारी करून चालणार नाही. तिला कसायाला नको पोसायला हवे. तिला नुसते वापरायला नको तिच्या - भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांचे संवर...

तुम्हाला यशस्वी शेतकरी व्हायचे आहे का?

इमेज
जेव्हा कोणी व्यक्ती इतर कुठलाही व्यवसाय किंवा नोकरी सोडून शेतकरी व्हायचे ठरवतो त्याचे आयुष्य पार बदलून जाते. शेतीउद्योग करणे हा एक धाडसी निर्णय आहे. शेतकऱ्याचे आयुष्य चित्तवेधक, धाडसी व खळबळीचे असते. एकीकडे नवनिर्मितीचा ध्यास, अनुभव व दुसरी कडे धोका पत्करायची तयारी व कधी न संपणारी अनिश्चितता. एखादे शेत कसायचे म्हणजे तुम्हाला रात्रीचा दिवस करावा लागणार, बदलत्या परिस्थितीचा विचार करून सतत तपशीलवार नियोजन आखत रहावे लागणार. अशी कठोर मेहनत करण्यासाठी तुम्हाला सतत स्वयंप्रेरित रहावे लागेल, ध्येयवेडे व्हावे लागेल. अनेक लोकांना हि संकल्पना मान्य होणार नाही, ते म्हणतील कि प्रत्येक उद्योगात अशा प्ररीस्थितीला सामोरे जावेच लागते, त्यापेक्षा उत्तम नियोजन व भरीव गुंतवणूक जास्त महत्वाची आहे. फक्त उत्तम नियोजन व भरीव गुंतवणुकीच्या भरवशावर गेलात तर तुम्ही शेतकरी व्हाल पण यशस्वी नाही. स्वयंप्रेरणा म्हणजे काय? अंतर्बाह्य असा स्त्रोत जो प्रत्येक परिस्थितीत तुमच्या इच्छा व उर्जा जागृत ठेवून तुमच्या ध्येयाशी तुम्हाला बांधून ठेविल. लक्ष्य गाठण्यासाठी तुमच्या भूमिकेला, कामाला व विषयाला अनुसरून त...

"मजुरांची" समस्या - नियोजन

इमेज
शेतकरी, उद्योजक व कंत्राटदार यांना "मजुरांची" समस्या फार मोठी असते. एकतर मजूर मिळत नाहीत, मिळाले तर त्यांच्याजवळ योग्यता नसते, अपेक्षा मोठी असते, अनेक लोकं अंगकाढू असतात, शेतात चोऱ्या करतात, ऐन वेळी काम सोडून निघून जातात वगैरे. सर्वच प्रश्नांना एकाच लेखात समाधान शोधता येणार नाही. इतकेच काय जर तुम्ही या ब्लॉग च्या खाली आपले मतव्यक्त केले, सूचना मांडल्या तर कालांतराने या लेखात सुधारणा करता येतील. गरज हि शोधाची जननी असते. पोटाचा खड्डा भरणे हि मजुराची खरी गरज असते व म्हणूनच तो कामाचा शोध घेतो. मधल्या काळात सरकारने गरिबी रेषे खालील लोकांसाठी २ रु किलो तांदूळ, गहू असे प्रकार केल्याने "पोटाचा खड्डा भरणे" हि गरज संपली व मजुर मिळण्यास मोठी समस्या निर्माण झाली. अर्थात तरीही अनेक ठिकाणी मजूर उपलब्ध आहे कारण प्रत्येकाला फक्त पोटाचा खड्डा भरायचा नसतो. अन्नाच्या पलीकडे चांगले वस्त्र, चांगला निवारा, मुलाबाळांचे शिक्षण, आरोग्य सुविधा, मुला-बाळांची लग्ने, मनोरंजन, पुरेशी व चांगली झोप, सुसंस्कृत मूल्यवर्धित जीवन, म्हतारपणासाठी जमा-पुंजी या देखील गरजा प्रत्येकाला असतात. शेतक...

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद