फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

फवारणीमुळे झाल्येल्या मृत्युला जबाबदार कोण? त्याचा चेहरा कसा?

फवारणीमुळे झाल्येल्या मृत्युला जबाबदार कोण? त्याचा चेहरा कसा? 

आज पेपर उघडून पहिला का? आज कुणावर सूड उगवलाय बातमीपत्राने? आज कुणाला हिरो म्हणता आहेत पेपरवाले?

प्रत्येक बातमीला एक चेहरा असतो. कुणी म्हणतय कि विद्यमान मुख्यमंत्र्यास शेतीचे ज्ञानच नाहीये तर मुख्यमंत्री म्हणता आहेत कि आमच्या सरकारने शेतकऱ्यासाठी जे केल ते आजपर्यंत कुणीच केलेलं नाही. सरकारी अधिकारी दोष देता आहेत सेंद्रिय खत व औषधी उत्पादकास व कृषीमंत्री म्हणतात कि शेतकऱ्याने स्वसंरक्षणात्मक उपाय केलेले नाहीत, त्याच्या मृत्यूला तोच जबाबदार आहे! सेंद्रियवाले म्हणता आहेत कि बहुरास्ट्रिय कंपन्या व सेन्ट्रल इनसेक्टिसाईड बोर्डाची मिलीभगत आहे ते जहाल विषाचे परवाने देवून टाकतातच कसे?

प्रत्येक चेहरा स्वत:च्या तोंडावर फेअर एंड लव्हली लावतो व दुसऱ्याच्या तोंडावर बूटपॉलिश! हे नित्याने घडत असले तरी पत्रकार मंडळी वाचकाचा दृष्टीकोन शोधतात व सत्याचा विपर्यास करतात.

सचिनच्या काळात आपण हे खुपदा अनुभवले आहे. क्रिकेट सामना आपण जिंकलो व त्यात सचिनचे एखादे रेकॉर्ड झाले तर, सचिन क्रिकेटचा देव आहे. सामना हरलो तर सचिन फक्त स्वत:च्या रेकॉर्ड साठी खेळतो, तो म्हातारा झालाय! खरं काय? खेळ हा खेळ असतो - कुणीतरी हरणार व कुणीतरी जिंकणार! एकूण २२ खेळाडू, वातावरण, खेळपट्टी, प्रेक्षकांचा कल अश्या अनेक गोष्टी परिणाम करत असतात. पण आपल्याला देखील कुणीतरी हिरो किंवा कुणीतरी व्हिलन हवा असतो. पत्रकार देखील या "सामान्य" दृष्टीकोनाला बळी पडतात व टाकतात छापून.

दुसरे महायुद्ध कुणामुळे झाले? हे आश्चर्य आहे कि सर्व दोष फक्त हिटलर या एकाच नेत्यावर लादण्यात आला! खर तर युद्धाची सुरुवात चीन विरुद्ध जपान अशी होती. चीनची पीछेहाट सुरु झाली व इतर देश मध्ये पडले. एका माघून एक देश यात सामील झाला. प्रत्येक देशाने या युद्धात सामील होण्याचा बहाणा शोधत आपल्या शत्रूचे नुकसान केले व मित्रांच्या हितांचे रक्षण केले. सर्वांनी मिळून माणुसकीला काळिमा लावला, त्याचा दोष फक्त एका व्यक्तीचा कसा?

एकदा दहाबारा उनाड मुलांचा घोळका रिक्षात बसून मस्ती करीत चालला होता. रिक्षावरचे नियंत्रण सुटले व अपघात झाला. रिक्षा रस्त्यावर उभ्या एका वाहनावर आदळली. एक मुलगा वारला व इतर काहींना दुखापत झाली. अंतयात्रेत गेलो तेव्हा कळले कि पंचनाम्यात फक्त एकाच मुलाला दोषी धरले होते, जो या अपघातात वारला. खरे तर हा दोष कुणा एकाचा कसा असू शकतो? लहान मुलांच्या हाती रिक्षा देणारा दोषी कि रस्त्यावर वाहन उभे करणारा दोषी. मुले काय मस्ती तर करतातच.

मित्रहो मुद्दा हा आहे कि यवतमाळ दुर्घटनेस दोषी कोण? प्रत्येकाच्या दृशिकोनातून दोषी व्यक्ती किंवा परिस्थिती वेगवेगळी आहे. तुम्ही काय लक्षात घ्याल? स्वत:ची काळजी स्वत: घ्या. उद्या कुणालातरी शिक्षा होईलहि कदाचित, पण सत्य एकच आहे "वेळ आली होती, घटना घडली".

टिप्पण्या

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गंधक वापरून कमी खर्चात वाढवा उत्पादकता

"मजुरांची" समस्या - नियोजन

मिरचीतील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद