पोस्ट्स

management लेबलसह पोस्ट दाखवत आहे

फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

बुडीत खात्याचा भरणा!

इमेज
तुम्ही एखादा रटाळ सिनेमा तीन तास पहिला आहे का? नागपूरला कामानिमित्त वरिष्ठांसोबत गेलो होतो. मध्ये पाच ते सहा तास असा वेळ होता जो कसा काढायचा हा प्रश्न. एका सिनेमाचा प्रोमो बघितला होता. दिग्दर्शक नावाजलेले, अभिनेते देखील नावाजलेले – सिनेमा चांगला असणार! वेळ चांगला जाईल हा विचार करून जवळच्या एका थीएटर मध्ये गेलो. सिनेमा भयाण रटाळ निघाला. अजून दोन तास हे झेलले तर उगाच मूडचा पिचका होईल हा विचार करून आम्ही बाहेर आलो. आता तुम्ही म्हणाल पण तिकिटाचे पैसे वाया गेले ना? यालाच म्हणतात बुडीत खात्याचा भरणा! पैसे तर तिकीट काढले तेव्हाच गेलेत. तो निर्णय चुकीचा होता हे लक्षात आल्यावर त्यात वाया जाणारे दोन तास वाचवणे आवश्यक होते! बाहेर लॉबित आल्यावर तिथे कॉफीचे झुरके घेत घेत चांगल्या गप्पा झाल्या. साहेबांनी “आपली उत्पादने ग्राहकांच्या दृष्टीने कशी आहेत?” यावर चर्चा केली. एक उत्पादन बंद करून नवीन उत्पादन कसे असावे अश्या मुद्द्यावर चांगली चर्चा झाली. बुडीत खात्याचा भरणा “फायद्याचा ठरला” कारण इतकी चांगली चर्चा गेल्या वर्षभरात झाली नव्हती!  असाच एक शेअर्सचा किस्सा आहे. तेव्हा आयटी कंप...

हि अंधश्रद्धा आहे का?

इमेज
राजस्थानातील एका गावात जन्माला आलेल्या मुलीला चार हात होते. तिला देवीचे रूप मानले गेले. नाव ठेवले "दुर्गा". थेट बंगाल, महाराष्ट्रातील लोकं दुर्गाचे दर्शन घ्यायला धावू लागले. तिचे दर्शन घेणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत होत्या. सुकीबाईंच्या सुनेला लग्नानंतर पाच वर्ष होऊनही बाळ होत नव्हत. सुकीबाई दर्शनाला राजस्थानला आल्या व परतल्यावर दोन महिन्यात त्यांना गोड बातमी मिळाली. दशरथला नोकरी मिळत नव्हती. भाड्याला पैसे नव्हते, उधार उसनवार करून त्याचे वडील राजस्थानला जावून आले. दोन महिन्यात दशरथला नोकरी लागली. अश्या अनेक बातम्या नित्य कानी पडत होत्या. तिकडे दुर्गेच्या दर्शनाला चार चार दिवस रांगेत लागावे लागत होते. दोन वर्ष हे सुरु होते. शेवटी दुर्गा दगावली व हे प्रकरण बंद पडले. बबन एक उत्तम शेतकरी होता. त्याची दीड एकर शेती होती. तो नित्य वेगवेगळ्या पिकांची निवड करी. संतुलित खत मात्रा, मृदा सुधार व नेमके जलव्यवस्थापन यातून त्याने निवडलेले प्रत्येक पिक भरगोस उत्पादन देई. उत्पादनाची तो अनेक पद्धतीने मार्केटिंग करीत असे. बोलका व यशस्वी असल्याने तो इतर शेतकरी बांधवांना सल...

आवळा देवून कोहळा घेणाऱ्या पासून रहा सावध!

इमेज
त्याकाळी माणूस शिकार करीत असे. कबिल्यात राहणारे सर्व पुरुष भाले घेवून जंगलात शिकार करायला जात. स्त्रिया मुले सांभाळीत व जंगली प्राण्यापासून कबिल्याचे रक्षण करीत. शिकार भेटेलच याची काही खात्री नव्हती. कधी कधी भेटली तर एक तर कुटुंबाला पुरत नसे. कधी कधी इतकी मोठी शिकार हाती येई कि एका कुटुंबाकडून खाल्ली जात नव्हती. शिल्लक राही. तेव्हा आता सारखे फ्रीज नव्हते. हरणासारखी शिकार मिळाली कि ती कबिल्यात वाटली जाई. त्यामुळे देवाणघेवाण नित्याची होती. यातूनच कबिला टिकून राही. त्याकाळी ती एक गरज होती. काही वर्षापूर्वी आम्हाला एका कौटुंबिक जेवणाचे आग्रही आमंत्रण मिळाले.  या कुटुंबाशी आमची फक्त तोंड ओळखच होती. ते आमच्या बैठकीतली नसल्याने थोडे हीचकिचतच आम्ही निमंत्रण स्वीकारले. अंदाजानुसार हि सायंकाळ अतिशय कांटाळवाणी ठरली. पण इलाज नव्हता. देवाणघेवाण आली. आम्ही देखील त्यांना निमंत्रण दिले. पुन्हा एका कंटाळवाण्या सायंकाळचा मुहूर्त ठरला. हा क्रम असाच सुरु राहिला. अश्या कितीतरी सायंकाळी "अक्षरशः वाया गेल्या" . आता संदर्भ बदलले असले तरी लग्नात कपडे देवाण घेवाण सुरूच आहे. देवाणघेवाणीच्या का...

शेतकरी पुन्हा पुन्हा भुकेलाच का रहातो?

मित्रहो कश्यामुळे काय घडले यात मोठी गल्लत होत असते. आपण गरीब का आहोत? आपल्याला सातत्याने नुकसान का होते आहे? आपल्या पिकावर एव्हडी कीड अचानक कशी आली? कापसाचे भाव का पडले? उसाला भाव का मिळत नाहीये? फवारणी करते वेळी विषबाधा का झाली? अश्या सर्व प्रश्नांची जी उत्तरे आपल्याला ठावूक असतात ती चुकीची असू शकतात. दूरवर एका बेटावरील रानटी जमातीत, सर्वांच्या डोक्यात उवा असत. त्यांच्यासाठी ती एक सामान्य बाब होती. या लोकांच्या मनात असा समज होता कि "डोक्यातील उवा गेल्या कि ताप येतो". मग हि माणसे ताप अल्येल्या माणसाच्या डोक्यात उवा टाकत. कालांतराने ताप उतरला कि उवा परत त्याच्या डोक्यात वाढू लागत. त्यांच्या मते उवा ताप घालवतात! अर्थात ते खोटे होते. कुणालाही ताप आला कि उष्णतेमुळे उवा "गायब" होत व ताप गेला कि परत येत. एक नवखा महापौर शहरातील परिस्थितीचा अभ्यास करीत होता तेव्हा त्याला एक आलेख दिसला. या आलेखात शहरात लागलेल्या आगीत किती नुकसान झाले व किती अग्निशामक कर्मचारी ती आग विझवायला गेले हे दाखवले होते. महाशयांनी यावरून हे ठरवले कि जितके जास्त कर्मचारी आग विझवायला गेले तीतीके...

जब दिल आए गधी पर तो परी क्या चीज है

इमेज
जब दिल आए गधीपर तो परी क्या चीज है? अशी एक म्हण आपल्याकडे आहे. प्रेमात आंधळ्या झालेल्या व्यक्तीबद्दल या म्हणीचा प्रयोग होतो.  तरूण/अधेड वयात "तू मला आवडतोस" किंवा "आवडतेस" असे म्हणणारी एक व्यक्ती हवी असते. जेव्हा असे घडते तेव्हा "तो" किंवा "ती" अचानक फार आवडायला लागते. त्या व्यक्तीशिवाय दुसरा विचारच मनात येत नाही. मन "सैराट" होते. हि प्रभावळ इतकी प्रबळ असते कि "भान" ठिकाणावर आणणारा मित्रपरिवार किंवा परिस्थती नसेल तर "सैराट" घडल्याशिवाय रहात नाही. जर त्या कथेत प्रिन्सदादा नसेल तरी असे प्रेम काही काळाने "अपयशीच ठरते". "तो" किंवा "ती" जितकी हुशार, सुंदर, आकर्षक, प्रेमळ वाटत होते, जाणवत होते, ते सगळे बदलून जाते. प्रेमाचे चार दिवस संपले कि त्याचा किंवा तिचा "दुष्टपणा", "पोकळपणा", "अप्पलपोटेपणा" स्पष्ट दिसायला लागतात. आपण प्रेमाच्या प्रभावळीत "कपाळमोक्ष" करून घेतला आहे हे कळते तो पर्यत अर्धे आयुष्य संपून जाते. तुम्ही शेअर बाजाराचा अभ्यास केला आह...

शेतकरी आहात कि मेंढर?

इमेज
सकाळ-संध्याकाळ चौकात उभे रहाणारे टवाळ, फेसबुक वरील स्क्रोलर, व्हाटसएपवरचे कंपलसिव्ह फॉरवर्डर सोडले तर प्रत्येकाला कृतीशील निर्णय घ्यावे लागतात. मुद्दा हा आहे कि अनेक वेळा सोशल प्रुफ मुळे तुम्ही योग्य निर्णय घेण्यापासून स्वत:ला वंचित ठेवतात. जाण असून देखील चुकीचा निर्णय घेतात! माझ्या मते चांगला निर्णय घेण्यात सर्वात मोठी अडचण असते ती सोशल प्रूफची! १९९५ सालमधील सप्टेंबर महिन्यातील घटना आहे, गुरुवार चा दिवस होता.  मी कॉलेजचा विद्यार्थी होतो, मेस वरून कॉलेज कडे जायला निघालो व रस्त्यावर अचानक गर्दी वाढली. जो तो पुजेची थाळी घेवून जातांना दिसत होता. गणपती मंदिरावर अक्षरश: झुंबड उडालेली होती. मी आस्तिक असलो तरी फारसा मंदिरात जात नाही. झुंबडीत सामील न होणे बरे हा विचार करून मी कॉलेजला पोहोचलो. तिथे गर्दी कमी होती. उपस्थिती कमी असल्याने शिक्षकांनी पिरीयड ला ऑफ दिला. “गणपती दुध पीत असल्याची” बातमी कानावर आली. सर्व मंदिरातील गणपती दुध पीत होते. प्रत्येक भक्तासाठी “बाप्पाला” प्रसन्न करून घ्यायची हि “मोठी संधी” होती, त्यामुळे आज कॉलेजमध्ये पिरीयड होणार नाही हे माझ्या लक्षात आले व मी वाच...

फवारणीमुळे झाल्येल्या मृत्युला जबाबदार कोण? त्याचा चेहरा कसा?

इमेज
फवारणीमुळे झाल्येल्या मृत्युला जबाबदार कोण? त्याचा चेहरा कसा?  आज पेपर उघडून पहिला का? आज कुणावर सूड उगवलाय बातमीपत्राने? आज कुणाला हिरो म्हणता आहेत पेपरवाले? प्रत्येक बातमीला एक चेहरा असतो. कुणी म्हणतय कि विद्यमान मुख्यमंत्र्यास शेतीचे ज्ञानच नाहीये तर मुख्यमंत्री म्हणता आहेत कि आमच्या सरकारने शेतकऱ्यासाठी जे केल ते आजपर्यंत कुणीच केलेलं नाही. सरकारी अधिकारी दोष देता आहेत सेंद्रिय खत व औषधी उत्पादकास व कृषीमंत्री म्हणतात कि शेतकऱ्याने स्वसंरक्षणात्मक उपाय केलेले नाहीत, त्याच्या मृत्यूला तोच जबाबदार आहे! सेंद्रियवाले म्हणता आहेत कि बहुरास्ट्रिय कंपन्या व सेन्ट्रल इनसेक्टिसाईड बोर्डाची मिलीभगत आहे ते जहाल विषाचे परवाने देवून टाकतातच कसे? प्रत्येक चेहरा स्वत:च्या तोंडावर फेअर एंड लव्हली लावतो व दुसऱ्याच्या तोंडावर बूटपॉलिश! हे नित्याने घडत असले तरी पत्रकार मंडळी वाचकाचा दृष्टीकोन शोधतात व सत्याचा विपर्यास करतात. सचिनच्या काळात आपण हे खुपदा अनुभवले आहे. क्रिकेट सामना आपण जिंकलो व त्यात सचिनचे एखादे रेकॉर्ड झाले तर, सचिन क्रिकेटचा देव आहे. सामना हरलो तर सचिन फक्त स्वत:च्या...

शेतकऱ्याची वेळ वाचवायची युक्ती

इमेज
अनेक शेतकरी बांधवांसाठी वेळेचे नियोजन मोठे जिकरीचे असते कारण प्रत्येक काम "छोटे-मोठे-महत्वाचे-कमी महत्वाचे" त्याला एकट्यालाच करायचे असते. मुले शिकलेली असतात त्यांना शेतीतले काही कळतच नाही. पत्नीला व्यवाहार समजत नाही, सालदार सांगकाम्या असतो, मजुरांच्या मागे लगल्याशिवाय काम पुढे सरकत नाही, लग्न-मुंज-मरणात गेले नाही तर नातेवाईक आपल्याला ओळख देत नाहीत. मित्रहो, रतन टाटा किती मोठे उद्योजक आहेत! आजच्या क्षणाला त्यांच्या कडे किती नोकर असतील? समजा टाटांनी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगाराच्या चेकवर स्वत:च साक्षरी करायचे असे ठरवले तर महिन्याकाठी त्यांच्याकडे झोपायला सुद्धा वेळ शिल्लक रहाणार नाही!  आता तुम्ही म्हणाल, त्यांचा उद्योग मोठा आहे शेती शी त्याची तुलना कशी कराल?  कुठेतरी सुरुवात करणे गरजेचे आहे.   आपल्याभोवती जी कोणी माणसे आहेत त्यांची बुद्धी, क्षमता व निष्ठा यांची परख करणे व त्यानुसार त्यांना काही काम सोपवणे गरजेचे आहे.  एकदा काम सोपवले कि  स्वत:च्या निर्णयावर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे .  समजा तुम्ही नेहमी स्वत:च्या वाहनाने प्रवास करत असाल व एखाद्य...

शेतकऱ्याचा वेळ महत्वाचा नाही असे फक्त गाढवास वाटते!

इमेज
वेळ म्हणजेच संपत्ती हे प्रत्येकाला ठावूक असते पण जो हि संपत्ती जपून वापरतो तो यशस्वी होतो. अनेकदा आपला वेळ वाया जातो. वाट पहाणे - प्रवास करणे या दोन घटना भरपूर वेळ घेत असतात. अनेकदा या वेळेचा दूरउपयोग केला जातो व नुकसान होते. एका शेतकरी मित्राने त्याच्या शेतातील कांदा ट्रकने भरून बाजारपेठेकडे रवाना केला. सोबत त्याचा मुलगा व मुलाचे मित्र गेले. बाजारपेठेत सकाळी पोहोचायचे होते. प्रवासादरम्यान या मुलाने मित्रांसोबत ढाब्यावर जुगार खेळला, नशा पाणी केले. जुगारात तो २६,००० रु हरला! 10 टन कांदा विकून असा कितीक पैसा मिळणार होता? डोक्यात जाण नसल्याने त्याने वेळेचा दुरुपयोग केला व तसे करणे त्याला चांगलेच महाताग पडले. एकूणच प्रवास करते वेळी आपल्या वेळेचा सदुपयोग होईल हे बघायला हवे. सराव व व्यक्तिमत्वानुसार वेगवेगळ्या पद्धतीने वेळेचा सदुपयोग करणे शक्य आहे. २४ तासापैकी आपण ८ तास झोप काढतो. हि झोप अत्यावश्यक असते. अनेक यशस्वी माणसे प्रवासादरम्यान झोप काढण्याला महत्व देतात. त्यामुळे ते जिथे पोहोचतात तेथे तप्तरतेने कामे करू शकतात. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी भरपूर प्रवास करतात. बहुतेक वे...

मनोधारनेतून गैरफायदा घेणाऱ्यांची लावा वाट!

इमेज
मित्रहो आपल्या मनोधारणेचा व गैरसमाजाचा फायदा अनेक लोकं घेत असतात. विश्वासराव गेल्या २० वर्षापासून सरपंच आहेत. त्यांच्या कडे जाणारी प्रत्येक व्यक्ती समाधानी होऊनच परत येते. कुणाचीही त्यांच्याबद्दल तक्रारच नाहीये. ते आहेत तो पर्यंत "सरपंच" पद त्यांच्या कडेच राहील हे निश्चित आहे. गेल्या २० वर्षात गावातील परिस्थितीत फारसा बदल झालेला नाहीये. पहिले फोन नव्हते, मग फोन आले, आता प्रत्येकाकडे मोबाइल आहेत. टीव्ही नव्हते, मग टीव्ही आले, आता स्मार्ट टीव्ही देखील आले आहेत. पूर्वी रस्ते नव्हते आता सिमेंट चे रस्ते आहेत. हे सर्व बदल बाहेरून आले आहेत. गावातील १०० टक्के लोक शेती करतात पण २० वर्षात गावातील व शेताच्या पाण्याची समस्या जशी होती तशी आहे. एका मध्यवर्ती धरणातून पाणी पुरवठा होतो पण त्यात गावाचा ह्क्क थोडासाच आहे. शिवारातील तण समस्या जशी होती तशीच आहे. सामुहिक तण नियंत्रण केले तर शेतीचे उत्पन्न ४० टक्क्याने वाढू शकते. सामुहिक कीड नियंत्रणातून देखील भरीव फायदा होऊ शकतो. एक नेता म्हणून विश्वासरावांनी असा प्रयत्न केलेला नाही. गावात एकहि कृषीपूरक उद्योग नाहीये. गावातील सर्व कृषीउत्पन...

शेतकऱ्याच्या वेळेचे नियोजन

इमेज
एक शेतकरी म्हणून विचार केला तर -जमीन जुमला - मजूर, कामगार - स्थिर व खेळते भांडवल या व्यतिरिक्त तुमच्याकडे काय महत्वाचे आहे? वेळ! हि "वेळ" सर्व शेतकरी बांधवांकडे सारख्याच प्रमाणात उपलब्ध असते व एकदा वाया गेली कधीच परत येत नाही. अनेक वेळा शेतकरी बांधव बोलूनही दाखवतात कि मी ज्या पद्धतीने शेती करतो आहे त्यापेक्षा उत्तम करू शकतो  पण मला वेळ पुरत नाही !  मित्रहो, वेळ हा व्यवस्थापनाचा मुद्दा आहे. जसा आपण पैशाचा हिशोब ठेवतो तसा वेळेचाही हिशोब ठेवायला हवा कारण एकदा हातून निसटलेली वेळ कुणालाच परत मिळत नाही. तुमच्या जवळ जितका वेळ आहे तितक्याच वेळेत तुम्हाला महत्वाची कामे, दैनंदिन कामे  व फुरसतीतील कामे आटोपायची असतात.  समजा आपल्याजवळील कामांची आपण विभागणी केली तर व्यवस्थापन चांगले होईल. महत्वाचे व तत्काल काम महत्वाचे पण फुरसतीचे काम दुय्यम पण तत्काल काम दुय्यम व फुरसतीचे काम आपल्या जवळील  वेळेची देखील विभागणी करणे शक्य आहे . बहुवार्षिक कामे, येत्या वर्षभरातील कामे, सहमहितील कामे, या महिना-पंधरवड्यातील कामे, चालू आठवड्यातील कामे, उद्याची कामे,...

शेतकऱ्याचा ध्येय्यवाद

इमेज
आपले ध्येय्य निश्चित असणे महत्वाचे आहे. तसे नसले तर कामाची गाडी रुळावरून भरकटून जाईल, फक्त धावत राहील, पोहोचणार कुठेच नाही. ध्येय्य ठरवल्यामुळे तुमच्या योजनेला एक स्परूप येते. योजने मुळे कोणकोणती कामे करायचे ते ठरते. कामे केल्याने परिणाम प्राप्त होतात व फलस्वरूप "यशप्राप्ती" होते. जेव्हा आपण सहल काढतो किंवा प्रवास करतो त्यावेळी प्रत्येक गोष्ट ठरवतो. कुठून कुठे कसे जायचे, केव्हा जायचे, किती लोकं रहातील, खान-पान कसे होईल? म्हणजेच कुठे जायचे हे माहिती असले कि सर्व काही ठरवता येते.  यशस्वी शेतकरी होण्यासाठी दोन प्रकारची ध्येय्य ठरवावी लागतील. सामान्य ध्येय्य व निश्चित ध्येय्य.  सामान्य ध्येय्य:  मी एक चांगला शेतकरी बनेल, शेतीचा अभ्यास वैज्ञानिक पद्धतीने करेल, कामापासून लक्ष विचलित करणाऱ्या सवयी जसे वेश्यावृत्ती, जुगार, दारू या पासून दूर राहील.  निश्चित ध्येय्य: मी पिकाच्या निवडीत वैविध्य आणून या वर्षी  मागील वर्षाच्या २० टक्के अधीक  उत्पादन घेईल. वार्षिक उत्पादनाचा २० टक्के  भाग मी रोजच्या भाजीपाला विक्रीतून कमवेल २० टक्के  भाग द...

शापित विजेते होऊ नका, स्वैरइच्छेला आवर घाला

इमेज
या वर्षी कोणते पिक पेरताय? प्रत्येकाचे उत्तर होते कापूस. मैलोगणती कुठेही नजर टाका सर्वीकडे कापूसच. पिक पाच फुटाच्या वर वाढले. फेसबुकवर एकसे एक फोटो! कहर झाला! बोंडअळी चा हल्ला झाला, फवारणी सरू झाली. फवारणी करते वेळी विविध ठिकाणी २५ पेक्षा अधिक शेतकरी/मजूर विषबाधा होऊन मेले. दोन वर्षापूर्वी कांद्याची लाट आली होती, तो सडला. मग तुरीची लाट आली, तुरीचा भाव पडला. कापसाचे काय होते आहे ते आपण बघतो आहोत. रब्बीत हरभरा पेरणी जोरात आहे, काय होणार हे ज्योतिषाला विचारायची गरज नाही. हे थोडे जुगारासारखे होत नाहीये का? किसन एका ठिकाणी बोली लावायला पोहोचला. अनेक नामीगिरामी व्यक्ती जमले होते. एका जमिनीच्या तुकड्याचा लिलाव होता.  या तुकड्याची किंम्मत कमीत कमी पाच कोटी तर जास्तीत जास्त २५ कोटी असू शकते असा सर्व साधारण अंदाज होता. लिलाव सुरु झाला. बोली वाढत गेली. किसन ने मनोमनी ठरवले होते कि हि किंमत फारतर आठ कोटी असू शकते. बोली आठ कोटीच्या वर जावू लागल्यावर किसन ने बोली लावणे बंद केले. लाजीपतराव बोली जिंकले, त्यांनी तो जमिनीचा तुकडा ५५ कोटीत खरेदी केला. जिंकण्याच्या खुशीत लाजीपतरावांनी एक धमाल...

जाणून घ्या गैरसमज जे शेतकऱ्यास यशस्वी होण्यापासून रोखतात

इमेज
गैरसमज म्हणजे तथ्य व  विचारातील अंतर. असे  चुकीचे विचार जे आपल्याला योग्य व फायदेशीर कृती करण्यापासून रोखतात . शेतकरी बांधवांच्या मनात देखील असे काही गैरसमज घर करून बसतात ज्यामुळे ते जोखडात बांधले जातात. यातील काही महत्वाचे गैरसमज कोणते? ते बघू. शेतकरी म्हणजे काही उद्योजक नाही  - हा सर्वात मोठा व महत्वाचा गैरसमज आहे. जो शेतकरी स्वत:च्या गरजेव्यतिरिक्त अन्नधान्य पिकवतो व बाजारात विकतो  तो उद्योजक नाही तर काय?  कुठलीही शाश्वती नसतांना जमिन तयार करतो, बी पेरतो, पिकास जपतो; माणसे राबवतो त्यांची पोटे भरतो, अडीनडी ला पुरतो. विक्रीतून येणाऱ्या पैशाचा शेवटचा हिस्सा ठेवतो. नफा-तोट्याचा विचार न करता एव्हडी धडाडी दाखवणारी व्यक्ती म्हणजेच उद्योजक. उद्योजक यापेक्षा वेगळा असतो का?  मित्रहो. कुणीही जन्माने उद्योजक असतो का? ती एक मानसिकता आहे. जो जोपासेल तो उद्योजक! फसवणूक केल्याशिवाय पर्यायच नाही -  उद्योजकतेत कुठलाही शॉर्ट कट मारणे शक्य नाही. मोह कुणाला होत नाही..मला होतो..तुम्हालाही होईलच. नाशिक हून येतांना रस्त्यात कांद्याची गोणी घेतली. घरी येवून ल...

"मजुरांची" समस्या - नियोजन

इमेज
शेतकरी, उद्योजक व कंत्राटदार यांना "मजुरांची" समस्या फार मोठी असते. एकतर मजूर मिळत नाहीत, मिळाले तर त्यांच्याजवळ योग्यता नसते, अपेक्षा मोठी असते, अनेक लोकं अंगकाढू असतात, शेतात चोऱ्या करतात, ऐन वेळी काम सोडून निघून जातात वगैरे. सर्वच प्रश्नांना एकाच लेखात समाधान शोधता येणार नाही. इतकेच काय जर तुम्ही या ब्लॉग च्या खाली आपले मतव्यक्त केले, सूचना मांडल्या तर कालांतराने या लेखात सुधारणा करता येतील. गरज हि शोधाची जननी असते. पोटाचा खड्डा भरणे हि मजुराची खरी गरज असते व म्हणूनच तो कामाचा शोध घेतो. मधल्या काळात सरकारने गरिबी रेषे खालील लोकांसाठी २ रु किलो तांदूळ, गहू असे प्रकार केल्याने "पोटाचा खड्डा भरणे" हि गरज संपली व मजुर मिळण्यास मोठी समस्या निर्माण झाली. अर्थात तरीही अनेक ठिकाणी मजूर उपलब्ध आहे कारण प्रत्येकाला फक्त पोटाचा खड्डा भरायचा नसतो. अन्नाच्या पलीकडे चांगले वस्त्र, चांगला निवारा, मुलाबाळांचे शिक्षण, आरोग्य सुविधा, मुला-बाळांची लग्ने, मनोरंजन, पुरेशी व चांगली झोप, सुसंस्कृत मूल्यवर्धित जीवन, म्हतारपणासाठी जमा-पुंजी या देखील गरजा प्रत्येकाला असतात. शेतक...

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद