फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

मूठभर पेरून - सुपभर उगवून, मिळतोय फक्त "कर्जाचा डोंगर आणि आत्महत्येचा विचार"! हे सार संपायला हवे

 
गेली अनेक पिढ्या शेतकरी शेती करतोय. पेरतोय-उगवतोय-काढतोय-विकतोय. जन्माला आल्यापासून - आत्महत्येचा विचार मनात येइपर्यंत तो "आजन्म" शेतीच करतोय. जेव्हा एक बाळ जन्माला येते व मातेच दुध चाखते, त्या दुधात देखील शेतकऱ्याचा घाम असतो. मातेला ममत्व मिळते पण शेतकऱ्यास फक्त "यातना"! ज्याचे पांग आई प्रमाणे फेडायला हवे त्याला आपण काय देतोय? मुठभर पेरून - सुपभर उगवून त्याला मिळतोय फक्त "कर्जाचा डोंगर आणि आत्महत्येचा विचार"! हे सार संपायला हवे, पण केव्हा आणि कधी?

एक शेतकरी जेव्हा गळ्यात फास टाकतो, त्याचे मृत्यूचेभय संपलेले असते. त्या क्षणाला सबंध जगात त्याला कुणाची भीती वाटत नसते. आपल्यापैकी प्रत्येकाने हे लक्षात घ्यावे. स्वत:च्या गळ्यात फंदा टाकायच्या अगोदर जर त्याने तो फंदा आपल्या पैकी एकाच्याही गळ्यात टाकून ओढला तर?  
मित्रांनो, हजारो-लाखो दिवे लावलेत तरी "अंधार" दिव्याखाली लपून बसतो, दिवे विझताक्षणी हा अंधार सारे आसमंत व्यापून टाकतो. प्रत्येक नागरिकाने हे समजावून घेतले पाहिजे. जीवावर उदार होऊन जरी शेतकरी आज जगाची भूक मिटवत असला तरी हि भूक आपल्याच पोटात लपून बसलेली आहे. ज्या दिवशी हा शेतकरी विझला, त्यादिवशी हि भूक सर्व जग व्यापून टाकेल. शेतकऱ्या पाठोपाठ त्याने आज पर्यंत पोसलेली सारी माणुसकी देखील मिटून जाईल. 
जीवन-मृत्यूच्या या युद्धात, शेतकऱ्यावर जबाबदारी आहे "भुकेचे मनोबल" खस्ता करायची जेणे करून जीवनाचा विजय होईल. मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे पण त्या अगोदर जीवन आहे. हे जीवन प्रत्येकाला भरभरून जगता आले पाहिजे. जसे तुम्ही जगता तसे शेतकरयास देखील जगता आले पाहिजे. जेव्हा त्याच्या मनात आत्महत्येचा विचार येईल, जीवनावरील विश्वास कमी होईल, मृत्यूबद्दल प्रेम वाटेल तेव्हा...एकच लक्षात ठेवा तुमच्या आणि माझ्या जीवनाच्या आशेला वात शिल्लक रहाणार नाही.

मित्रहो, जर तुम्ही शेतकरी बांधवांचे ऋण फेडू इच्छित असाल तर तुमच्या जवळच्या शेतकऱ्याला एक पुस्तक भेट द्या. त्यातून तो त्याचा मार्ग शोधू शकेल. ते पुस्तक त्याच्या सुपीक डोक्यात विचार पेरतील व त्यातून तो नव्या शक्तीने उभा राहील. स्वयंप्रकाशित होईल.  

शेतकरी बांधवाना एग्रोडॅडची एक विनंती आहे.अज्ञानातून जाणारी वाट अंधाराकडे जाते. तुम्ही ज्ञानगंगेच्या काठावरील वाट धरा. कुठलाही एक मार्गदर्शक व कुठलेही एक पुस्तक संपूर्ण जीवनात प्रकाश निर्माण करू शकत नाही. सातत्याने नवनवीन पुस्तके वाचीत रहा. ज्ञानगंगेतून नित्य नियमित पणे शुद्द ज्ञान पीत रहा. पुस्तकांशी मैत्री करा. पुस्तकातून "माहिती" मिळेल - माहितीतून "विचार" निर्माण होतील व विचारातून तुमच्यात "ज्ञान वाढीस लागेल". त्यातून तुम्ही सूर्यासारखे स्वयंप्रकाशित व्हाल. अंधारलेली वाट तुमच्या समोर कधीच येणार नाही. तुमच्या जीवनाला समजाच्या उपकाराची गरज रहाणार नाही.


--------------------
हि पुस्तके तुम्ही फोटोवर क्लिक करून खरेदी करू शकता.
 ----------------------------
पुन्हा भेटू पुढील लेखात तो पर्यंत तुम्ही आमची  हि पोष्ट फेसबुकवर शेअर करायला विसरू नका, हि पोष्ट व्हायरल व्हायला हवी ना!

शेअर प्लीज

टिप्पण्या

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गंधक वापरून कमी खर्चात वाढवा उत्पादकता

"मजुरांची" समस्या - नियोजन

मिरचीतील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद