फवारणीतून विषबाधा टाळण्यासाठी आत्मसात करा एकात्मिक नियंत्रणाचे सहा टप्पे
- ओळख शत्रू व मित्रांशी: बहुतेक सर्वच सजीव आपल्या अत्यंत उपयोगाचे आहेत. जे काही जिवंत आहे ते सगळे घालवुन आपले भागणार नाही. एकात्मीक पद्धतीच्या पहिल्या पायरीवर आपल्या शेतात कोणकोणते जीव राहतात यांची ओळख करून घ्यावी.जेव्हा आपण कीटनियंत्रणासाठी फक्त कीटकनाशकावर अवलंबून होतो तेव्हा शत्रू किडीसोबत मित्र किडीला देखील मारून टाकतो. उदा. हेलीकोव्हर्पा या किडीला ७५ पेक्षा जास्त परोपजीवी आजारी पाडू शकतात व ३३ पेक्षा जास्त परभक्षी हिच्यावर ताव मारत असतात. अर्थातच हे सर्व आपले मित्र असतात. जेव्हा आपण बेतहाशा कीटकनाशके मारतो तेव्हा या मित्र परजीवी किडीचा देखील घात करतो. मित्र किडींचा ऱ्हास रोखण्यासाठी आपण प्रयत्न करणे महत्वाचे आहे. त्यासाठी सर्व प्रथम मित्र किडींची ओळख करून घ्यायला हवी.
- परीस्थीतीचे निरीक्षण व परीक्षण: एका अचूक निर्णयासाठी पर्यावरणाच्या परीस्थीतीचे, शत्रू व मित्र जीवांच्या संख्याबळाचे, पिकाच्या वाढीच्या अवस्थेचे व पोषणाचे व्यवस्थित आकलन करायला हवे. अनेक फळांच्या व भाजीपाल्याच्या उत्पादनात क्षेत्राच्या नियमीत निरीक्षणातुन व रासायनिक फवारणीवर अंकुष ठेवुन उत्पादकता व गुणवत्ता यात सुधारणा शक्य आहे. शेतात पिवळे व निळे चिकट सापळे वापरले तर आपल्याला किडींचे निरीक्षण करणे सोपे जाते. सापळ्यांची संख्या वाढवून किडींची वाढ रोखून धरता येते कारण एकदा सापळ्यावर चिकटले कि किडी प्रजनन करू शकत नाही. काही शेतकरी बांधव शेतात मोठ्या पिवळ्या कपड्यावर ग्रीस सारखे पदार्थ लावून फिरवतात. असे केल्याने देखील शेतातील किडींच्या प्रमाणाचा अंदाज येवू शकतो व काही प्रमाणात नियंत्रण देखील होऊ शकते.
- कृती आराखड्याचा उपयोग: कृती आराखड्याच्या वापराने योग्य वेळी व योग्य प्रमाणात किटनियंत्रकाचा वापर करून फक्त कीटनियंत्रकाचा अपव्यय टळतो असे नाही तर परीणाम ही जास्त होतो. जेव्हा तुम्ही एखादे पिक घ्यायचे ठरवता तेव्हा त्यावर कोणत्या किडी येतात व त्यासाठी कोणती कीटकनाशके योग्य आहे याचा अभ्यास अगोदरच केला जावू शकतो. सर्वच कीटकनाशके सारखी नसतात. जी कीटकनाशके किडीच्या मज्जासंस्थेवर परिणाम करतात ती कीड तडपून मरते. जेव्हा कीटकनाशक किडींच्या अन्ननलिकेवर परिणाम करतात तेव्हा किडी भुकेली राहून मरते. काही कीटकनाशके किडीच्या शरीरातील पेशीविभाजन थांबवतात, अश्याने त्यांची वाढ थांबते. काही कीटकनाशकांची काम करण्याची पद्धत अजूनही ज्ञात नाही. कीटकनाशके निवडते वेळी तुम्ही जर एकदा मज्जासंस्थेवर घात केला असेल तर पुढच्यावेळी तुम्ही अन्ननालीकेवर परिणाम करणारे कीटकनाशक वापरावे व त्यानंतर वाढ थांबवणारे. शक्यतो सुरवातीला कोम्बो वापरले तर उत्तम असते. आपण निवडलेल्या पिकासाठी हा पूर्वाभ्यास करून कृतीआराखडा बनवून घेवू शकता. एग्रोडॅड लवकरच असे कृतीआराखड्यांचे नमुने प्रसारित करणार आहे तेव्हा तुम्ही या ब्लोगचे सदस्यत्व आजच घ्या.
- परीस्थितीकीचे व्यवस्थापन: अनेक शेतकरी बांधवांना शेत स्वच्छ ठेवणे जीवावर येते. आपले शेत कसे बगिच्या पेक्षा जास्त नीटनेटके ठेवायला हवे. अनेक हानीकारक कीटक बांधावार, शेजारील पिकावर, कृषि कचऱ्यात व मृदेत निवास करतात. त्यांना वेळीच हुडकून हुसकावून लावण्यासाठी तुम्ही योग्य ते निरीक्षण व कृती करणे आवश्यक आहे. अवजाराच्या व माणसाच्या हालचालीतूनही त्यांचे परिवहन होते. कटिंग साठी वापले जाणारे अवजार निर्जंतुक करणे आवश्यक आहे. पिकाच्या प्रतिकारक्षम जातीच्या वापराने, पेरणितील अंतर व लागवडीच्या वेळेत बदल करून परीस्थितीकीचे व्यवस्थापन शक्य आहे.
- नियंत्रण पद्धतींचा ताळमेळ: बचावात्मक व नियंत्रणात्मक पद्धतींचा योग्य ताळमेळ साधणे आवश्यक आहे. जैविक, भौतिक व रासायनिक पद्धतींचा योग्य ताळमेळ साधल्याने दीर्घकालीन व अधिक प्रभावी नियंत्रण शक्य आहे. त्यामुळे निव्वळ रासायनिक पद्धतीच्या वापराने भोगाव्या लागणऱ्या दुष्परीणामांना चुकवणे शक्य आहे. रासायनिक पद्धतींचा अवलंब हा एकात्मिक नियंत्रणातील शेवटचा घटक असून तीचा उपयोग क्वचीतच व नाममात्र करावा लागतो.
- आपल्या कृतीच्या परीणामाचे व परीणामकतेचे मुल्यांकन: प्रत्येक निर्णय पद्धतींचे विश्लेषण हा अवीभाज्य घटक आहे. नियंत्रित प्लॉट निरीक्षणासाठी ठेवणे, प्रत्येक फवारणी नंतरचे निरीक्षण नोंदुन ठेवणे, पिकाचे गुणात्मक व पिकाच्या उत्पादकतेचे विश्लेषण करणे या क्रिया आपल्या कृतीच्या परिणामकतेचे व परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी उपयोगी सिद्ध होतात.
वाचनातून ज्ञान वाढवा. आजच हि पुस्तके खरेदी करा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा