आपण पुढच्या पिढीला ७/१२ तर देऊ पण शेती देऊ शकणार नाही.
निव्वळ खर्चिक योजना आखून उत्पादन वाढणे शक्य नाही, मातीचे परीक्षण करणे वा त्यानुसार समतोल साधायचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आम्ल-विम्ल व क्षारयुक्त जमिनीचा जन्म वर्षानुवर्षा केल्या गेलेल्या अव्याहत कृषि पाध्दतीचा परिणाम आहे. पुन्हा-पुन्हा चुकांचा तक्ता गिरवुन आजची शेती अशाश्वत झाली आहे. मृदेच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांची अपरिमित हानी झाली आहे. जर हे असेच सुरू राहीले तर आपण पुढच्या पिढीला ७/१२ तर देऊ पण शेती देऊ शकणार नाही.
कधीतरी दूरचित्रवाणी वर एक जाहिरात येत असे. त्यात मुलगा आपल्या वडिलांसोबत कार मधे बसलेला असतो. सिग्नलवर थांबलेल्या गाड्यापैकी एकही गाडी बंद नाही व तेल नाहक जळते आहे हे पाहून तो वडीलांना सांगतो की तो मोठा झाल्यावर "सायकल दुरुस्तीचे दुकान टाकेल कारण तेलतर संपुन जाईल मग सगळे सायकलच चलवतील" वडील आवक होतात व गाडी बंद करतात. आजच सगळे वैभव जगून-आजच सगळा कस काढून आपण मिळवणार तरी काय?
काळ्या मातीला आई म्हणणारे अपण - तिला पार म्हातारी करून चालणार नाही. तिला कसायाला नको पोसायला हवे. तिला नुसते वापरायला नको तिच्या - भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांचे संवर्धन कराया हवे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा