एसीटोबॅक्टर व उसाची सहजीवन
आता मुळ मुद्याकडे वळायल हवे. १९७०-८० चा दशकात असे लक्षात आले की उसाच्या काही प्रजाती त्याच्या एकूण नत्रापैकी ६० टक्के नत्र जैवीक स्थिरीकरणाचा माध्यमातून मिळवतात. इतके प्रभावी जैविक स्थिरीकरण कोणता जीवणु करू शकतो? या प्रश्नाचे उत्तर शोधतांना सँखेरोबॅक्टर नायट्रोकॅप्टन्स या जीवणुच शोध लागला. पुढे संशोधनानंतर तो एसीटोबॅक्टर चा सगा-सोयरा असल्याचे लक्षात आले (एसीटोबॅक्टर ही जीवाणुची जात १८८० पासुन ज्ञात आहे). नत्राचे स्थिरीकरण करतो व ग्लूकोज/सुक्रोज या साखरेचे ३० टक्के प्रमाण सहज सहन करतो म्हणून आंतरराष्ट्रीय सांकेतीक नियमा नुसार त्याचे नामकरण ग्लुकोनॅसीटोबॅक्टर डायअँझोट्राँपिकस् असे ठरवले गेले. सुरवातीला जरी हा जीवणु फक्त उसात सापडला तरी नवीन संशोधना नुसार तो रताळे, तृणवर्गीय-तण, कॉफी, अननस इतकेच काय पण उसावरील पांढऱ्या ढेकणातही आढळून आला. नुकत्याच संशोधनात त्याचे दोन भाउ-बंधू ही शोधले गेले व त्यांना नाव दिले गेले: ग्लुकोनॅसीटोबॅक्टर अझोकॅप्टन्स व ग्लुकोनॅसीटोबॅक्टर जोहाने.
उसाच्या व एसीटोबॅक्टर च्या सहजीवनाचा विचार केला तर उसामधे एसीटोबॅक्टर ला आश्रय तर मिळतोच शिवाय, अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. तो उसाच्या गाभ्यात जगत असल्यामुळे त्याला इतर जिवणुंचा सामना करावा लागत नाही, वातावरणातील बदलांपासुनही त्याचे रक्षण होते. उसासाठी हा जिवणु काय करतो?
आज जरी आपण भारंभार युरीया शेतात टाकत असलो तरी आपल्या वाडवडलांच्या काळात तसे नव्हते (कदाचित आपल्या पोराबाळांच्या काळातही युरीया उपलब्ध नसेल). त्याकाळी उसाला एसीटोबॅक्टरकडून नत्राचा पुरवठा होत असे व पुढेही होईल - हे सांगायला नको. उसाच्या गाभ्यात होणाऱ्या स्थीरीकरणामुळे संपुर्ण लाभ ऊसालाच होतो, हे नत्र वाहुन जात नाही.
नत्रा व्यतिरीक़्त, एसीटोबॅक्टर ऊसाला आँक्झीन्सचा पुरवठा करतो. १९९३ मधे “प्लान्ट अँड साँईल” या वैज्ञानीक नियतकालीकात प्रसिध्द झालेल्या शोधनिबंधात असा उल्लेख अधळतो. या संशोधनात मिळवलेल्या सर्व म्हण्जे १८ स्ट्रेंन मधे अशी क्षमता होती. लेखकाच्या अनुमानानुसार हा जीवाणू ऊसाच्या मुळांची वाढ वेगाने करतो.
क्झान्थोमोनास नावाचा जीवणु उसावर रोग निर्माण करतो. त्यासाठी तो मोठया प्रमाणात डिंकासारखा चिकट पदार्थ उसाच्या वाहिन्यांमधे स्त्रवत-वाहीन्यात अडथळे निर्माण करतो. २००५ मधे योलांडा ब्लांडो यानी केलेल्या संशोधनात असे आढळुन आले की एसीटोबॅक्टर “लाईसोझाइम” नामाचा पदार्थ स्त्रवतो व क्झान्थोमोनासची वाढ रोखतो तसेच डिंक स्त्रवण्याची प्रक्रियाही थांबवतो. अशाच प्रकारचे संशोधन “करंन्ट सायन्स” या भारतिय नियतकालीकात प्रसिद्ध झाले असून मुट्टूकुमारस्वामी यानी लिहिलेल्या या शोधनिबंधात एसीटोबॅक्टर उसातील “कोलेटोट्रायकम फलकॅटम” या बुरशिवर नियंत्रण करतो हे पुराव्यानिशी सिद्ध केलेले आहे.
निसर्गाने कालबध्द पद्धतीने जे सहजीवन नेमुन दिले आहे त्याचे अनेक पहलु अजुन उलगडाचेच आहेत. जोपर्यत आपले ज्ञान अपुर्ण आहे तोपर्यत “एसीटोबॅक्टर व उसाचे हे सहजीवन” - “साखरेइतकेच गोड” आहे - असे म्हणायला हरकत ती काय?
आपण एसीटोबॅक्टर चे जीवाणू खत व उस लागवडीवर पुस्तक खरेदी करू शकता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा