फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

हरभरा पिकात वापरायची कीटकनाशके


हरभरा पिकात घाटेअळी, तंबाखू अळी, कटवर्म  व उंदीर यांचा त्रास होतो. घाटेअळी ने होणारे नुकसान खूप मोठे असते. आपल्या कडील बहुतेक पिकात अशाच किडींचा कमी जास्त प्रभाव असतो. गेल्या अनेक वर्षात अनेक प्रकारचे रासायनिक कीटकनाशक वापरून या किडींचा नाश आपण करू शकलेलो नाही. त्यामुळे कुठलेही एक औषध हे काम करू शकेल असे वाटत नाही.

या किडींचा समूळ नाश करण्या ऐवजी यांची संख्या नियंत्रणात राहील असा प्रयत्न आपण करू शकतो. यासाठी सर्व प्रथम परिसर स्वच्छ ठेवावा. काडीकचरा व  तण मुक्त असावा. मातीत देखील किडी वाढू नये म्हणून योग्य ती मशागत केलेली असावी. वर्षभरातून एकदा जमिनीत चांगल्या कुजलेल्या सेंद्रिय खतासोबत ट्रायकोडर्मा व मेटारायझीअम सारखी जीवाणू औषधे (एकरी १ ते ३ किलो) नीट मिसळलेली असावीत.

कीड नियंत्रणासाठी सर्वप्रथम नैसर्गिक प्रक्रियांचा उपयोग करणे आवश्यक आहे. मित्रकिडीचा वावर आपल्या शेतात आहे कि नाही याचा अभ्यास करायला हवा. कोळसा, साळुंख्या व चिमण्या मोठ्या प्रमाणत किडीचा फज्जा उडवतात. त्यांच्यासाठी थांबे बनवावे.

पिवळे व निळे चिकट सापळे ७:३ प्रमाणत वापरल्याने त्यावर किडी चिकटतात. त्यावर बघून आपण कोणती कीड किती प्रमाणात आहे याचा अंदाज लावू शकतो. एकरी २० ते २५ सापळे (६ इंच  X ८ इंच)  लावले तर किडींचा प्रजननाचा वेग मंदावून कीड नियंत्रित रहाते.

हरभरा पिकात घाटेअळी चे नियंत्रण सर्वात महत्वाचे आहे त्यासाठी सुरवातीलाच कामगंध सापळे लावले तर तिच्या संख्येवर लक्ष ठेवून चांगले नियंत्रण शक्य आहे. 

वरील फोटोवर क्लिक करून आपण २५ सापळे घरपोच मागवू शकता.

औषधी निवडते वेळी वेगवेगळ्या गटातील औषधी निवडावी.

सुरवातीला नैसर्गिक कीटकनाशक वापरणे जास्त फायदेशीर असते. वनस्पतीजन्य औषधी, जीवाणूजन्य औषधी, विषाणूजन्य औषधी, मज्जारज्जू व स्नायू जखडणारी औषधे, श्वसनप्रकिया थांबवणारी औषधे व वाढरोधक औषधे अशा क्रमाने आलटून पालटून औषधी ची निवड केल्यास किडीत प्रतिकार क्षमता विकसित होत नाही.

घाटेअळी व तंबाखू अळीच्या नियंत्रणासाठी गट निहाय औषधी

वनस्पतीजन्य औषधी: अझाडीरेक्टिन ३०० पीपीएम

जीवाणूजन्य औषधी: बॅसिलस थुरीनजेनसीस ५ ट्क्के वेटेबल पावडर

विषाणूजन्य औषधी: एच एनपी व्ही

मज्जारज्जू व स्नायू जखडणारी औषधे: क्लोरानट्रानीप्लोर १८.५ टक्के एस सी,  इथीओन ५०% इ सी, क्वीनोलफॉस २५ टक्के ईसी

वाढरोधक औषधे: नोवाल्युरॉन १० टक्के इसी


कटवर्म च्या नियंत्रणासाठी गट निहाय औषधी

मज्जारज्जू व स्नायू जखडणारी औषधे: क्लोरपायरीफॉस २० टक्के इसी

उंदीर नियंत्रणसाठी
ब्रोमोडीलोन ०.२५ टक्के सीबी: एक किलो गहू, ज्वारी, मका, बाजरी याचे तुकडे किंवा पिठात १० ग्राम खायचे तेल, २० ग्राम गुळ किंवा पिठी साखर व २० ग्राम औषध चांगले मिसळावे व बिळा भोवती व यायच्या जायच्या रस्त्यावर टाकावे. याच्या विष बाधेतून उंदराच्या शरीरात रक्तश्राव होतो.



टिप्पण्या

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गंधक वापरून कमी खर्चात वाढवा उत्पादकता

"मजुरांची" समस्या - नियोजन

मिरचीतील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद