फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

लसूण लागवड




लसूण पिकासाठी रासायनिक खतमात्रा एकरी नत्र ३० किलो, स्फुरद १६ किलो, पालाश १६ किलो व गंधक १६ किलो आवश्यक आहेत. 

लागवडीवेळी १० किलो नत्र आणि स्फुरद, पालाश व गंधकाच्या संपूर्ण मात्रा द्याव्यात. उर्वरीत नत्रमात्रा दोन समान हप्त्यात विभागून ३० आणि ४५ दिवसांनी द्याव्यात. 

ठिबक सिंचन वापरत असल्यास, लागवडीपूर्वी १० किलो नत्र देऊन, उर्वरीत नत्रमात्रा सहा समान हप्त्यात विभागून दहा दिवसांच्या अंतराने द्याव्यात. 

अॅझोस्पिरीलम आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणू (पीएसबी) या जैविक खतांच्या प्राथमिक मात्रा प्रत्येकी २ किलो प्रति एकर या प्रमाणात द्याव्यात. 

पुनर्लागवडीपूर्वी किंवा पुनर्लागवडीच्या वेळी ऑक्‍सिफ्लोरफेन (२३.५ ईसी) १.५ ते २ मि.ली. प्रति लिटर किंवा पेंडीमिथेलीन (३० ईसी) ३.५ ते ४ मि.ली. प्रति लिटर या प्रमाणात या तणनाशकांचा वापर करावा. लव्हाळा व हरळीच्या नियंत्रणासाठी ग्लायफोसेट वापरू नये. यांचा बंदोबस्त पूर्वमशागतीने होऊ शकतो. खोल नांगरट करून हरळीच्या काशा किंवा लव्हाळ्याच्या गाठी वेचणे हाच पर्याय वापरावा. 


लागवडीकरीता १.५ ग्रॅम वजनाच्या पाकळ्या निवडाव्यात. लहान, पोचट, रोगट लसून कळ्या निवडू नयेत. बुरशीजन्य रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कार्बेन्डाझीम २ ग्रॅम अधिक कार्बोसल्फान २ मि.ली. प्रतिलिटर या द्रावणात लसूण कळ्या दोन तास बुडवून नंतर लागवड करावी. लसूण कळ्या टोकण पद्धतीने १५ बाय १० सेमी अंतरावर व २ सेमी खोलीवर उभ्या लावाव्यात. एकरी १६० ते २०० किलो कळ्या लागतात. 

पाकळ्या कोरड्यात लावल्यानंतर लगेच पाणी द्यावे. उगवण झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. 
संकलन: व्हाॅटसएप

टिप्पण्या

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गंधक वापरून कमी खर्चात वाढवा उत्पादकता

"मजुरांची" समस्या - नियोजन

मिरचीतील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद