फॅशनच्या युगात शेतकऱ्यास कमाईची संधी
शेतकरी मित्रहो आज फॅशनचा जमाना आहे. जितका खर्च लोकं खाण्यावर करीत नाही त्यापेक्षा अनेकपट खर्च पोशाखावर करतात. "एक नूर आदमी दस नूर कपडा" अशी म्हण आता सत्यात उतरते. उदाहरणच द्यायचे झाले तर पूर्वी आपले नेते साधे पोशाख करत आणि आता भरजरी कापडे घालूनच मिरवतात, त्यांना "दस नूर" म्हणजे स्वत:च्या "दहा पट" "प्रभावी" दिसायचे असते. असो आपल्याला या खर्चिक व्यक्तीला आपला ग्राहक बनवायचे असेल तर त्याला हवा असलेला माल बनवून द्यावा लागेल.
याच धर्तीवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कापूस ते फॅशन पर्यंतचा टप्पा "महाराष्ट्रातच" पूर्ण करायचा ठरवला आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे अशीच आपली शुभेच्छा असावी. पण आपण त्यांच्या थोडे पुढे जावून विचार करू. खाली आधुनिक फॅशनचे काही नमुने दाखवत आहे.
याच धर्तीवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कापूस ते फॅशन पर्यंतचा टप्पा "महाराष्ट्रातच" पूर्ण करायचा ठरवला आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे अशीच आपली शुभेच्छा असावी. पण आपण त्यांच्या थोडे पुढे जावून विचार करू. खाली आधुनिक फॅशनचे काही नमुने दाखवत आहे.
रूपमिलनच्या या रेशमी लहेंगा चोली ची किंमत रु ९४७००/- आहे.
रेशमी ज्वेलरीची किंमत रु. १२५००/-
एकूणच तात्पर्य हेच कि जर आपण रेशीम निर्मिती करून त्यापासून धागा, वस्त्र व पोशाख किंवा ज्वेलरी बनवू शकलो तर "चांगली कमाई" करू शकू. अर्थात या साठी आपल्याला रेशीम उद्योगाची संपूर्ण माहिती गोळा करणे आवश्यक आहे. शासनातर्फे नागपूर येथे "रेशीम संचनालय" सुरु करण्यात आले असून राज्यात २८ जिल्ह्यात "जिल्हा रेशीम कार्यालाये"आहेत. त्यांच्या संपर्काची सूची मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.
रेशीम उद्योगात आज अनेक महाराष्ट्रीयन शेतकरी कोषनीर्मिती करून राज्यात व राज्याबाहेर विक्री करीत आहेत. अनेक शेतकरी मित्रांनी प्रायोगिक तत्वावर एखाद्या एकरवर सुरवात केली आहे. काही ठिकाणी गट शेतीच्या माध्यमातून "रेशीम कोश निर्मितीचे" काम केले जाते. कराड तालुक्यातील वाठार येथे समीर व सुप्रिया पवार या दाम्पत्याने तर रेशीम धागा निर्मितीचे देखील काम सुरु केले असून ते लगतच्या जिल्ह्यातून "रामनगर" च्या भावात रेशीम कोश खरेदी करीत आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडीओ पाहू शकता. (कागद पेन घेवून माहिती लिहून घ्या!)
तुमच्या मनात रेशीम उद्योग करायची इच्छा असेल तर त्या पूर्वी खालील पुस्तक वाचायला विसरू नका. लिंक वर क्लिक करून खरेदी सुद्धा करू शकता.
या पुस्तकात आपल्याला महाराष्ट्रातील "रेशीम शेती" विषयी शास्त्रीय तसेच संपर्कांची माहिती मिळेल.

वरील चित्रातील स्त्री रेशीम कोशाचा वापर चेहेऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी वापरात आहे. कोशाच्या धाग्यांना एकत्र धरून ठेवणारा घटक सेरीसीन चेहेर्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी उपयुक्त असतो. एका बाजूने कापलेल ३० कोश ३०० रुपयाला विक्री होतात. तुमच्या उद्योगात वाया जाणारे कोश या पद्धतीने विकणे शक्य आहे.
जर तुम्ही किंवा तुमच्या जवळची एखादी व्यक्ती रेशीम धागा स्वस्तात मिळवू शकले तर त्याला थोड्या कल्पनाशक्ती व मेहनतीची जोड देवून वर दाखवल्या प्रमाणे ज्वेलरी देखील बनवू शकता. चांगला ब्रांड बनवून एमेझोन सारख्या वेबसाईट द्वारे विकू शकता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा