फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

शेतकऱ्याचा ध्येय्यवाद


आपले ध्येय्य निश्चित असणे महत्वाचे आहे. तसे नसले तर कामाची गाडी रुळावरून भरकटून जाईल, फक्त धावत राहील, पोहोचणार कुठेच नाही. ध्येय्य ठरवल्यामुळे तुमच्या योजनेला एक स्परूप येते. योजने मुळे कोणकोणती कामे करायचे ते ठरते. कामे केल्याने परिणाम प्राप्त होतात व फलस्वरूप "यशप्राप्ती" होते.
जेव्हा आपण सहल काढतो किंवा प्रवास करतो त्यावेळी प्रत्येक गोष्ट ठरवतो. कुठून कुठे कसे जायचे, केव्हा जायचे, किती लोकं रहातील, खान-पान कसे होईल? म्हणजेच कुठे जायचे हे माहिती असले कि सर्व काही ठरवता येते. 
यशस्वी शेतकरी होण्यासाठी दोन प्रकारची ध्येय्य ठरवावी लागतील. सामान्य ध्येय्य व निश्चित ध्येय्य. 
सामान्य ध्येय्य: मी एक चांगला शेतकरी बनेल, शेतीचा अभ्यास वैज्ञानिक पद्धतीने करेल, कामापासून लक्ष विचलित करणाऱ्या सवयी जसे वेश्यावृत्ती, जुगार, दारू या पासून दूर राहील. 
निश्चित ध्येय्य:मी पिकाच्या निवडीत वैविध्य आणून या वर्षी मागील वर्षाच्या २० टक्के अधीक उत्पादन घेईल. वार्षिक उत्पादनाचा
    • २० टक्के भाग मी रोजच्या भाजीपाला विक्रीतून कमवेल
    • २० टक्के भाग दुध व दुग्धजन्य उत्पादनाच्या विक्रीतून महिन्याकाठी कमवेल
    • २० टक्के भाग पशुधन, शेणखत व फळांचा व्यापार करून मिळवेल व
    • ४० टक्के उत्पादन व्यापारी पिकाच्या माध्यमातून कमवेल
मित्रहो, अश्या प्रकारची ध्येय्य निश्चिती फार महत्वाची आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या अभ्यासानुसार ध्येय्य ठरवू शकतो. आर्थिक विश्लेषण करते वेळी येणारा पैसा कसा, किती व केव्हा येईल  हे ठरवले कि ध्येय्याच्या वाटचालीची समीक्षा नियमित पणे शक्य आहे.
वरील उदाहरणा नुसार जर वार्षिक लक्ष्य १० लाख नफा कमवण्याचे असेल तर दोन लाख रुपये "रोजच्या भाजीपाला विक्रीतून" कमवायचे आहेत. दिवसा काठी निव्वळ नफा म्हणून ५४८ रु आले आहे कि नाही? आले नसतील तर ते येण्यासाठी योग्य बदल करता येतील. असेच विश्लेषण मासिक उत्पन्नाचे करता येईल.


ध्येय्य ठरवणे हे थोडे "भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्या सारखे आहे". नाणेफेक झाल्यवर पहिले फलंदाजी करायची असेल तर व्हीकेट वाचवत, प्रत्येक ओव्हर ला जास्तीत जास्त स्कोअर करायचा व पहिले गोलंदाजी आली तर प्रत्येक बॉल "व्हीकेट" पडेल हे लक्ष्य ठेवूनच टाकायचा". 
मित्रहो स्मार्ट शेतकरी म्हणजे निव्वळ मेहनत करण्याऐवजी एक दिशा ठरवून फक्त त्याच दिशेत मोजून-मापून मेहेनत करणारा शेतकरी. सातत्याने आर्थिक विश्लेषण करत आपली दिशा चुकत नाहीये हे बघणारा शेतकरी.
हा लेख तुम्हला कसा वाटला? आपली टिप्पणी प्रविष्ट करायला विसरू नका. शिवाय हा लेख तुमच्या मित्र व प्रियजनासोबत शेअर करायला देखील विसरू नका!

टिप्पण्या

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गंधक वापरून कमी खर्चात वाढवा उत्पादकता

"मजुरांची" समस्या - नियोजन

मिरचीतील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद