फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

जब दिल आए गधी पर तो परी क्या चीज है


जब दिल आए गधीपर तो परी क्या चीज है? अशी एक म्हण आपल्याकडे आहे. प्रेमात आंधळ्या झालेल्या व्यक्तीबद्दल या म्हणीचा प्रयोग होतो.  तरूण/अधेड वयात "तू मला आवडतोस" किंवा "आवडतेस" असे म्हणणारी एक व्यक्ती हवी असते. जेव्हा असे घडते तेव्हा "तो" किंवा "ती" अचानक फार आवडायला लागते. त्या व्यक्तीशिवाय दुसरा विचारच मनात येत नाही. मन "सैराट" होते. हि प्रभावळ इतकी प्रबळ असते कि "भान" ठिकाणावर आणणारा मित्रपरिवार किंवा परिस्थती नसेल तर "सैराट" घडल्याशिवाय रहात नाही. जर त्या कथेत प्रिन्सदादा नसेल तरी असे प्रेम काही काळाने "अपयशीच ठरते". "तो" किंवा "ती" जितकी हुशार, सुंदर, आकर्षक, प्रेमळ वाटत होते, जाणवत होते, ते सगळे बदलून जाते. प्रेमाचे चार दिवस संपले कि त्याचा किंवा तिचा "दुष्टपणा", "पोकळपणा", "अप्पलपोटेपणा" स्पष्ट दिसायला लागतात. आपण प्रेमाच्या प्रभावळीत "कपाळमोक्ष" करून घेतला आहे हे कळते तो पर्यत अर्धे आयुष्य संपून जाते.
तुम्ही शेअर बाजाराचा अभ्यास केला आहे का कधी? सर्वीकडे एका विशीष्ट कंपनीचा मोठा बोलबाला असतो. त्या कंपनीचे उत्पादन, सर्व्हिस, मार्केटींग अतिशय चांगले असते. तिचे भविष्य अतिशय "भव्य" असते. सीइओ अगदी "डाऊन टू अर्थ" असतो. महागडे असले तरी तुम्ही त्या कंपनीचे शेअर घेण्यासाठी धडपडत असतात. तुम्हीच काय - अगदी प्रत्येक व्यक्ती! अचानक....नको ते घडते. नोकिया...पडली, सत्यम...पडली. इन्फोसिस गटांगळ्या खाते. इकडे अनेक लोकं रस्त्यावर येतात. त्या कंपनीचे उत्पादन एकदम बकवास वाटू लागते, सर्व्हिस डफर असते, सीइओ "दिखावू" असतो. एव्हाना अध्याय संपलेला असतो.


शेतकरी दादा, तू सुद्धा असा वेडा पिसा होऊन पिकांच्या प्रेमात पडतच असतो. आठवून बघ...जेव्हा तू संपूर्ण शेतात फक्त "कोरपड" लावली व नंतर उपटून फेकली. असे एकदा नाही अनेकद झाले आहे. डाळिंब, कांदा, हळद, आले, साग, असे अनेक पिके येवून गेले. कुणीतरी एखादा उद्योजक येतो काय, तुमच्याच गावातील गणेशला सोबत घेतो काय, त्याचा बिझिनेस प्लान सांगतो काय आणि तुम्ही त्याचे ऐकता काय! कापूस म्हणजे काही प्रेमात पडण्यालायक पिक आहे का?  पण नाही. आपल्याला फक्त कापूसच लावायचा असतो. एकरभर देखील "भाजीपाल्या" साठी ठेवायची तयारी नसते. कोण करेल वणवण?

जाहिरातवाले प्रभावळीचा फार छान उपयोग करून घेतात. एखाद्या क्रिकेटर किंवा नटीला पाण्याच्या शुद्धतेची काय समज? पण करोडो रुपये जाहिरातीवर घालवले जातात व अश्या जाहिराती आपल्या मनावर भरपूर प्रभाव देखील पाडतात!

शेतात फवारायचे जहाल विषारी कीटकनाशक, त्याचा एखाद्या आकर्षक दिसणाऱ्या बाटलीचा काय संबंध! शेतात कुठले ठिबक वापरायचे हे एखाद्या नटीने किंवा नटाने का सांगावे? ट्रॅक्टर चालवत फोटो काढले म्हणून काय कुणी "शेतकरी नेता" बनू शकतो का? हि लोकं नुसतीच प्रभावळ पसरवित असतात.

मानसशास्त्रज्ञ एडवर्ड ली थोर्नडिक याने १०० वर्षापूर्वी "प्रभावळीच्या परिणामाचा" शोध लावला. त्याचे म्हणते होते कि फक्त एकच दिखावू गुणधर्म तुमच्यामनावर प्रभावळ पसरवू शकतो. प्रभावळीचे परिणाम भव्य दिव्य असू शकतात. आर्कषक दिसणारी व्यक्ती "हुशार" वाटू लागते. शिक्षक "चुणुकदार" दिसणाऱ्या मुलांना जास्त मार्क देवून मोकळे होतात. मोठ्या गाडीतुन आलेले साहेब "व्यवहारी सल्लागार" वाटू लागतात. 

तुम्ही कुणीही असा, विद्यार्थी, ग्राहक, शिक्षक, शेतकरी किंवा पत्रकार, "प्रभावळी" चा परिणाम तुम्हाला कुशीत घ्यायला वेळ लावत नाही.

मित्रहो, यशस्वी होण्यासाठी विचार सुस्पष्ट असायला हवेत. स्पष्ट विचारातून अचूक निर्णय क्षमता विकसित होते व योग्य निर्णय शृंखला तुम्हाला यशस्वी बनवते. नेमकी मेख इथेच असते. अनेक शेतकरी बांधव सचोटीने शेतीच्या मागे लागतात. तन-मन-धन लावून शेती करतात. स्वत:चे सर्वस्व झोकून देतात. आपल्याला यशाच्या जवळ जाता यावे म्हणून ते वाचन सुरु करतात. टीव्ही वरील व युट्युब वरील यशोगाथा ऐकतात. मोठमोठ्या कंपन्यांच्या वेबसाईटला भेट देतात. एक्झिबिशनला भेट देतात. त्यांना नाविन्याचा शोध घ्यायचा असतो. नेमक्या याच ठिकाणी तुमचा रस्ता चुकवणारे "चकवे" उभे असतात तुमची वाट पहात...

एकदा एका संगीतकारास त्याच्या गाण्यासाठी नवीन व गोड गळ्याच्या "गायक व गायीका" हव्या होत्या. त्याने ओडिशन आखले. डोळ्यावर पट्टी बांधली व पलीकडल्या खोलीत गायक व गायिकांना क्रमाक्रमाने गायला लावले. त्यांचे नाव, धर्म, वय व लिंग न विचारता त्याने सर्वांचे आवाज ऐकले. कुठलीही शिफारस ऐकून घेतली नाही. त्याने फक्त दोनच गोष्टीची नोंद घेतली. गायकाचा अनुक्रमांक व आवाज. इथे प्रभावळीला वावच नव्हता.  

टिप्पण्या

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गंधक वापरून कमी खर्चात वाढवा उत्पादकता

"मजुरांची" समस्या - नियोजन

मिरचीतील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद