फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

शापित विजेते होऊ नका, स्वैरइच्छेला आवर घाला


या वर्षी कोणते पिक पेरताय? प्रत्येकाचे उत्तर होते कापूस. मैलोगणती कुठेही नजर टाका सर्वीकडे कापूसच. पिक पाच फुटाच्या वर वाढले. फेसबुकवर एकसे एक फोटो! कहर झाला! बोंडअळी चा हल्ला झाला, फवारणी सरू झाली. फवारणी करते वेळी विविध ठिकाणी २५ पेक्षा अधिक शेतकरी/मजूर विषबाधा होऊन मेले. दोन वर्षापूर्वी कांद्याची लाट आली होती, तो सडला. मग तुरीची लाट आली, तुरीचा भाव पडला. कापसाचे काय होते आहे ते आपण बघतो आहोत. रब्बीत हरभरा पेरणी जोरात आहे, काय होणार हे ज्योतिषाला विचारायची गरज नाही.

हे थोडे जुगारासारखे होत नाहीये का?

किसन एका ठिकाणी बोली लावायला पोहोचला. अनेक नामीगिरामी व्यक्ती जमले होते. एका जमिनीच्या तुकड्याचा लिलाव होता.  या तुकड्याची किंम्मत कमीत कमी पाच कोटी तर जास्तीत जास्त २५ कोटी असू शकते असा सर्व साधारण अंदाज होता. लिलाव सुरु झाला. बोली वाढत गेली. किसन ने मनोमनी ठरवले होते कि हि किंमत फारतर आठ कोटी असू शकते. बोली आठ कोटीच्या वर जावू लागल्यावर किसन ने बोली लावणे बंद केले. लाजीपतराव बोली जिंकले, त्यांनी तो जमिनीचा तुकडा ५५ कोटीत खरेदी केला. जिंकण्याच्या खुशीत लाजीपतरावांनी एक धमाल पार्टी देखील दिली. किसन मनोमनी हसत होता कारण त्याला ठावूक होते कि लाजीपतराव लवकरच त्यांची एखादी मोठी स्थावर त्याच्याकडे अर्ध्यापेक्षा कमी किमतीत विकायला येतील. लाजीपत एक शापित विजेते होते. ते लिलाव जिंकले पण व्यवहार हरले! किसन लिलाव हरला पण व्यवाहार जिंकला. कारण एकच होते "लाजीपत त्यांच्या स्वैरइच्छेला आवर घालु शकत नव्हते व किसन स्वैरइच्छेला लिलावाच्या ठिकाणी घेवूनच येत नव्हता.



ललित एका मेगामार्टचा खरेदी अधिकारी होता. त्याच्या मार्ट मध्ये हजारो कंपन्यांची उत्पादने विकली जात होती. दिवाळी जवळ येत असल्याने त्याला मध्यम दर्जाच्या डाळीची खरेदी करायची होती. इतर कंपन्यांच्या ब्रान्डेड डाळी तर विक्रीला होत्याच त्याव्यतिरिक्त मेगामार्टच्या नावाने एकूण १०० टन डाळ लागणार होती.  त्याने पाच सप्लायर्सला फोन लावला व चर्चा केली. चार वाजेपर्यंत खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली. त्याने सर्वात स्वस्त दरात सर्वोत्तम डाळ खरेदी केली होती. इतर कुठल्याही ब्रांड पेक्षा हि डाळ सुपर होती. मेगामार्टला आपला सप्लाय टिकून रहावा, आपली इतर उत्पादने विकली जावी म्हणून एका व्यापाऱ्याने या सौद्यात नुकसान सहन करत डाळ विकली होती.

रविनाला घराला रंग द्यायचा होता. तिने सकाळचा चहा पीतपीत एका क्लासिफाइड जाहिरातीच्या वेबसाईटवर त्याची माहिती टाकली. दुपारच्या चहापर्यंत तिच्याकडे १२ पेंटरचे फोन आले होते. प्रत्येकाने वर्गफुटानुसार दर दिले होते. ती तोलमोल करत होती, अटी व दर ठरवत होती. मंदीमुळे पेंटर लोकांकडे काम नव्हते. ते तडजोड करीत होते. काही पेंटरने इतके कमी दर लावले कि तिलाच दया येत होती. प्रमाणापेक्षा कमी दर देणाऱ्या पेंटरला काम द्यायचे नाही असे तिने ठरवले कारण त्याचे फार नुकसान झाले असते. त्याच्या नुकसानभरपाईसाठी तो घरात चोरी करू शकतो अशी देखील तिला भीती वाटली होती.

मित्रहो आपण अश्या जगात आलो आहोत जिथे व्यवाहार करण्यापूर्वी आपल्या हद्दी ठरवाव्या लागतात. तुमच्या शेतात या हंगामाचे लोकप्रिय पिक नसले तरी चालेल पण जे पिक असेल त्याने तुम्हाला नफा द्यायला हवा. तुमच्या शेतीतून दररोज काही नफा येईल, दर महिन्याला काही विशिष्ट नफा येईल, दर तीन महिन्याला काही नफा येईल, वर्षातून एकदा काही नफा येईल व चार ते पाच वर्षात काही नफा येईल अशी योजना आखा. भाजीपाला, दुध, अंडी यातून दैनंदिन पद्धतीने नफा मिळतो. दुधाचे उकडे असले तर मासिक उत्पन्न मिळते. रेशीम उद्योग, मधमाशी पालन यातून तिमाहीला नफा मिळू शकतो. कापसासारख्या व्यापारी पिकातून वार्षिक नफा येवू शकतो.

मित्रहो, शापित विजेते होऊ नका. स्वैरइच्छेला आवर घाला. थोडा-थोडा करीत नफा कमवत रहा. एकदम मोठा हात मारायचा प्रयत्न करा पण त्या अगोदर आज काय मिळवता येईल ते बघा.

टिप्पण्या

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गंधक वापरून कमी खर्चात वाढवा उत्पादकता

"मजुरांची" समस्या - नियोजन

मिरचीतील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद