शेतकरी पुन्हा पुन्हा भुकेलाच का रहातो?
मित्रहो कश्यामुळे काय घडले यात मोठी गल्लत होत असते. आपण गरीब का आहोत? आपल्याला सातत्याने नुकसान का होते आहे? आपल्या पिकावर एव्हडी कीड अचानक कशी आली? कापसाचे भाव का पडले? उसाला भाव का मिळत नाहीये? फवारणी करते वेळी विषबाधा का झाली? अश्या सर्व प्रश्नांची जी उत्तरे आपल्याला ठावूक असतात ती चुकीची असू शकतात.
दूरवर एका बेटावरील रानटी जमातीत, सर्वांच्या डोक्यात उवा असत. त्यांच्यासाठी ती एक सामान्य बाब होती. या लोकांच्या मनात असा समज होता कि "डोक्यातील उवा गेल्या कि ताप येतो". मग हि माणसे ताप अल्येल्या माणसाच्या डोक्यात उवा टाकत. कालांतराने ताप उतरला कि उवा परत त्याच्या डोक्यात वाढू लागत. त्यांच्या मते उवा ताप घालवतात!
अर्थात ते खोटे होते. कुणालाही ताप आला कि उष्णतेमुळे उवा "गायब" होत व ताप गेला कि परत येत.
एक नवखा महापौर शहरातील परिस्थितीचा अभ्यास करीत होता तेव्हा त्याला एक आलेख दिसला. या आलेखात शहरात लागलेल्या आगीत किती नुकसान झाले व किती अग्निशामक कर्मचारी ती आग विझवायला गेले हे दाखवले होते. महाशयांनी यावरून हे ठरवले कि जितके जास्त कर्मचारी आग विझवायला गेले तीतीके जास्त नुकसान झालेले होते. त्याने लगेच कर्मचारी कपातीचे फर्मान काढले.
खरे काय होते? आग मोठी असली कि नुकसान मोठे होते व कर्मचारी देखील जास्त लागतात.
अभ्यास असे सांगतो कि दीर्घकाळ इस्पितळात राहिल्याने रुग्णाची तब्येत खालावते. हि बाब आरोग्यविमा कंपन्यांना फार आवडते. पण खर काय आहे. इस्पितळातून लवकर सुट्टी घेणारया व्यक्तीची तेब्येत, दीर्घकाळ इस्पितळात घालवणाऱ्या व्यक्तीपेक्षा चांगलीच असते, म्हणूनच तो लवकर बरा होतो व सुट्टी मिळवतो.
चांगला पाऊस पडला तर शेतकरी बांधव आनंदी होतात. त्यांना वाटते कि चांगला पाउस म्हणजे अधिक उत्पादन व अधिक फायदा. प्रत्यक्षात काय होते? चांगला पाउस पडला तर पिके चांगली येतात, उत्पादन वाढते व किमती पडतात. मालाला चांगला भाव न मिळाल्याने शेतकऱ्याचे नुकसान होते. पाउस बेताचा पडला किंवा कमी पडला तर भाव वाढतात पण तितके उत्पादन न मिळाल्याने शेतकरी पुन्हा भुकेलाच रहातो.
यावरून आपण काय अनुमान काढणार? पावसाचा व उत्पनाचा संबंध आहे. उत्पादन व शेतकऱ्याच्या आनंदाचा संबंध आहे पण चांगल्या किंवा वाईट पावसा मुळे शेतकरी आनंदी किंवा दुखी होऊ शकत नाही. शेतकऱ्याला जर जास्त नफा कमवायचा असेल तर त्याला त्या पिकाचे उत्पादन जास्त घ्यावे लागेल जे बाजारात उपलब्ध नाही, किंवा इतर शेतकरी बांधव ते उत्पादन घेत नाही. तुमच्या उत्पादनाचा दर्जा बाजारातील माला पेक्षा अधिक चांगला असेल तर तुम्हाला जास्त नफा मिळेल. जर तुम्ही एकाच वेळी प्रकारच्या टमाट्यांचे उत्पादन घेतले तर चांगला भाव मिळायची शक्यता वाढेल. जर तुम्ही कच्चे टमाटे, पिकेलेले टमाटे, सुकलेले टमाटे असे उत्पादन घेतले तरी देखील जास्त भाव मिळवणे शक्य होईल.
मित्रहो पाउस हि निसर्गाची देणगी आहे. आपली चूक हि आहे कि आपण पाणी साठवून ठेवत नाही. आपण विहिरी खोदतो, पाणी उपसतो पण पुनर्भरण हे काम सरकारचे आहे असे समजतो.
जलसंधारण- पाणलोट विकास उत्तम शेती साठी वरदान आहे. याचे शास्त्र अगदी सोपे आहे. पाणी जिथून वाहून जाते तिथेच थे अडवावे - जिरवले पाहिजे. जिथे जिरवणे शक्य नसेल तेथून ते अशा ठिकाणी वळवले पाहिजे जिथे ते साठून राहील, तिथून ते झिरपत राहील. शेत व गाव पातळीवर हि कामे करणे आवश्यक आहे.