पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

तुमच्या दुग्धव्यवसायात कमवा नशिबापेक्षा अधिक

इमेज
अनेक शेतकरी बांधव दुभती जनावरे पाळतात. काही शेतकरी नशीबात आले म्हणून पाळतात तर इतर नशीब आजमवण्यासाठी पळतात. तुम्ही कुठल्या वर्गातले आहात? तुमच्या व्यवसायात जास्त नफा मिळावा असे तुम्हाला वाटते का? ज्या प्रमाणे शेतात खताचे महत्व आहे त्याप्रमाणे पशुपालनात चाऱ्याचे महत्व आहे. योग्य चारा व्यवस्थापनातून तुम्ही फक्त तुमच्या जनावरांचे स्वास्थ्यच नाही तर त्यांचे वजन व दुध उत्पादन क्षमता देखील वाढवू शकता. इथे एका खास पुस्तकासाठी लिंक देत आहे. यात खूप चांगली माहिती व भरपूर युक्त्या दिल्या आहेत. फोटोवर क्लिक करून खरेदी देखील करू शकता!. यातून तुमचा खर्च तर कमी होईलच शिवाय तुम्ही नशीबवान व्हाल! वरील फोटोवर क्लिक करून मिळवा अधिक माहिती

एकरी १५१ टन उस उत्पादन करण्यासाठी खरेदी करा हे अफलातून पुस्तक

इमेज
कमी क्षेत्रात विक्रमी उस उत्पादन घेण्यासाठी पिकाची निगा चांगली ठेवावी लागते. मृदा सुधारासाठी भर खतांचा व जीवाणू खतांचा वापर क्रसा करणार? रान तापवण्याची प्रक्रिया कशी केल्याने फायदा होतो? संजीवके, विद्राव्य खते, अर्क, कीटकनाशक, रोगनाशके यांच्या फवारण्या कशा कराव्यात? कोणते वाण वापरावे? बीजप्रक्रिया कशी करावी? आंतरमशागत, बाळ भरणी, मोठी भरणी, जेठा मोडणे, कोणता भाग काढून टाकावा? लागवडीचा हंगाम कसा साधावा? सरीची रुंदी, रोपातील अंतर केव्हा किती ठेवावे? तण व्यवस्थापन कसे करावे? जलव्यवस्थापन कसे करावे? खते कोणती? केव्हा व कशी वापरावीत? रोग कीड नियंत्रण कसे करावे? हे सर्व या पुस्तकात दिलेलेच आहे. इतरही पुस्तकात अशी माहिती मिळेल पण या पुस्तकातील मांडणी अशी आहे कि तुमच्या नजरेतून काही सुटणारच नाही.

हरभरा पिकात वापरायची कीटकनाशके

इमेज
हरभरा पिकात घाटेअळी, तंबाखू अळी, कटवर्म  व उंदीर यांचा त्रास होतो. घाटेअळी ने होणारे नुकसान खूप मोठे असते. आपल्या कडील बहुतेक पिकात अशाच किडींचा कमी जास्त प्रभाव असतो. गेल्या अनेक वर्षात अनेक प्रकारचे रासायनिक कीटकनाशक वापरून या किडींचा नाश आपण करू शकलेलो नाही. त्यामुळे कुठलेही एक औषध हे काम करू शकेल असे वाटत नाही. या किडींचा समूळ नाश करण्या ऐवजी यांची संख्या नियंत्रणात राहील असा प्रयत्न आपण करू शकतो. यासाठी सर्व प्रथम परिसर स्वच्छ ठेवावा. काडीकचरा व  तण मुक्त असावा. मातीत देखील किडी वाढू नये म्हणून योग्य ती मशागत केलेली असावी. वर्षभरातून एकदा जमिनीत चांगल्या कुजलेल्या सेंद्रिय खतासोबत ट्रायकोडर्मा व मेटारायझीअम सारखी जीवाणू औषधे (एकरी १ ते ३ किलो) नीट मिसळलेली असावीत. कीड नियंत्रणासाठी सर्वप्रथम नैसर्गिक प्रक्रियांचा उपयोग करणे आवश्यक आहे. मित्रकिडीचा वावर आपल्या शेतात आहे कि नाही याचा अभ्यास करायला हवा. कोळसा, साळुंख्या व चिमण्या मोठ्या प्रमाणत किडीचा फज्जा उडवतात. त्यांच्यासाठी थांबे बनवावे. पिवळे व निळे चिकट सापळे ७:३ प्रमाणत वापरल्याने त्यावर किडी चिकटतात. त्...

हि अंधश्रद्धा आहे का?

इमेज
राजस्थानातील एका गावात जन्माला आलेल्या मुलीला चार हात होते. तिला देवीचे रूप मानले गेले. नाव ठेवले "दुर्गा". थेट बंगाल, महाराष्ट्रातील लोकं दुर्गाचे दर्शन घ्यायला धावू लागले. तिचे दर्शन घेणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत होत्या. सुकीबाईंच्या सुनेला लग्नानंतर पाच वर्ष होऊनही बाळ होत नव्हत. सुकीबाई दर्शनाला राजस्थानला आल्या व परतल्यावर दोन महिन्यात त्यांना गोड बातमी मिळाली. दशरथला नोकरी मिळत नव्हती. भाड्याला पैसे नव्हते, उधार उसनवार करून त्याचे वडील राजस्थानला जावून आले. दोन महिन्यात दशरथला नोकरी लागली. अश्या अनेक बातम्या नित्य कानी पडत होत्या. तिकडे दुर्गेच्या दर्शनाला चार चार दिवस रांगेत लागावे लागत होते. दोन वर्ष हे सुरु होते. शेवटी दुर्गा दगावली व हे प्रकरण बंद पडले. बबन एक उत्तम शेतकरी होता. त्याची दीड एकर शेती होती. तो नित्य वेगवेगळ्या पिकांची निवड करी. संतुलित खत मात्रा, मृदा सुधार व नेमके जलव्यवस्थापन यातून त्याने निवडलेले प्रत्येक पिक भरगोस उत्पादन देई. उत्पादनाची तो अनेक पद्धतीने मार्केटिंग करीत असे. बोलका व यशस्वी असल्याने तो इतर शेतकरी बांधवांना सल...

आवळा देवून कोहळा घेणाऱ्या पासून रहा सावध!

इमेज
त्याकाळी माणूस शिकार करीत असे. कबिल्यात राहणारे सर्व पुरुष भाले घेवून जंगलात शिकार करायला जात. स्त्रिया मुले सांभाळीत व जंगली प्राण्यापासून कबिल्याचे रक्षण करीत. शिकार भेटेलच याची काही खात्री नव्हती. कधी कधी भेटली तर एक तर कुटुंबाला पुरत नसे. कधी कधी इतकी मोठी शिकार हाती येई कि एका कुटुंबाकडून खाल्ली जात नव्हती. शिल्लक राही. तेव्हा आता सारखे फ्रीज नव्हते. हरणासारखी शिकार मिळाली कि ती कबिल्यात वाटली जाई. त्यामुळे देवाणघेवाण नित्याची होती. यातूनच कबिला टिकून राही. त्याकाळी ती एक गरज होती. काही वर्षापूर्वी आम्हाला एका कौटुंबिक जेवणाचे आग्रही आमंत्रण मिळाले.  या कुटुंबाशी आमची फक्त तोंड ओळखच होती. ते आमच्या बैठकीतली नसल्याने थोडे हीचकिचतच आम्ही निमंत्रण स्वीकारले. अंदाजानुसार हि सायंकाळ अतिशय कांटाळवाणी ठरली. पण इलाज नव्हता. देवाणघेवाण आली. आम्ही देखील त्यांना निमंत्रण दिले. पुन्हा एका कंटाळवाण्या सायंकाळचा मुहूर्त ठरला. हा क्रम असाच सुरु राहिला. अश्या कितीतरी सायंकाळी "अक्षरशः वाया गेल्या" . आता संदर्भ बदलले असले तरी लग्नात कपडे देवाण घेवाण सुरूच आहे. देवाणघेवाणीच्या का...

शेतकरी पुन्हा पुन्हा भुकेलाच का रहातो?

मित्रहो कश्यामुळे काय घडले यात मोठी गल्लत होत असते. आपण गरीब का आहोत? आपल्याला सातत्याने नुकसान का होते आहे? आपल्या पिकावर एव्हडी कीड अचानक कशी आली? कापसाचे भाव का पडले? उसाला भाव का मिळत नाहीये? फवारणी करते वेळी विषबाधा का झाली? अश्या सर्व प्रश्नांची जी उत्तरे आपल्याला ठावूक असतात ती चुकीची असू शकतात. दूरवर एका बेटावरील रानटी जमातीत, सर्वांच्या डोक्यात उवा असत. त्यांच्यासाठी ती एक सामान्य बाब होती. या लोकांच्या मनात असा समज होता कि "डोक्यातील उवा गेल्या कि ताप येतो". मग हि माणसे ताप अल्येल्या माणसाच्या डोक्यात उवा टाकत. कालांतराने ताप उतरला कि उवा परत त्याच्या डोक्यात वाढू लागत. त्यांच्या मते उवा ताप घालवतात! अर्थात ते खोटे होते. कुणालाही ताप आला कि उष्णतेमुळे उवा "गायब" होत व ताप गेला कि परत येत. एक नवखा महापौर शहरातील परिस्थितीचा अभ्यास करीत होता तेव्हा त्याला एक आलेख दिसला. या आलेखात शहरात लागलेल्या आगीत किती नुकसान झाले व किती अग्निशामक कर्मचारी ती आग विझवायला गेले हे दाखवले होते. महाशयांनी यावरून हे ठरवले कि जितके जास्त कर्मचारी आग विझवायला गेले तीतीके...

फॅशनच्या युगात शेतकऱ्यास कमाईची संधी

इमेज
शेतकरी मित्रहो आज फॅशनचा जमाना आहे. जितका खर्च लोकं खाण्यावर करीत नाही त्यापेक्षा अनेकपट खर्च पोशाखावर करतात. "एक नूर आदमी दस नूर कपडा" अशी म्हण आता सत्यात उतरते. उदाहरणच द्यायचे झाले तर पूर्वी आपले नेते साधे पोशाख करत आणि आता भरजरी कापडे घालूनच मिरवतात, त्यांना "दस नूर" म्हणजे स्वत:च्या "दहा पट" "प्रभावी" दिसायचे असते. असो आपल्याला या खर्चिक व्यक्तीला आपला ग्राहक बनवायचे असेल तर त्याला हवा असलेला माल बनवून द्यावा लागेल. याच धर्तीवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कापूस ते फॅशन पर्यंतचा टप्पा "महाराष्ट्रातच" पूर्ण करायचा ठरवला आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे अशीच आपली शुभेच्छा असावी. पण आपण त्यांच्या थोडे पुढे जावून विचार करू. खाली आधुनिक फॅशनचे काही नमुने दाखवत आहे. रूपमिलनच्या या रेशमी लहेंगा चोली ची किंमत रु ९४७००/- आहे. रेशमी ज्वेलरीची किंमत रु. १२५००/-   एकूणच तात्पर्य हेच कि जर आपण रेशीम निर्मिती करून त्यापासून धागा, वस्त्र व पोशाख किंवा ज्वेलरी बनवू शकलो तर "चांगली कमाई" करू शकू. अर्थात या साठी आपल्य...

भेंडी लागवड

इमेज
मित्रहो, जुलैच्या पहिल्या आठवडयात, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि जानेवारी च्या तिसऱ्या आठवड्यात भेंडी लागवड केली जाते. लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करून त्यात कमीत कमी एकरी २ ते ३ टन शेणखत मिसळावे. शेणखत मिसळतेवेळी त्याच्या माध्यमातून जैविक बुरशी नाशक व जैविक कीडनाशक तसेच सूक्ष्मअन्नद्रव्य (फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, डायसोडीयम बोरेट) व भूसुधारक द्यायला हवेत. त्यांचे प्रमाण आपल्या अनुभवानुसार किंवा अभ्यासानुसार कमी जास्त करावेत. मृदा चाचणी केली असल्यास त्याचा विचार घ्यावा. बियाणे निवडते वेळी चागल्या कंपनीचे बियाणे खात्रीशीर ठिकाणाहून घ्यावे. ४० ते ४५ दिवसात तोडणी सुरु होणारे व वायव्हीएमव्ही (यलो व्हेन मोझॅक व्हायरस) तसेच ओएलसीव्ही (ओक्रा लीफ कर्ल व्हायरस) या विषाणूला बळी न पडणारे बियाणे निवडावे. भेंडीची लांबी साधारण १० ते १२ सेमी इतकी असावी व तोडायला सोपी असावी. लागवड दोन फुटावर सरी पाडून, सरीच्या दोघी बाजूस १ फुट x अर्धा फुटावर केल्यास एकरी ६ ते ७ किलो बियाणे लागते. चांगल्या कंपनीचे बियाणे घेतल्यास त्यावर बुरशीनाशकाची प्रक्रिया केलेलीच असते, नसल्यास थायरम अथवा कार्बेन्ड...

देशी गोवंशावर मिळवा वैज्ञानिक माहिती जी ठरेल उपयोगी

इमेज
देशी गाय शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. तिच्यापासून मिळणारी प्रत्येक वस्तू शेतकऱ्याला उन्नती देते. ती आपल्या संस्काराचा एक भाग आहे. दुर्दैव हेच कि  आपल्याला गोवंशाचे ज्ञान नसल्यामुळे अनेक वेळेला नुकसान होते. गायींमध्ये उद्भवणारे रोग, आजार व त्यावर मात करायच्या पद्धती ज्ञात नसल्याने ना आपण ना गायीची सेवा करू शकतो, ना तिचा उपयोग करू शकतो. इतकेच काय आपल्याला देशी गायींच्या प्रजाती, उपजाती, वैशिठ्ये व अवगुण ज्ञात नसतात. यातून गैरसमज निर्माण होऊन नुकसान होते. वेळ आली आहे कि आपण देशी गोवंशाचा नीट अभ्यास करावा. त्यासाठी पुस्तक हे उत्तम मध्यम आहे. सकाळ प्रकाशनातर्फे प्रकाशित देशी गोवंश हे पुस्तक अवघ्या २०० रु मध्ये उपलब्ध आहे. यात भारतीय गोवंश, निवड, संवर्धन, गोशाळा, पशुपालक संघटना, आरोग्य पूर्ण A२ प्रकारचे दुध, गोआहार, गोप्रजनन, गोपैदास, गोआरोग्य, यशकथा अशी सविस्तर चर्चा केलेली आहे. सुदैवाने हे पुस्तक आता ऑनलाईन उपलब्ध असून, कॅश ऑन डिलिव्हरी च्या माध्यमातून घरपोच उपलब्ध आहे. आजपर्यंत अज्ञानात सुख मानून आपण स्वत:चे खूप नुकसान करून घेतले आहे. तेव्हा जागे व्हा व हे पुस्तक नक्की वाचा. ...

गुढगेदुखी ची डोकेदुखी कशी घालवाल

इमेज
४०शी पार व्ह्ययला लागली कि अनेक लोकांना गूढगे दुखायला लागतात. जर दुर्लक्ष झाले तर इतर सांध्यात देखील दुखणे वाढते. यालाच आपण सांधेदुखी असे म्हणतो.  सांधेदुखीचा त्रास आजकाल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सांध्यातील गादी सारखे काम करणारे कार्टिलेज जेव्हा घासले जाते तेव्हा सांधेदुखीचा त्रास जाणवू लागतो. अनुवांशिकता, जगण्याची पद्धत, खाण्याच्या सवई, वाढलेले वजन यामुळे सांधेदुखी होऊ शकते. जर सांध्यातील कार्टिलेजची झीज भरून काढली व त्याला नैसर्गिक स्थितीत आणले तर सांधेदुखीचा त्रास कमी होतो. अगदी नाहीसा देखील होतो. खर बघितले तर सांध्यातील कार्टिलेजची झीज नित्य होत असते पण तारुण्य असे पर्यंत हि झीज सहज भरून निघत असते. त्यानंतर झीज भरून निघायचा वेग - घासले जाण्याच्या वेगा पेक्षा मंदावतो व कार्टिलेज झिजते. कालांतराने सांधेदुखी सुरु होते. गुढगेदुखी हा सांधेदुखीतला सर्वात जास्त अनुभवला जाणारा त्रास आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास अपंगत्व येवू शकते. सुदैवाने आज हे टाळणे शक्य आहे. कार्टिलेजची झीज भरून काढायचा वेग वाढवला तर सांधेदुखीवर मात करणे शक्य आहे. कार्टिलेजची झीज भरून काढण्यासाठी शरी...

लसूण लागवड

इमेज
लसूण पिकासाठी रासायनिक खतमात्रा एकरी नत्र ३० किलो, स्फुरद १६ किलो, पालाश १६ किलो व गंधक १६ किलो आवश्यक आहेत.  लागवडीवेळी १० किलो नत्र आणि स्फुरद, पालाश व गंधकाच्या संपूर्ण मात्रा द्याव्यात. उर्वरीत नत्रमात्रा दोन समान हप्त्यात विभागून ३० आणि ४५ दिवसांनी द्याव्यात.  ठिबक सिंचन वापरत असल्यास, लागवडीपूर्वी १० किलो नत्र देऊन, उर्वरीत नत्रमात्रा सहा समान हप्त्यात विभागून दहा दिवसांच्या अंतराने द्याव्यात.  अॅझोस्पिरीलम आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणू (पीएसबी)  या जैविक खतांच्या प्राथमिक मात्रा प्रत्येकी २ किलो प्रति एकर या प्रमाणात द्याव्यात.  पुनर्लागवडीपूर्वी किंवा पुनर्लागवडीच्या वेळी ऑक्‍सिफ्लोरफेन (२३.५ ईसी) १.५ ते २ मि.ली. प्रति लिटर किंवा पेंडीमिथेलीन (३० ईसी) ३.५ ते ४ मि.ली. प्रति लिटर या प्रमाणात या तणनाशकांचा वापर करावा. लव्हाळा व हरळीच्या नियंत्रणासाठी ग्लायफोसेट वापरू नये. यांचा बंदोबस्त पूर्वमशागतीने होऊ शकतो. खोल नांगरट करून हरळीच्या काशा किंवा लव्हाळ्याच्या गाठी वेचणे हाच पर्याय वापरावा.  लागवडीकरीता १.५ ग्रॅम वजनाच्या पाकळ्...

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद