पोस्ट्स
ऑक्टोबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
फॉलोअर
या पूर्वीच्या पोस्ट्स
या पूर्वीच्या पोस्ट्स
जब दिल आए गधी पर तो परी क्या चीज है
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

जब दिल आए गधीपर तो परी क्या चीज है? अशी एक म्हण आपल्याकडे आहे. प्रेमात आंधळ्या झालेल्या व्यक्तीबद्दल या म्हणीचा प्रयोग होतो. तरूण/अधेड वयात "तू मला आवडतोस" किंवा "आवडतेस" असे म्हणणारी एक व्यक्ती हवी असते. जेव्हा असे घडते तेव्हा "तो" किंवा "ती" अचानक फार आवडायला लागते. त्या व्यक्तीशिवाय दुसरा विचारच मनात येत नाही. मन "सैराट" होते. हि प्रभावळ इतकी प्रबळ असते कि "भान" ठिकाणावर आणणारा मित्रपरिवार किंवा परिस्थती नसेल तर "सैराट" घडल्याशिवाय रहात नाही. जर त्या कथेत प्रिन्सदादा नसेल तरी असे प्रेम काही काळाने "अपयशीच ठरते". "तो" किंवा "ती" जितकी हुशार, सुंदर, आकर्षक, प्रेमळ वाटत होते, जाणवत होते, ते सगळे बदलून जाते. प्रेमाचे चार दिवस संपले कि त्याचा किंवा तिचा "दुष्टपणा", "पोकळपणा", "अप्पलपोटेपणा" स्पष्ट दिसायला लागतात. आपण प्रेमाच्या प्रभावळीत "कपाळमोक्ष" करून घेतला आहे हे कळते तो पर्यत अर्धे आयुष्य संपून जाते. तुम्ही शेअर बाजाराचा अभ्यास केला आह...
सुर्याफुलातील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सूर्यफुलाच्या सुधारित व संकरित वाणात उच्चतम उत्पादन क्षमता एकरी ८०० किलो इतकी झाली आहे. पूर्वी फार फार तर ३०० किलो प्रती एकर असे उत्पादन येत असे. कमी जागेत, कमी वेळेत, कमी रोगराई व जवळपास अडीच पट उत्पादकता असेल तर पिकास अन्नद्रव्यांची भूक देखील असणार आहे. जर आपण पिकाच्या पोषणात कमी पडतो तर उत्पादनात घट तर येईलच शिवाय रोगराई चा देखील फेरा पडेल. शेतात फिरता फिरता काही लक्षणांचा अभ्यास करून कमतरतेची लक्षणे जाणून घेवून योग्य त्या अन्नद्रव्याचा पुरवठा करता येतो. प्रार्थमिक अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे नत्र: नत्राची कमतरता झाल्यास पिकाची वाढ खुंटत जाते. पाने पिवळे पडतात. जुन्या पानांवर जास्त परिणाम होतो. पानगळ लवकर होते. नवीन झाडे लाल पडतात. स्पुरद: पाने खालच्या बाजूने गर्द हिरवे, जांभळे, निळे किंवा लाल होतात. काही वाणात शिरा व खोडे पिवळी पडतात. फुले तयार होत नाहीत. पालाश: झाड आजारी दिसू लागते. फुल व बियांचा आकार लहान रहातो. पानांचे काठ व शिरांच्या मधला भाग पिवळा पडतो. पिवळे पणा पहिले जुन्या पानांवर दिसतो व वरच्या बाजूला सरकू लागतो. पाने...
तुम्ही एग्रोडॅड चे वाचक आहात का?
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
एग्रोडॅड या ब्लॉगवर शेतकरी बांधवांसाठी नियमितपणे लेख प्रसारित केले जातात. या लेखांचे विषय वैविध्यपूर्ण आहेत. आजचा शेतकरी ज्ञानसागराच्या काठावर उभा आहे. थोडा गुगलवर सर्च केला कि हवी ती माहिती उपलब्ध होते. कोणत्याही भाषेतील माहिती हव्या त्या भाषेत अनुवादित करून मिळते. इतकेच नाही तर आज प्रत्येक विषयावर पुस्तके उपलब्ध आहेत. शेतीचे उत्पन्न वाढावे म्हणून आज पूर्वीपेक्षा अनेक पटीने अधिक चांगली साधने उपलब्ध आहेत. सुधारित बी, खते, कीटकनाशके, संजीवके, जलव्यवस्थापन सामुग्री, तणव्यवस्थापन सामुग्री, लहान मोठी हत्यारे, वाहने, बाजार पेठा अशी हि न संपणारी साधनांची यादीच आहे! खुली बाजारपेठ, धरणे, पाट, वीज, कृषीकर्ज, पीकविमा या माध्यमातून सरकार देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यास मदत करत आहे. इतके सारे असूनही आज शेतकरी आत्महत्या हा विषय रोजचा झाला आहे. तरुण मंडळी शेतीकडे पाठफिरवू लागली आहे. इतकेच काय, शेतकऱ्यांचे योग्य वयात लग्न होणे देखील दुरापास्त होऊन बसले आहे. हे चित्र विचार करायला भाग पाडते कि "आजचा शेतकरी" नेमका कमी कुठे पडतो? एकीकडे इतकी विदारक स्थिती असून सुद्धा सर्वच शेतकर...
शेतकरी आहात कि मेंढर?
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

सकाळ-संध्याकाळ चौकात उभे रहाणारे टवाळ, फेसबुक वरील स्क्रोलर, व्हाटसएपवरचे कंपलसिव्ह फॉरवर्डर सोडले तर प्रत्येकाला कृतीशील निर्णय घ्यावे लागतात. मुद्दा हा आहे कि अनेक वेळा सोशल प्रुफ मुळे तुम्ही योग्य निर्णय घेण्यापासून स्वत:ला वंचित ठेवतात. जाण असून देखील चुकीचा निर्णय घेतात! माझ्या मते चांगला निर्णय घेण्यात सर्वात मोठी अडचण असते ती सोशल प्रूफची! १९९५ सालमधील सप्टेंबर महिन्यातील घटना आहे, गुरुवार चा दिवस होता. मी कॉलेजचा विद्यार्थी होतो, मेस वरून कॉलेज कडे जायला निघालो व रस्त्यावर अचानक गर्दी वाढली. जो तो पुजेची थाळी घेवून जातांना दिसत होता. गणपती मंदिरावर अक्षरश: झुंबड उडालेली होती. मी आस्तिक असलो तरी फारसा मंदिरात जात नाही. झुंबडीत सामील न होणे बरे हा विचार करून मी कॉलेजला पोहोचलो. तिथे गर्दी कमी होती. उपस्थिती कमी असल्याने शिक्षकांनी पिरीयड ला ऑफ दिला. “गणपती दुध पीत असल्याची” बातमी कानावर आली. सर्व मंदिरातील गणपती दुध पीत होते. प्रत्येक भक्तासाठी “बाप्पाला” प्रसन्न करून घ्यायची हि “मोठी संधी” होती, त्यामुळे आज कॉलेजमध्ये पिरीयड होणार नाही हे माझ्या लक्षात आले व मी वाच...
फवारणीमुळे झाल्येल्या मृत्युला जबाबदार कोण? त्याचा चेहरा कसा?
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

फवारणीमुळे झाल्येल्या मृत्युला जबाबदार कोण? त्याचा चेहरा कसा? आज पेपर उघडून पहिला का? आज कुणावर सूड उगवलाय बातमीपत्राने? आज कुणाला हिरो म्हणता आहेत पेपरवाले? प्रत्येक बातमीला एक चेहरा असतो. कुणी म्हणतय कि विद्यमान मुख्यमंत्र्यास शेतीचे ज्ञानच नाहीये तर मुख्यमंत्री म्हणता आहेत कि आमच्या सरकारने शेतकऱ्यासाठी जे केल ते आजपर्यंत कुणीच केलेलं नाही. सरकारी अधिकारी दोष देता आहेत सेंद्रिय खत व औषधी उत्पादकास व कृषीमंत्री म्हणतात कि शेतकऱ्याने स्वसंरक्षणात्मक उपाय केलेले नाहीत, त्याच्या मृत्यूला तोच जबाबदार आहे! सेंद्रियवाले म्हणता आहेत कि बहुरास्ट्रिय कंपन्या व सेन्ट्रल इनसेक्टिसाईड बोर्डाची मिलीभगत आहे ते जहाल विषाचे परवाने देवून टाकतातच कसे? प्रत्येक चेहरा स्वत:च्या तोंडावर फेअर एंड लव्हली लावतो व दुसऱ्याच्या तोंडावर बूटपॉलिश! हे नित्याने घडत असले तरी पत्रकार मंडळी वाचकाचा दृष्टीकोन शोधतात व सत्याचा विपर्यास करतात. सचिनच्या काळात आपण हे खुपदा अनुभवले आहे. क्रिकेट सामना आपण जिंकलो व त्यात सचिनचे एखादे रेकॉर्ड झाले तर, सचिन क्रिकेटचा देव आहे. सामना हरलो तर सचिन फक्त स्वत:च्या...
शेतकऱ्याची वेळ वाचवायची युक्ती
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

अनेक शेतकरी बांधवांसाठी वेळेचे नियोजन मोठे जिकरीचे असते कारण प्रत्येक काम "छोटे-मोठे-महत्वाचे-कमी महत्वाचे" त्याला एकट्यालाच करायचे असते. मुले शिकलेली असतात त्यांना शेतीतले काही कळतच नाही. पत्नीला व्यवाहार समजत नाही, सालदार सांगकाम्या असतो, मजुरांच्या मागे लगल्याशिवाय काम पुढे सरकत नाही, लग्न-मुंज-मरणात गेले नाही तर नातेवाईक आपल्याला ओळख देत नाहीत. मित्रहो, रतन टाटा किती मोठे उद्योजक आहेत! आजच्या क्षणाला त्यांच्या कडे किती नोकर असतील? समजा टाटांनी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगाराच्या चेकवर स्वत:च साक्षरी करायचे असे ठरवले तर महिन्याकाठी त्यांच्याकडे झोपायला सुद्धा वेळ शिल्लक रहाणार नाही! आता तुम्ही म्हणाल, त्यांचा उद्योग मोठा आहे शेती शी त्याची तुलना कशी कराल? कुठेतरी सुरुवात करणे गरजेचे आहे. आपल्याभोवती जी कोणी माणसे आहेत त्यांची बुद्धी, क्षमता व निष्ठा यांची परख करणे व त्यानुसार त्यांना काही काम सोपवणे गरजेचे आहे. एकदा काम सोपवले कि स्वत:च्या निर्णयावर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे . समजा तुम्ही नेहमी स्वत:च्या वाहनाने प्रवास करत असाल व एखाद्य...
शेतकऱ्याचा वेळ महत्वाचा नाही असे फक्त गाढवास वाटते!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

वेळ म्हणजेच संपत्ती हे प्रत्येकाला ठावूक असते पण जो हि संपत्ती जपून वापरतो तो यशस्वी होतो. अनेकदा आपला वेळ वाया जातो. वाट पहाणे - प्रवास करणे या दोन घटना भरपूर वेळ घेत असतात. अनेकदा या वेळेचा दूरउपयोग केला जातो व नुकसान होते. एका शेतकरी मित्राने त्याच्या शेतातील कांदा ट्रकने भरून बाजारपेठेकडे रवाना केला. सोबत त्याचा मुलगा व मुलाचे मित्र गेले. बाजारपेठेत सकाळी पोहोचायचे होते. प्रवासादरम्यान या मुलाने मित्रांसोबत ढाब्यावर जुगार खेळला, नशा पाणी केले. जुगारात तो २६,००० रु हरला! 10 टन कांदा विकून असा कितीक पैसा मिळणार होता? डोक्यात जाण नसल्याने त्याने वेळेचा दुरुपयोग केला व तसे करणे त्याला चांगलेच महाताग पडले. एकूणच प्रवास करते वेळी आपल्या वेळेचा सदुपयोग होईल हे बघायला हवे. सराव व व्यक्तिमत्वानुसार वेगवेगळ्या पद्धतीने वेळेचा सदुपयोग करणे शक्य आहे. २४ तासापैकी आपण ८ तास झोप काढतो. हि झोप अत्यावश्यक असते. अनेक यशस्वी माणसे प्रवासादरम्यान झोप काढण्याला महत्व देतात. त्यामुळे ते जिथे पोहोचतात तेथे तप्तरतेने कामे करू शकतात. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी भरपूर प्रवास करतात. बहुतेक वे...
मनोधारनेतून गैरफायदा घेणाऱ्यांची लावा वाट!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

मित्रहो आपल्या मनोधारणेचा व गैरसमाजाचा फायदा अनेक लोकं घेत असतात. विश्वासराव गेल्या २० वर्षापासून सरपंच आहेत. त्यांच्या कडे जाणारी प्रत्येक व्यक्ती समाधानी होऊनच परत येते. कुणाचीही त्यांच्याबद्दल तक्रारच नाहीये. ते आहेत तो पर्यंत "सरपंच" पद त्यांच्या कडेच राहील हे निश्चित आहे. गेल्या २० वर्षात गावातील परिस्थितीत फारसा बदल झालेला नाहीये. पहिले फोन नव्हते, मग फोन आले, आता प्रत्येकाकडे मोबाइल आहेत. टीव्ही नव्हते, मग टीव्ही आले, आता स्मार्ट टीव्ही देखील आले आहेत. पूर्वी रस्ते नव्हते आता सिमेंट चे रस्ते आहेत. हे सर्व बदल बाहेरून आले आहेत. गावातील १०० टक्के लोक शेती करतात पण २० वर्षात गावातील व शेताच्या पाण्याची समस्या जशी होती तशी आहे. एका मध्यवर्ती धरणातून पाणी पुरवठा होतो पण त्यात गावाचा ह्क्क थोडासाच आहे. शिवारातील तण समस्या जशी होती तशीच आहे. सामुहिक तण नियंत्रण केले तर शेतीचे उत्पन्न ४० टक्क्याने वाढू शकते. सामुहिक कीड नियंत्रणातून देखील भरीव फायदा होऊ शकतो. एक नेता म्हणून विश्वासरावांनी असा प्रयत्न केलेला नाही. गावात एकहि कृषीपूरक उद्योग नाहीये. गावातील सर्व कृषीउत्पन...
शेतकऱ्याच्या वेळेचे नियोजन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
एक शेतकरी म्हणून विचार केला तर -जमीन जुमला - मजूर, कामगार - स्थिर व खेळते भांडवल या व्यतिरिक्त तुमच्याकडे काय महत्वाचे आहे? वेळ! हि "वेळ" सर्व शेतकरी बांधवांकडे सारख्याच प्रमाणात उपलब्ध असते व एकदा वाया गेली कधीच परत येत नाही. अनेक वेळा शेतकरी बांधव बोलूनही दाखवतात कि मी ज्या पद्धतीने शेती करतो आहे त्यापेक्षा उत्तम करू शकतो पण मला वेळ पुरत नाही ! मित्रहो, वेळ हा व्यवस्थापनाचा मुद्दा आहे. जसा आपण पैशाचा हिशोब ठेवतो तसा वेळेचाही हिशोब ठेवायला हवा कारण एकदा हातून निसटलेली वेळ कुणालाच परत मिळत नाही. तुमच्या जवळ जितका वेळ आहे तितक्याच वेळेत तुम्हाला महत्वाची कामे, दैनंदिन कामे व फुरसतीतील कामे आटोपायची असतात. समजा आपल्याजवळील कामांची आपण विभागणी केली तर व्यवस्थापन चांगले होईल. महत्वाचे व तत्काल काम महत्वाचे पण फुरसतीचे काम दुय्यम पण तत्काल काम दुय्यम व फुरसतीचे काम आपल्या जवळील वेळेची देखील विभागणी करणे शक्य आहे . बहुवार्षिक कामे, येत्या वर्षभरातील कामे, सहमहितील कामे, या महिना-पंधरवड्यातील कामे, चालू आठवड्यातील कामे, उद्याची कामे,...
शेतकऱ्याचा ध्येय्यवाद
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

आपले ध्येय्य निश्चित असणे महत्वाचे आहे. तसे नसले तर कामाची गाडी रुळावरून भरकटून जाईल, फक्त धावत राहील, पोहोचणार कुठेच नाही. ध्येय्य ठरवल्यामुळे तुमच्या योजनेला एक स्परूप येते. योजने मुळे कोणकोणती कामे करायचे ते ठरते. कामे केल्याने परिणाम प्राप्त होतात व फलस्वरूप "यशप्राप्ती" होते. जेव्हा आपण सहल काढतो किंवा प्रवास करतो त्यावेळी प्रत्येक गोष्ट ठरवतो. कुठून कुठे कसे जायचे, केव्हा जायचे, किती लोकं रहातील, खान-पान कसे होईल? म्हणजेच कुठे जायचे हे माहिती असले कि सर्व काही ठरवता येते. यशस्वी शेतकरी होण्यासाठी दोन प्रकारची ध्येय्य ठरवावी लागतील. सामान्य ध्येय्य व निश्चित ध्येय्य. सामान्य ध्येय्य: मी एक चांगला शेतकरी बनेल, शेतीचा अभ्यास वैज्ञानिक पद्धतीने करेल, कामापासून लक्ष विचलित करणाऱ्या सवयी जसे वेश्यावृत्ती, जुगार, दारू या पासून दूर राहील. निश्चित ध्येय्य: मी पिकाच्या निवडीत वैविध्य आणून या वर्षी मागील वर्षाच्या २० टक्के अधीक उत्पादन घेईल. वार्षिक उत्पादनाचा २० टक्के भाग मी रोजच्या भाजीपाला विक्रीतून कमवेल २० टक्के भाग द...
शापित विजेते होऊ नका, स्वैरइच्छेला आवर घाला
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

या वर्षी कोणते पिक पेरताय? प्रत्येकाचे उत्तर होते कापूस. मैलोगणती कुठेही नजर टाका सर्वीकडे कापूसच. पिक पाच फुटाच्या वर वाढले. फेसबुकवर एकसे एक फोटो! कहर झाला! बोंडअळी चा हल्ला झाला, फवारणी सरू झाली. फवारणी करते वेळी विविध ठिकाणी २५ पेक्षा अधिक शेतकरी/मजूर विषबाधा होऊन मेले. दोन वर्षापूर्वी कांद्याची लाट आली होती, तो सडला. मग तुरीची लाट आली, तुरीचा भाव पडला. कापसाचे काय होते आहे ते आपण बघतो आहोत. रब्बीत हरभरा पेरणी जोरात आहे, काय होणार हे ज्योतिषाला विचारायची गरज नाही. हे थोडे जुगारासारखे होत नाहीये का? किसन एका ठिकाणी बोली लावायला पोहोचला. अनेक नामीगिरामी व्यक्ती जमले होते. एका जमिनीच्या तुकड्याचा लिलाव होता. या तुकड्याची किंम्मत कमीत कमी पाच कोटी तर जास्तीत जास्त २५ कोटी असू शकते असा सर्व साधारण अंदाज होता. लिलाव सुरु झाला. बोली वाढत गेली. किसन ने मनोमनी ठरवले होते कि हि किंमत फारतर आठ कोटी असू शकते. बोली आठ कोटीच्या वर जावू लागल्यावर किसन ने बोली लावणे बंद केले. लाजीपतराव बोली जिंकले, त्यांनी तो जमिनीचा तुकडा ५५ कोटीत खरेदी केला. जिंकण्याच्या खुशीत लाजीपतरावांनी एक धमाल...
एक और एक "ग्यारह" कि "मुठभर पेरतो व सूपभर उगवतो"
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

तुमच्या कडे वर्तमान पत्र आले आहे का? रद्दी सुद्धा चालेल. त्यची ५० वेळा घडी घाला. किती जाड होईल त्याचा गठ्ठा? काही अंदाज आहे? पुढे वाचण्यापूर्वी तुमचा अंदाज लिहून ठेवा. पुढील तीस दिवस "एग्रोडॅड" तुमच्या खात्यात पैसे जमा करणार आहे. तुम्हाला पर्याय निवडायचा आहे. पहिला पर्याय आहे कि तुमच्या खात्यात रोज १००० रु जमा करावेत व दुसरा पर्याय आहे कि एग्रोडॅड तुमच्या खात्यात पहिल्या दिवशी १ रु जमा करेल, दुसऱ्या दिवशी २ रु, तिसऱ्या दिवशी ४ रु, चौथ्या दिवशी त्याच्या दुप्पट, अश्या पद्धतीने ३० दिवस. तुम्हाला कुठला पर्याय आवडेल, पहिला कि दुसरा. गणित करण्यापूर्वी तुमचे मत लिहून ठेवा. आता कागद पेन घ्या. वाटल्यास तुमच्या मोबाईल मधील कॅलक्युलॆटर घ्या. तुमच्याकडील वर्तमानपत्राची जाडी ०.१ मी. मी आहे असे समजा. पन्नास घड्या घातल्यावर ते किती जाड होईल त्याचे गणित करा. ५,६२,९४,९९५ कि. मी. इतका जाड गठ्ठा तयार होईल! आता तुमच्या खात्यात किती रक्कम जमा होईल याचे गणित करा. पहिल्या पद्धतीनुसार ३०,००० जमा होतील तर दुसऱ्या पद्धतीने ५३,६८,७०,९१२ रु. मित्रहो आपल्याला १+१ = २ हे गणित कळते पण १ और १, ११...
जाणून घ्या गैरसमज जे शेतकऱ्यास यशस्वी होण्यापासून रोखतात
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
गैरसमज म्हणजे तथ्य व विचारातील अंतर. असे चुकीचे विचार जे आपल्याला योग्य व फायदेशीर कृती करण्यापासून रोखतात . शेतकरी बांधवांच्या मनात देखील असे काही गैरसमज घर करून बसतात ज्यामुळे ते जोखडात बांधले जातात. यातील काही महत्वाचे गैरसमज कोणते? ते बघू. शेतकरी म्हणजे काही उद्योजक नाही - हा सर्वात मोठा व महत्वाचा गैरसमज आहे. जो शेतकरी स्वत:च्या गरजेव्यतिरिक्त अन्नधान्य पिकवतो व बाजारात विकतो तो उद्योजक नाही तर काय? कुठलीही शाश्वती नसतांना जमिन तयार करतो, बी पेरतो, पिकास जपतो; माणसे राबवतो त्यांची पोटे भरतो, अडीनडी ला पुरतो. विक्रीतून येणाऱ्या पैशाचा शेवटचा हिस्सा ठेवतो. नफा-तोट्याचा विचार न करता एव्हडी धडाडी दाखवणारी व्यक्ती म्हणजेच उद्योजक. उद्योजक यापेक्षा वेगळा असतो का? मित्रहो. कुणीही जन्माने उद्योजक असतो का? ती एक मानसिकता आहे. जो जोपासेल तो उद्योजक! फसवणूक केल्याशिवाय पर्यायच नाही - उद्योजकतेत कुठलाही शॉर्ट कट मारणे शक्य नाही. मोह कुणाला होत नाही..मला होतो..तुम्हालाही होईलच. नाशिक हून येतांना रस्त्यात कांद्याची गोणी घेतली. घरी येवून ल...
मूठभर पेरून - सुपभर उगवून, मिळतोय फक्त "कर्जाचा डोंगर आणि आत्महत्येचा विचार"! हे सार संपायला हवे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
गेली अनेक पिढ्या शेतकरी शेती करतोय. पेरतोय-उगवतोय-काढतोय-विकतोय. जन्माला आल्यापासून - आत्महत्येचा विचार मनात येइपर्यंत तो "आजन्म" शेतीच करतोय . जेव्हा एक बाळ जन्माला येते व मातेच दुध चाखते, त्या दुधात देखील शेतकऱ्याचा घाम असतो. मातेला ममत्व मिळते पण शेतकऱ्यास फक्त "यातना"! ज्याचे पांग आई प्रमाणे फेडायला हवे त्याला आपण काय देतोय? मुठभर पेरून - सुपभर उगवून त्याला मिळतोय फक्त "कर्जाचा डोंगर आणि आत्महत्येचा विचार"! हे सार संपायला हवे, पण केव्हा आणि कधी? एक शेतकरी जेव्हा गळ्यात फास टाकतो, त्याचे मृत्यूचेभय संपलेले असते. त्या क्षणाला सबंध जगात त्याला कुणाची भीती वाटत नसते. आपल्यापैकी प्रत्येकाने हे लक्षात घ्यावे. स्वत:च्या गळ्यात फंदा टाकायच्या अगोदर जर त्याने तो फंदा आपल्या पैकी एकाच्याही गळ्यात टाकून ओढला तर? मित्रांनो, हजारो-लाखो दिवे लावलेत तरी "अंधार" दिव्याखाली लपून बसतो, दिवे विझताक्षणी हा अंधार सारे आसमंत व्यापून टाकतो. प्रत्येक नागरिकाने हे समजावून घेतले पाहिजे. जीवावर उदार होऊन जरी शेतकरी आज जगाची भूक मिटवत असला तरी हि भूक आपल...
छोटे प्राणी करू शकतात मोठे नुकसान
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

हरीण, साळिंदर, ससे, खडीखाप व उंदीर असे छोटे प्राणी मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. शेत व गोदामात यांचेमुळे मोठे नुकसान होत असते. "शॉटगन-रीपेल्स ऑल" हे अमेरिकेतून आयात केलेले उत्पादन या कामी अतिशय उपयोगी आहे. याच्या वासाने या प्राण्यांच्या नाकात चूळ-चूळ होऊन त्यांना त्रास होतो. कंटाळून ते निघून जातात. यात सुकलेले रक्त, सडके अंडे, आल्याचे तेल, पोटॅशिअम एसिटेट, लवंग, फिश ऑइल, फुल्लर अर्थ, सुकलेले मास, कांदा, सिविड, व्हानिलीन, विंटरग्रास ओईल असे घटक आहेत. आपण हे प्रोडक्ट ऑनलाईन खरेदी करू शकता.
फवारणीतून विषबाधा टाळण्यासाठी आत्मसात करा एकात्मिक नियंत्रणाचे सहा टप्पे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

फवारणी करते वेळी विषबाधा होते म्हणजे काय? भारतात उपलब्ध सर्व कीटकनाशके सेंंन्ट्रल इनसेक्टीसाइड बोर्डाकडून प्रमाणित असतात. फवारणी करते वेळी औषधीचे जे प्रमाण शिफारस केले जाते त्याच्या चार पट वापरले तरी ५० किलो वजनाच्या माणसावर काडीमात्र परिणाम होऊ शकत नाही. शास्त्रीयदृष्ट्या हे शक्य नाही. तरीदेखील विषबाधा होत असेल तर प्रचंड घोटाळा असू शकतो किंवा हाताळणीत घोडचूक असू शकते. कीड नियंत्रणासाठी फक्त कीटकनाशकवर विसंबून राहिल्याने हे प्रकार होत आहेत. हे टाळायचे असेल तर शेतकरी बांधवांनी संपूर्ण सेंद्रिय किंवा संपूर्ण रासायनिक शेती करण्या ऐवजी ज्ञान व समयसूचकतेवर आधारित एकात्मिक कीटक नियंत्रणाचे सहा टप्पे समजून घेतले पाहिजेत . ओळख शत्रू व मित्रांशी: बहुतेक सर्वच सजीव आपल्या अत्यंत उपयोगाचे आहेत. जे काही जिवंत आहे ते सगळे घालवुन आपले भागणार नाही. एकात्मीक पद्धतीच्या पहिल्या पायरीवर आपल्या शेतात कोणकोणते जीव राहतात यांची ओळख करून घ्यावी.जेव्हा आपण कीटनियंत्रणासाठी फक्त कीटकनाशकावर अवलंबून होतो तेव्हा शत्रू किडीसोबत मित्र किडीला देखील मारून टाकतो. उदा. हेलीकोव्हर्पा या किडीला ७५...
एग्रोडॅड चा सल्ला!
शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...
आतापर्यंतच्या वाचकांची संख्या
planters
हा फॉर्म भरायला विसरू नका
आपण कोण आहात?
एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही.
धन्यवाद